भंडारा,दि.15 :-कृषि विज्ञान केंद्र, साकोली जिल्हा भंडारा आणि कृषिरत्न शेतकरी समूह यांच्या संयुक्त वि|माने दिनांक १४ जुन २०२० रोजी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून ‘‘खरीप हंगामातील भाजीपाला लागवड तंत्रज्ञान’’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये श्री. सूचित काशीराम लाकडे, विषय विशेषज्ञ (उ|kनवि|k), कृषि विज्ञान केंद्र,साकोली यांनी भाजीपाला पिकांचे रोपवाटिका व्यवस्थापन आणि खरीप हंगामातील प्रमुख भाजीपाला पिकांचे सुधारित लागवड तंत्रज्ञान याविषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी बोलतांना त्यांनी भाजीपाला लागवड करतांना जातिवंत बियान्यांचे महत्व विशद करतांना संगितले की शेतकरी बंधूंनी नेहमी प्रमाणित किंवा सत्यप्रत बियाण्यांचाच वापर करायला पाहिजे,सोबतच बियान्यांची उगवण क्षमता, बियाणे शुद्धता व बियाणे वापरण्याची शेवटची तारीख या बाबत शहानिशा करणे गरजेचे आहे. भाजीपाला पिकांची लागवड करण्यापूर्वी बियाण्यांची बिजप्रक्रिया करणे अतिशय महत्वाचे असून त्यामुळे प्राथमिक अवस्थेतच कीड व रोगांचे व्यावस्थापन होत असते व त्यामुळे रोपवाटीकेत तसेच पुणर्लागवड केलेल्या मुख्य शेतातसुद्धा कीड रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो असे सांगितले. रोपवाटिका तयार करतांना जागेची निवड नेहमी उंचवट्यावर आणि पाण्याची सोय जवळ असलेल्या ठिकाणी करावी ज्यामुळे रोपवाटीकेला वेळोवेळी पाणी देणे सोयीचे होईल, त्याचप्रमाणे रोपवाटिका तयार करतांना त्यामध्ये चांगले कुजलेले आणि बारीक केलेले शेणखत किंवा गांधुळखत आणि १ किलो डी.ए.पी. किंवा मिश्र खत मिसळावे जेनेकरून रोपांची वाढ ही सारखी आणि जोमदार होईल. रोपवाटीकेसाठी गादीवाफे तयार करतांना गादीवाफ्याचा आकार हा २ मीटर लांब आणि १ मीटर रुंद तर २५ से.मी. उंच असावा. बियाणे पेरणी करतांना रुंदीच्या समानांतर बोटाच्या किंवा काडीच्या सहाय्याने १० से.मी. अंतरावर सरळ रेषा पाडून त्यामध्ये बियाणे पेरावे व हलक्या हाताने झाकून लगेच झारीने पाणी |kवे. रोपवाटीकेमध्येच प्रत्येक वाफ्यामध्ये २५ ग्रॅम शिफारस असेलेले दानेदार कीटकनाशक टाकल्यास रस शोषण करणार्या किडींचा सुद्धा बंदोबस्त करता येऊ शकते असे प्रतिपादन केले. याशिवाय याप्रसंगी बोलतांना त्यांनी खरीप हंगामात लागवड करण्यात येणारी मुख्य भाजीपाला पिके जसे की टोमॅटो, वांगी,मिरची, भेंडी, शेवगा तसेच वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये कोणत्या संशोधित आणि संकरीत वाणांची निवड करावी, बियान्यांचे प्रमाण किती असावे,लागवडीचे अंतर किती ठेवावे, प्लॅस्टिक आच्छादन व ठिबक सिंचनाचे फायदे काय आहेत, खत व पाणी व्यवस्थापन कसे करावे आणि कीड रोगांचे व्यवस्थापन कशा पद्धतीने करावे याविषयी सखोल मार्गदर्शन केले.




