तुमसर पंचायत समिती सभापतिपदाची चावी शिवसेनेकडे

0
13

तुमसर दि.१0: : तुमसर पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीकरिता रस्सीखेच सुरू असून भाजप तथा राकाँत मोर्चेबांधणीला वेग आला आहे. सेनेचे दोन मते येथे निर्णायक ठरणार आहे. येथे सभापतीपद सर्वसाधारण महिला प्रवर्गाकरिता राखीव आहे.
मागील खेपेला तुमसर पंचायत समितीवर भाजपचेच वर्चस्व होते. पुन्हा ते वर्चस्व प्रस्थापित करण्याकरिता प्रयत्नशिल आहेत. भाजपकडून सभापती करिता कविता बनकर व उपसभापती करीता शिवसेनेचे शेखर कोतपल्लीवार यांच्या नावाची चर्चाआहे तर राकाँकडून सरीता गौपाले यांचे नाव आघाडीवर आहे.
तुमसर पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक १२ जुलै रोजी होत आहे. २0 सदस्यीय पंचायत समितीमध्ये भाजपचे सर्वाधिक ९ सदस्य, राकाँ ७, सेना २, काँग्रेस १, अपक्ष १ अशी स्थिती आहे. येथे बहुमताकरिता ११ सदस्यांची गरज आहे. भाजप व सेना २ एकत्र आले तर सभापती व उपसभापतीपद त्यांना सहज प्राप्त होते. येथे राकाँ ७, अपक्ष १, काँग्रेस १ व सेना २ असे समीकरण जुळले तर राकाँचा सभापती होऊ शकतो अशी सध्या चाचपणी सुरूआहे, परंतु सेनेकडे शेखर कोतपल्लीवार व जितेंद्र सरीयाम दोन्ही पुरूष असल्याने त्यांना राकाँकडे गेल्यावरही उपसभापतीपदावरच समाधान मानावे लागेल. त्यामुळे राकाँकडे सेनेचे दोन्ही सदस्य जाण्याची शक्यता कमीच आहे.