गोंदिया,दि.01ःकोरोना विषाणूच्या संसगार्मुळे उदभवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यात तसेच देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मोटार वाहन अधिनियम १९८८ व केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ अंतर्गत वाहनांच्या विविध कागदपत्रांच्या वैधतेबाबत केंद्र शासनाकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. सदर आदेशातील मार्गदर्शक सूचना लक्षात घेता परिवहन संवगार्तील वाहनांचे योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरणासंबंधीचे कामकाज अटी व शर्तीच्या अधिन राहून १ जून २0२0 पासून सुरु करण्यात येणार आहे.
योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण करण्याकरिता ऑनलाईन अपॉईमेंट घेणे आवश्यक राहील. अपॉईमेंट असलेल्या दिवसाअगोदर वाहन धारकाने आपल्या वाहनाची संपूर्ण कागदपत्रे तपासणीकरिता सादर करणे आवश्यक राहील. कागदपत्रे वैध असल्याची खात्री झाल्यानंतरच वाहनाचे योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरणासंबंधीचे पुढील कामकाज करण्यात येईल. वाहनाचे तपासणीच्या वेळी वाहन स्वखर्चाने पूर्णपणे स्वच्छ करुन, सॅनेटाईज करुन त्याबाबतचे हमीपत्र वाहन धारकाने सादर करणे बंधनकारक राहील. वाहनाचे चालक व वाहक यांनी मास्क, ग्लोव्हज परिधान करणे बंधनकारक राहील. लॉकडाऊनमुळे ज्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र, परवाना, वाहन नोंदणी कागदपत्रांची तसेच चालक अनुज्ञप्तीची वैधता १ फेब्रुवारी २0२0 पासून संपली आहे अशा सर्व कागदपत्रांची वैधता ही ३0 जून २0२0 पयर्ंत ग्राह्य समजण्यात येईल. सदर कामकाज करतेवेळी सोशल डिस्टन्सीगचे पालन करणे, मास्क घालणे बंधनकारक राहील. सदर कामाकरीता आलेल्या सर्व वाहनधारकांनी स्वत:च्या आरोग्य विषयक सुरक्षेची पूर्णपणे काळजी घ्यावी. असे गोंदियाचे उपप्रादेशिक परिहवन अधिकारी यांनी कळविले आहे.





