भंडारा दि.22 (जिमाका) भंडारा जिल्ह्यात आज 2 (22 जून) नव्या रुग्णाची भर पडली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 77 वर गेली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या अहवालात एक भंडारा, एक तुमसरचा रुग्ण आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 49 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यात आता 28 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या 77 एव्हढी झाली आहे.
आतापर्यंत 3562 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.त्यापैकी आतापर्यंत 77 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर 3384 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 101 नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.
आज 22 जून रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 33 व्यक्ती भरती असून आतापर्यंत 428 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर व मोहाडी येथे 369 भरती आहेत. 2681 व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईन मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे, मुंबई व इतर राज्यातून 43378 व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले असून 38679 व्यक्तींचा 28 दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या 4699 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांनी घरामध्येच रहावे, घराबाहेर पडू नये अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.





