कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची आयुक्तांशी चर्चा

0
10

भंडारा दि.१0: महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ जिल्हा भंडार्‍याचे पदाधिकारी जिल्हयातील कर्मचार्‍यांच्या समस्या संदभा्रत आयुक्त आय. ए. कुंदन, सहसंचालक संजीव जाधव व इतर अधिकारी सोबत यशस्वी चर्चाकरण्यात येवून त्वरित प्रश्न सोडविण्याचे आश्‍वासन दिले.
भंडारा जिल्हयाचे विभाजन नंतर मुळ पदस्थापना भंडारा जिल्ह्याची असून विभाजनाने गोंदिया जिल्हयात गेलेले व स्थानांतरनाने भंडारा जिल्हयात परत आले अशा कर्मचार्‍यांना मुळ पदस्थापनेपासून कर्मचार्‍यांची सेवाजेष्ठता देऊन ज्येष्ठतेप्रमाणे देण्यात यावी. परंतु जिल्हा प्रशासनाने कर्मचार्‍यांच्या प्रश्नाविषयी उदासीनता दाखविल्यामुळे कोणतीही कारवाईझाली नाही, ही समस्या अधिवेशपूर्वी सोडविल्या जातील असे संघटनेला आश्‍वासन दिले.
जि.प. मुद्रणालय भंडारा येथील ८ कर्मचार्‍यांपैकी एकाच कर्मचार्‍याला शासकीय सेवेत कायम स्वरुपी सामावून घेण्यात आले. याबाबत ना. सुधीर मुनगंटीवार तसेच ग्रामीण विकास प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांनी सदर प्रकरणाची चौकशी करुन इतर कर्मचार्‍यांना सुध्दा सामावून घेण्यात येईल असे डॉ. गिते यांनी सांगितले.
खाजगी व नगर पालिका शाळेतील शिक्षकेत्तर लिपीक, शिपाई, कर्मचार्‍यांना कालबध्द पदोन्नती लागू करण्यासंबंधी संघटनेनी वारंवार मुद्दा मांडल्यामुळे सदर प्रश्न शासन स्थरावर कार्यवाही सुरु असल्याचे शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांनी संघटनेला आश्‍वासन दिले. भु. विकास बँकेचे कर्मचार्‍यांचे पगार २९ महिण्यापासून नाही. त्यासंबंधी सहकार सचिव शैलेशकुमार शर्मा, उपसचिव संतोष पाटील तसेच अवसायक मुकने यांचेशी चर्चाकरुन पगार देण्याबाबत चर्चाकरण्यात आली.
प्रश्नांवर चर्चाकरतांना कास्ट्राईब महासंघाचे महाराष्ट्राचे राज्यध्यक्ष, अरुण गाडे, उपमहासचिव सुर्यकांत हुमणे, जिल्हा अध्यक्ष विनय सुदामे, शैलेंद्र जांभुळकर, प्रा. तायडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.