नागपूर, दि.31 : नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टोळधाडीने शेतीचे नुकसान होत आहे. त्यापासून बचावासाठी कृषी विभागाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, तसेच शेतकऱ्यांनीही सतर्क रहावे, अशा सुचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या.काल, शनिवारी सायंकाळच्या सुमारास या टोळधाडीने काटोल तालुक्यातील कचारी सावंगा, सोनपूर, गणेशपूर, शेका
शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी सुद्धा टोळधाडपासून बचाव करण्यासाठी बँड, फटाके यांचे मोठे आवाज करावेत, मोठ्या प्रमाणात धूर करावा, त्यामुळेही टोळधाडीपासून आपण बचाव करू शकतो, असे श्री.देशमुख म्हणाले.नुकसानीची पाहणी करताना त्यांच्यासोबत कृषी विभाग, महसूल विभाग, याबरोबरच स्थानिक पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.





