30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते व्यवसाय मार्गदर्शन तथा समुपदेशन कक्षाचे आज...

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते व्यवसाय मार्गदर्शन तथा समुपदेशन कक्षाचे आज उद्घाटन

‘गुगल फॉर्म’द्वारे सर्वेक्षणाचा शुभारंभ

0
608

वाशिम, दि. २९ (जिमाका) : कोविड १९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जाहीर झालेल्या लॉकडाऊनमध्ये विविध महानगरातून वाशिम जिल्ह्यात परतलेल्या युवक-युवतींनी धारण केलेल्या कौशल्यांची माहिती संकलित करण्यासाठी सर्व्हे करण्यात येणार आहे. याकरिता जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता व रोजगार मार्गदर्शन केंद्राच्यावतीने ‘गुगल फॉर्म’ची निर्मिती करण्यात आली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत २९ जून रोजी या सर्व्हेचा शुभारंभ होणार आहे. तसेच व्यवसाय मार्गदर्शन तथा समुपदेश कक्षाचे उद्घाटनही यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते होणार आहे.

जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली या व्यवसाय मार्गदर्शन तथा समुपदेशन कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. लॉकडाऊन काळात जिल्ह्यात परतलेल्या युवक-युवतींचा रोजगार व स्वयंरोजगाराबाबत कल जाणून घेवून खासगी क्षेत्रात उपलब्ध संधी, स्वयंरोजगाराची क्षेत्रे, प्रकल्प अहवाल तयार करण्याची पद्धत, विविध शासकीय महामंडळाच्या योजना, अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे याबाबत सविस्तर माहिती व्यवसाय मार्गदर्शन तथा समुपदेशन कक्षाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी दिली.