अर्जुनी-मोर,दि.01ः येथील पंचायत समितीचे सभापती,उपसभापती व पंचायत समिती सदस्यांनी येत्या 3 जूनला पंचायत समिती कार्यालयांतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यंत्रणा,पंचायत विभाग,बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय तसेच लेखा विभागात योग्य पद्धतीने कामे हाताळला जात नसल्याने या कार्यालयासंह गट विकास अधिकारीच्या कक्षाला कुलूप ठोको आंदोलनाचा ईशारा दिला आहे.
यासंदर्भातील निवेदन 29 मे रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी,गटविकास अधिकारी व अर्जुनी-मोर पोलीस स्टेशनला पाठविण्यात आले आहे.त्या निवेदनात पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी 3 व 4 जानेवारी 2020 रोजी सर्व पंचायत समिती सदस्यांनी पंचायत समिती सभागृहात स्वतःला कोंडून घेत आंदोलन केले होते.त्यावेळी अधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्यासाठी दिलेली आश्वासनांची पूर्तता केली नसल्याने तसेच पंचायत समिती कार्यालयांतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यंत्रणा,बालविकास प्रकल्प कार्यालय व पंचायत विभागाद्वारे करण्यात येत असलेली प्रशासकीय कामे योग्य पद्धतीने हाताळल्या जात नसल्याची बाब मासिक सभेमध्ये वारंवार निदर्शनास आणून देण्यात येऊनही त्याकडे गटविकास अधिकारी यांनी दुर्लक्ष केले.सर्वांना कामात सुधारणा करण्यासंबधी सातत्याने सुचना देण्यात आल्या परंतु त्यात सुधारणा झालेली नाही.तर डिसेंबर 2019 मध्ये बालविकास प्रकल्प कार्यालयाकडून अंगणवाडी सेविका मदतनीस भरती प्रक्रिया राबविण्यात आली.त्यामध्ये घोळ झाला असून त्याची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली होती.मात्र आंदोलनाच्या वेळी सुद्धा चौकशी अधिकाऱ्यांनी योग्य चौकशी न करता यातील दोषींवर अजूनही कार्यवाही न करतापाठिशी घालण्याचे काम केल्याने पुन्हा या सर्व मुद्यांना घेत न्याय मिळविण्यासाठी आंदोलनात्मक मार्ग पत्करावा लागत असल्याचे पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर यांनी म्हटले आहे.





