लाखांदूर(बारव्हा)दि.2ः लाखांदुर तालुक्यातील बोथली वरून धर्मापुरी रस्त्यावर जिवघेण्या खड्डयाची निर्मिती झाल्याने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना आपला जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. गेल्या वर्षी धर्मापुरी रेतीघाटाचे लिलाव झाले असल्याने रेतीची वाहतूक या रस्त्याने होत असल्याने सदर डांबरीकरण रस्ता उखडून जागोजागी खड्डयाची निर्मिती झाल्याचे दिसून येत आहे.क्षेत्रातील जनप्रतिनीधीच्या दुर्लक्षीत धोरणामुळे नागरिकांना आपले जिव मुठीत घेऊन प्रवास करावे लागत आहे.
रेती वाहतूकीतून शासनाला लाखो रूपयाचा महसूल प्राप्त झाले,मात्र त्याचा फटका परिसरातील नागरिकांना बसत आहे. समोर काही दिवसातच पावसाला सुरुवात होणार असल्याने पावसाळ्यात ते खड्डे शोधण्याची वेळ येणार असल्याने सदर रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करुन डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद डोंगरे यांनी केली आहे. मागणी पुर्ण करण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरणार असल्याचेही डोंगरे यांनी सांगितले.बारव्हा(लाखांदूर)दि.02ः लाखांदुर तालुक्यातील बोथली ते धर्मापुरी रस्त्यावर जिवघेण्या खड्डे पडल्याने या मार्गावरून अवागमण करणाऱ्या वाहनधारकांना आपला जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे चित्र बघावयास मिळते.




