तिरोडा,दि.०४-कोरोनामुळे संपूर्ण देशात थैमान घातले असून या महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यातच माजी सैनिकांनी कसल्याही प्रकारचे शासनाकडून आर्थिक सहाय्यता न घेता आपले जीव धोक्यात घालून १० एप्रिल पासून सेवा देत आहेत व प्रशासणाला मदत केली आहे.त्या अनुषंगाने शासनाच्या कोणत्याची विभागात माजी सैनिकांना प्रथम प्राधान्य देणे, कोव्हीड -१९ काळात केलेल्या सेवेचे प्रशस्तीपत्र जिल्हाधिकारी महोद्यांकडून देणे,१० एप्रिल २०२० पासून वाहन व दैनिक भत्ता देण्याबाबत शासनाकडे मागणी केली आहे व या बाबतचे निवदेन आमदार विजय रहांगडाले यांना दिले आहे. निवेदन देते वेळी माजी सैनिक अनिल अंबुले, डोमा चौधरी, लीलाधर शेंडे, घनश्याम बिसेन, सुरेश चौधरी, बंसीधर चौधरी, रजींत रहांगडाले, दिगम्बर सोनेवाने, गणेश रहांगडाले, विजय कटरे, चंद्रकुमार साठवणे, जितेंद्र पारधी, महेश ठाकूर,महेश पटले, डामेश जमइवार, योगीनंद घरजारे, राजेश पटले, जयेंद्र पटले, फनेन्द्र चौधरी उपस्थित होते.