गोंदिया,दि.11ः– “सेवानिवृत्त अति.सीईओंचा जि.प.च्या कारभारात अतिक्रमण,बांधकाम विभाग लावतोय कोट्यावधीचा चूना”या मथळ्याखाली बेरार टाईम्स पोर्टलने बुधवार (दि.10)ला मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेत चांगलीच खळबळ माजली.विशेषत्वाने या बातमीची दखल संबधित विभागाच्या प्रमुखासह मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतली.वृत्त प्रसारित होताच मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.राजा दयानिधी यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व टेंडर क्लर्क यांना पाचारण करुन विचारणा केली.सेवानिवृत्त अति.मुकाअ यांच्याकडे प्रशासकीय कागदपत्रे का नेण्यात आली अशी सुध्दा विचारणा करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.त्याचप्रमाणे सध्या करोना संसर्गाच्या काळात शासनाने फक्त 33 टक्के कामांनाच मंजुरी दिली असून ते सुध्दा आवश्यक असल्यास असे स्पष्ट निर्देश असताना बांधकाम सभापतींनी 100 टक्के कामांचे वितरण करुन टाकले.त्या कामाच्या वितरणात सेवानिवृत्त अति.मुकाअ यांची महत्वाची भूमिका असून ही सर्व कामे 31 मार्च पुर्वी दाखविण्यासाठी सर्व खटाटोप सुरु असून सेवानिवृत्तीनंतर त्याकरीताच अति.मुकाअ हे गोंदियात तळ ठोकून बसल्याची चर्चा कंत्राटदार वर्गासह जिल्हा परिषदेत सुरु आहे.या सर्व प्रकरणात सीईओनी 33 टक्केच्यावर कुठलेच कामांना मंजुरी नाही असे सांगत मुलेअ यांना याबाबत निर्देश दिल्याची माहिती सुत्रांनी दिली.
तर एक अभियंता आपल्या पदाचा प्रभार आपल्या मनमर्जिने सोडून देत असल्याने मुख्यालय असलेल्या जिल्हा परिषदेला स्थायी अभियंताच नसल्याचीही बाब समोर आली आहे.गोंदिया उपविभागातंर्गत असलेले अभियंता टेंभुर्णीकर यांच्याकडे मुख्यालय असलेल्या प्रशासकीय इमारतीसह निवासस्थानाचे काम सोपविण्यात आले होते.मात्र त्यांनी जानेवारी 2020 मध्येच या कामाचा प्रभार सोडल्याने सध्याच्या घडीला कार्यकारी अभियंता,उपविभागीय अभियंता व अभियंता अशी तिन्ही कामे एकाच अधिकार्याला पार पाडण्याची वेळ आली आहे.यावरुन अभियंते सुध्दा मनमर्जीने काम करु लागले की त्यांनी मार्च 31 ला सेवानिवृत्त झालेल्या अतिरिक्त मुकाअ यांच्या जाचाला कंटाळून जानेवारीमध्येच मुख्यालय अभियंत्याचा पदभार सोडला या गोष्टीचा शोध घेण्याची वेळ आली आहे.त्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांच्या एंटीचेबरच्या दुरुस्तीसह रंगरगोंटीचे 3 लक्ष रुपयाचे काम करण्यात आले.या कामात मोठ्याप्रमाणात अनियमितता असून प्रशासकीय मान्यतेनुसार लागणार्या गोष्टी तिथे लागल्या नसून सुमारे 2 लाखाच्या वर त्या कामावर रक्कम खर्च झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.मात्र देयके मात्र पुर्ण 3 लाखाचे निघाल्याचे वृत्त आहे,अशाच प्रकार अनेक कार्यालयात सध्या सुरु आहे.तर मुख्य लेखा वित्त अधिकारी यांच्या कार्यालयाच्या कक्षाचे सुध्दा नुतनीकरणाचे काम दिडवर्षातच केले जात असून या कामाची सुरवात झाली असली तरी त्या कामाला प्रशासकीय मान्यता आहे की नाही याबाबत शंकांना पेव फुटले आहे. 31 मार्चला सेवानिवृत्त झालेले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हाशमी यांची कारकिर्द नेहमीच वादातीत राहीलेली असतानाच मंगळवार 9 जून रोजी त्यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभाग व लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यासह टेंडर क्लर्क व इतर कर्मचार्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील मानव विकास कार्यालयात कशासाठी बोलावले होते यासदंर्भातील वृत्त सर्वप्रथम बेरार टाईम्सने प्रकाशित केले होते.बांधकाम व पाटबंधारे विभागातील अधिकारी कर्मचारी आपल्या विभागातीले रेकार्ड का सेवानिवृत्त अधिकारीकडे घेऊन गेले या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे झाले असून विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी दखल घ्यावे असे म्हटले होते.




