26.3 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ जिल्हाधिकारी मोडक यांच्या हस्ते लोकसंचालित साधन केंद्रांना ट्रॅक्टर व अवजारांचे वितरण

जिल्हाधिकारी मोडक यांच्या हस्ते लोकसंचालित साधन केंद्रांना ट्रॅक्टर व अवजारांचे वितरण

0
568

वाशिम, दि. ०५ (जिमाका) : विदर्भ विकास मंडळ विशेष निधी व मानव विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ८ लोकसंचालित साधन केंद्रांना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या हस्ते ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारांचे वितरण करण्यात आले. आज, ५ जून रोजी ‘माविम’ प्रांगण येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, ‘माविम’चे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

मानव विकास कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव व मानोरा या चार तालुक्यांचा समावेश आहे. प्रत्येक तालुक्यासाठी २ ट्रॅक्टरचे याप्रमाणे ‘माविम’ मार्गदर्शित लोकसंचालित साधन केंद्रांना ट्रॅक्टरसह ट्रॉली, रोटावेटर, पेरणीयंत्र, नांगर, पंजी, थ्रेशर व नवफनी आदी साहित्याचे वितरण करण्यात आले. यामध्ये पोहरादेवी व रिसोड येथील लोकसंचालित साधन केंद्रांला प्रत्येकी २, वाशिम, कळंबा महाली, मालेगाव-१ व मालेगाव-२ या लोकसंचालित साधन केंद्रांना प्रत्येकी १ ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारांचे वितरण करण्यात आले.

यावेळी सहाय्यक संनियंत्रण अधिकारी कल्पना लोहकपुरे, लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक संतोष मुखमाले, प्रदीप तायडे, शरद कांबळे, प्रमोद गोरे, राहुल गुडधे, तसेच सहयोगिनी प्रणिता भगत, शीला सावळे, प्रीती खडसे, जयश्री धाबे, जोत्स्ना पुरी, अनिता बरडे, माविम कार्यालयाचे राहुल मोकळे, गजानन हातोलकर, आनंद काळे यांची उपस्थिती होती.

लोकसंचालित साधन केंद्र हे बचत गटांचे फेडरेशन म्हणून काम करते. या केंद्राद्वारे महिला बचत गटांना हे ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारे भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे महिला बचत गटातील सदस्य महिलांना शेतीच्या कामामध्ये वेळेत तसेच माफक दरात ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारे वेळेत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच लोकसंचालित साधन केंद्रांनाही उत्पन्नाचा स्त्रोत मिळणार आहे.