अर्जुनी-मोरगाव,दि.08 : धानाचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर धानाचे पीक घेतले जाते. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात इटियाडोह धरण असल्याने खरीप प्रमाणेच उन्हाळ्यात सुद्धा रब्बी हंगाम म्हणून धान पिक घेतले जाते. यावर्षी इटियाडोह धरणाखाली असलेल्या शेतीला सिंचनाची सोय असल्याने रब्बी हंगामात धान पीक घेतले गेले व उत्पादनसुद्धा चांगले आले. ७ जूनला रोहिण नक्षत्राचा शेवट होत मृग नक्षत्र सुरू झाले आहे. तसे म्हटले तर शेतकर्याला मृग नक्षत्र म्हणजे अल्हाददायक मात्र पैसा हातात नसल्याने तोंडावर असलेला खरीप हंगामाचे नियोजन करायचे कसे या चिंतेने शेतकर्याला ग्रासली आहे.
गेल्या खरीप हंगामाचे पिक शेतकर्यांनी मोठ्या आशेने बोनस मिळेल म्हणून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला विकले शासनाने मोठा गाजावाजा करून पाचशे रुपये बोनस व २०० रुपये प्रोत्साहन भत्ता असे एकूण ७०० रुपये शेतकर्यांना देऊ अशी घोषणा केली. मात्र नोव्हेंबर-डिसेंबर मध्य विकलेला धानाचे अजून पर्यंत बोनस मिळाला नाही बोनस त्यामुळे खरीप हंगामाचे विकलेल्या धानाचे आधारभूत हमीभाव अठराशे १५ रुपये प्रतिक्विंटल शेतकर्यांच्या पदरात पडले बोनस म्हणून मिळणारा प्रति क्विंटल ७०० रुपयांचा लाभ अजून पर्यंत मिळाला नाही. त्यामुळे समोरील खरीप हंगामाचे नियोजन कसे करायचे हा प्रश्न शेतकर्यांच्या समोर आवासून उभा आहे तसेच रब्बी हंगामात निघालेला धान पिक शेतकर्यांनी सरकारी यंत्रणा जिल्हा मार्वेâटिंग फेडरेशन यांना आधारभूत हमीभाव अठराशे १५ रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे विकला. मात्र सव्वा महिन्याचा दीर्घ कालावधी लोटून सुद्धा अजून पर्यंत एका ही शेतकर्याला पैसे मिळाले नाही. त्यामुळे बळीराजाला समोरील खरीप हंगामाचे नियोजन कसे करायचे ही चिंता सतावत आहे खरीप हंगामाचा बोनस व रब्बी हंगामाचा प्रति क्विंटल पैसे न मिळाल्याने खरीप हंगामासाठी शेतीची मशागत खते कीटकनाशक धान बिजाई ट्रॅक्टर खर्च कसा करायचा हा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा ठाकला आहे.





