29.6 C
Gondiā
Monday, May 12, 2025
Home Blog Page 5662

१५ सप्टेबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

0

हवामान खात्याचा अंदाज १५ सप्टेबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा
गोंदिया,दि.१२ : हवामान विभाग नागपूर यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार विदर्भातील काही भागात १३ ते १५ सप्टेबर या कालावधीत अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तरी जनतेनी जिवित व वित्तहानी टाळण्यासाठी सतर्क राहून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.

जिल्ह्यात सरासरी ८९८.७ मि.मी.पाऊस

0

२४ तासात सरासरी ६१.१ मि.मी.पाऊस
सालेकसा, आमगाव व देवरी तालुक्यात अतिवृष्टी
गोंदिया,दि.१२ : जिल्ह्यात १ जून ते १२ सप्टेबर २०१६ या कालावधीत २९६५७.५ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी ८९८.७ मि.मी. इतकी आहे. आज १२ सप्टेबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात २०१६.६ मि.मी. इतका पाऊस पडला असून त्याची सरासरी ६१.१ मि.मी. इतकी आहे. आजपावेतो जिल्ह्यात ७५ टक्के पाऊस झाला आहे. देवरी तालुक्यात मुल्ला मंडळ विभागात ५५.६ मि.मी., देवरी मंडळात १०५ मि.मी., चिचगड मंडळात ६६ मि.मी. पाऊस पडला, असा एकूण देवरी तालुक्यात सरासरी ७५.५ मि.मी. पाऊस पडला. आमगाव तालुक्यात कट्टीपार मंडळ विभागात ५५.२ मि.मी, आमगाव मंडळात १५८ मि.मी., तिगाव मंडळात ११२.८ मि.मी., ठाणा मंडळात ७८.४ मि.मी. पाऊस पडला, असा एकूण आमगाव तालुक्यात सरासरी १०१.१ मि.मी. पाऊस पडला. सालेकसा तालुक्यात कावराबांध मंडळ विभागात २१३ मि.मी., सालेकसा मंडळात १९५.४ मि.मी., साकरीटोला मंडळात १५४ मि.मी. पाऊस पडला, असा एकूण सालेकसा तालुक्यात सरासरी १८७.५ मि.मी. पाऊस पडल्याने अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे.
१२ सप्टेबर रोजी सकाळी ८ वाजता पर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस पुढील प्रमाणे असून त्याची सरासरी कंसात दर्शविण्यात आली आहे. गोंदिया तालुका- १४६ मि.मी. (२०.९), गोरेगाव तालुका- १६६.३ मि.मी. (५५.५), तिरोडा तालुका- ७८.९ मि.मी. (१८.८), अर्जुनी मोरगाव तालुका- २५८.८ मि.मी. (५१.८), देवरी तालुका- २२६.६ मि.मी. (७५.५), आमगाव तालुका- ४०४.४ मि.मी. (१०१.१), सालेकसा तालुका- ५६२.४ मि.मी. (१८७.५) आणि सडक अर्जुनी तालुका- १७३.२ (५७.७), असा एकूण २०१६.६ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी ६१.१ मि.मी. इतकी आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गोंदिया पर्यटन व सारस माहितीपटाचे विमोचन

0

 berartimes.com

गोंदिया दि. 12 : गोंदिया जिल्हयातील पर्यटनस्थळांवर आधारीत असलेल्या गोंदिया इसेन्स ऑफ इंडिया आणि राज्यात केवळ गोंदिया जिल्हयात आढळणाऱ्या दुर्मिळ अशा सारस पक्षावरील सारस वैभव गोंदियाचे या दोन्ही माहितीपटाचे
विमोचन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते आज दीक्षाभूमी येथील सभागृहात नागपूर विभागातील विविध योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात तालूकास्तरीय आढावा सभेत करण्यात आले. या प्रसंगी पालकमंत्री राजकुमार बडोले,उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय,मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव प्रविण परदेशी,पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार,उर्जा विभागाचे प्रधान सचिव विपीन श्रीमाळी, सामाजीक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुरेंदकुमार
बागडे,ग्रामविकास सचिव असीम गुप्ता, जलसंधारण सचिव डॉ. पुरूषोत्तम भापकर, कृषी आयूक्त विकास देशमुख,जमाबंदी आयुक्त एस पी कडू पाटिल, विभागीय आयुक्त अनुप कुमार, मनरेगा आयुक्त अभय महाजन व गोंदिया जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकारी,सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्हा तलावांचा व धानाचे कोठार म्हणून ओळखला जातो. हा जिल्हा वनराई व वन्यजीवांनी समृध्द असून जिल्हयात नवेगांवबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्प,हाजफॉल,चुलबंद,बोदलकसा,मांडोदेवी यासह अनेक पर्यटन व तिर्थस्थळे आहेत. या स्थळांची माहिती राज्यभर व्हावी व जास्तीत जास्त पर्यटक व वन्यजीवप्रेमी पर्यटनासाठी व सारस पक्षांसह वन्य-प्राण्यांना बघण्यासाठी गोंदिया जिल्हयात यावे यासाठी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या मार्गदर्शनातून व जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतून जिल्हा पर्यटन समितीने तयार केलेला गोंदिया इसेन्स ऑफ इंडिया हा माहितीपट 13 मिनीटाचा आहे. या माहितीपटात पाहुणे कलाकार म्हणून प्रसिध्द अभिनेते डॉ. गिरीष ओक यांनीसुध्दा काम केले आहे.

गोंदिया जिल्हयातील धानाची शेती,विदेशात निर्यात होणारा  उच्च प्रतीचा तांदुळ,नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पातील वनराई-वन्यजीव चुलबंद,बोदलकसा, नवेगावबाध जलाक्षय,इटियाडोह प्रकल्प,बोदलकसा,चुलबंद,हाजराफॉल तसेच जिल्हयातील दंडार ही लोककला, ऐतिहासिक व तिर्थक्षेत्र असलेले कचारगड, मांडोदेवी,तिबेटियन शरणार्थी वसाहत यासह अनेक पर्यटन स्थळांची माहिती या माहितीपटातून  देण्यात आली आहे.
राज्यात केवळ गोंदियात आढळणाऱ्या दुर्मिळ व सुंदर दिसणाऱ्या सारस पक्षांसह जिल्हयातील मालगुजारी तळावांवर येणाऱ्या स्थलांतरीत व विदेशी पक्षांवर जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया यांनी तयार केलेल्या सारस वैभ्भ्‍व गोंदियाचे या वृत्तपटात सारस पक्षांचे सौदर्य आणि प्रेमाचे प्रतिक म्हणून दिलेली उपमा, ऐतिहासिक काळापासून आदिवासी बांधवांमध्ये सारस पक्षांच करण्यात येत असलेल पूजन, मागील वर्षीपासून जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून सारस पक्षांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी  आयोजित करण्यात येत असलेला सारस महोत्सव, सारस पक्षांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी उभी झालेली लोकचळवळ, पर्यटक आणि पक्षीप्रेमींनी सारस पक्षांना बघण्यासाठी गोंदिया जिल्हयात येण्यासाठी घातलेली साद या वृत्तपटातून सारस पक्षी गोंदिया जिल्हयाचे वैभव असल्याचे वर्णन करण्यात आले आहे.या माहितीपट व वृत्तपटाच्या विमोचन प्रसंगी नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकारी,सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा अधिक्षक  कृषी अधिकारी,उपजिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी,उप मुख्य कार्यकारी अधिकारी,तहसिलदार,गट विकास अधिकारी,तालुका कृषी अधिकारी यांचेसह अन्य यंत्रणाचे अधिकारी देखील उपस्थित होते.

स्वच्छ नागपूर मोबाईल ॲपचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोर्कापण

0

 berartimes.com

नागपूर दि. 12 :-   स्वच्छ शहर, सुंदर शहर ही संकल्पना साकार करत

असताना प्रत्येक नागरिकांच्या योगदानाची आवश्यकता असून शहरातील
नागरिकांच्या तक्रारीसाठी महानगरपालिकेतर्फे मोबाईल ॲप तयार करण्यात आला
असून मोबाईल ॲपचे लोर्कापण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
झाले.

            दीक्षाभूमी येथील सभागृहात स्वच्छ नागपूर या गुगल प्लेस
स्टोअरवरील मोबाईल ॲपचे लोर्कापण समारंभास पालकमंत्री चंद्रशेखर
बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महापौर प्रवीण दटके,
मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय,  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण
परदेशी,  विभागीय आयुक्त अनूप कुमार, महानगर पालिका आयुक्त श्रावण
हर्डीकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

स्वच्छ नागपूर हे मोबाईल ॲप व ऑनलाईन ट्रॅकींग शहरातील पाच लाख घरापर्यंत
पोहचविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात लक्ष्मीनगर झोन परिसरातील 50
हजार घरापर्यंत ही सेवा उपलब्ध होणार आहे. स्वच्छ नागपूरमध्ये सहभागी
होण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर स्वच्छ नागपूर ॲप शोधून इस्टांल करणे
आवश्यक आहे. आपण नोंदविलेल्या तक्रारीवर होणाऱ्या कार्यवाहीचा तपशील
तक्रार कर्त्याला या ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन बघता येणार आहे. या
प्रकारची पारदर्शी घनकचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया राबविणारी पहिली
महानगरपालिका असून संपूर्ण नागपुरात ही सेवा लवकरच उपलब्ध करुन देण्यात
येणार असल्याची माहिती महापौर प्रवीण दटके यांनी यावेळी दिली.

प्रारंभी महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वागत करत
प्रास्ताविकात स्वच्छ नागपूर मोबाईल ॲप बद्दल माहिती दिली.

विदर्भातील पहिल्‍या टेक्‍सटाईल पार्कचे भूमिपूजन

0

टेक्‍सटाईल पार्कमुळे कृषी क्षेत्रात बदल घडू शकतो – मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

berartimes.com
वर्धा, दि.11 – टेक्‍सटाईल पार्कच्‍या माध्‍यमातून शेतकरी आणि उद्योगाच्‍या सहकार्याने कृषी क्षेत्रात बदल घडू शकतेा. शेतीपूरक उद्योग आणि मुल्‍यवर्धित प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातून मोठया प्रमाणात शेतक-यांपर्यंत पैसा पोहोचवून त्‍यांच्‍या जीवनात आमुलाग्र बदल घडवण्‍यासाठी शासनाने इंटिग्रेटेड टेक्‍सटाईल पार्क योजना सुरु केली .यामुळे मध्‍यस्‍थांची साखळी दूर होऊन शेतकऱ्यांच्‍या कापसाला चांगला भाव मिळेल असे प्रतिपादन राज्‍याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगणघाट येथे विदर्भातील पहिल्‍या इंटिग्रेटेड टेक्‍सटाईल पार्कच्‍या भूमिपूजन  प्रसंगी केले.

            हिंगणघाट जवळ वणी येथे असलेल्‍या गिमाटेक्‍स इंडस्टि्रज प्रायव्‍हेट लिमिटेड यांच्‍या हिंगणघाट इंटिग्रेटेड टेक्‍सटाईल पार्कचे भू‍मीपूजन आणि नविन विस्‍तारित स्पिनींग युनीट चे उद्घाटन मुख्‍यमंत्र्यांचे हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत  होते. या कार्यक्रमाला राज्‍याचे वित्‍त व नियोजन मंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, आमदार समिर कुणावार, डॉ. पंकज भोयर, गिमाटेक्‍स कंपनीचे अध्‍यक्ष
वसंतकुमार मोहता, व्‍यवस्‍थापकीय संचालक प्रशांतकुमार मोहता, अनुरागकुमारमोहता, जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल, जिल्‍हा पोलिस अधिक्षक अंकित गोयल,भाजपचे जिल्‍हा‍ध्‍यक्ष राजेश बकाने उपस्थित होते.

             आज महाराष्‍ट्र हे कापूस  उत्‍पादक राज्‍य म्‍हणुन ओळखले जाते. राज्‍यात निर्माण होणा-या कापसापैकी 25 टक्‍के कापसावर प्रक्रिया होते, उर्वरित 75 टक्‍के कापसावर पूरक उद्योगाच्‍या साखळी अभावी आपण प्रक्रिया करु शकत नाही. यासाठी   इंटिग्रेटेड टेक्‍सटाईल पार्क ही योजना शासनाने  सुरु केली असून त्‍यातील पहिला पार्क विदर्भातील हिंगणघाट येथे सुरु होत असल्‍याबाबत त्‍यांनी मोहता कुंटूबियाचे अभिनंदन केले. यापुढे उद्योजक शेतक-यांकडून थेट कापूस खरेदी करतील. त्‍यामुळे शेतक-यांच्‍या कापसाला चांगला भाव मिळेल. यामध्‍ये कुणाचीही मध्‍यस्‍थी नसल्‍यामुळे थेट शेतक-याला कापसाची परिपूर्ती मिळेल. उद्योग आणि शेतक-यामध्‍ये सहकार्य असेल तर नव-नवीन तंत्रज्ञान शेतक-यापर्यंत पोहचवता येईल. कापसाची उत्‍पादकता वाढविण्‍यासाठी सुध्‍दा उद्योगाने संशोधन करुन ते शेतक-यांपर्यंत पोहचविले पाहिजे असेही मुख्‍यमंत्री यांनी यावेळी म्‍हणाले.

            यावेळी बोलतांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले,शेतक-याच्‍या जीवनात बदल घडविण्‍यासाठी शासन फार्म टू फॅशन ही संकल्‍पना रा‍बवित आहे. त्‍याचा प्रत्‍यय इंटिग्रेटेड टेक्‍सटाईल पार्क च्‍या माध्‍यमातून आज येत आहे. हिंगणघाट सारख्‍या छोटया शहरात मोहता कुंटूंबियाच्‍या सहा पिढयांपासून कापड प्रक्रिया उद्योग सुरु आहे.यामध्‍ये इंटिग्रेटेड टेक्‍सटाईल पार्कमुळे नविन तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून उच्‍च गुणतत्‍तेच्‍या कापडाची निर्मिती होईल, असा विश्‍वास त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केला.  यावेळी वसंतकुमार मोहता यांनी गिमाटेक्‍स इंडस्‍ट्रीबाबत माहिती दिली. तर अनुरागकुमार मोहता यांनी इंटिग्रेटेड टेक्‍सटाईल पार्कबाबत प्रस्‍तावना केली. यावेळी गिमाटेक्‍स इंडस्‍ट्रीच्‍या वतीने तयार करण्‍यात आलेल्‍या जी फोर्स या अॅपचे लोकार्पण  करण्‍यात आले.यावेळी  कार्यक्रमाला उद्योजक, नागरिक मोठया संख्‍येने उपस्थित होते.

जलयुक्त शिवार अभियानासाठी मुख्यमंत्रीकडे ५० हजाराचा धनादेश सुपूर्द

0

berartimes.com नागपूर दि. १2 :- महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या ‘जलयुक्त शिवारङ्क या महत्त्वाकांक्षी अभियानाचा चांगला परिमाण आज सर्वत्र दिसून येत आहे. या अभियानाने प्रेरित होऊन सेन्ट्रल एक्साईज कार्यालयाचे अधिक्षक रमेश थोटे यांनी रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जलयुक्त शिवार योजनेसाठी त्यांच्या वतीने ५० हजार रूपयांचा धनादेश सुपूर्द केला.

रमेश थोटे यांनी सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीतून प्राप्त झालेली संपूर्ण रक्कम जलयुक्त शिवार योजनेसाठी दिली. जलयुक्त शिवार या अभिनव उपक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समाजाच्या सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे. अधिक्षक रमेश थोटे यांच्यापासून समाजबांधवांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले .

झारखंडमध्ये माओवाद्यांचा नेता चकमकीत ठार

0
वृत्तसंस्था
रांची – झारखंडमधील गुमला जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत माओवाद्यांचा नेता आशिष यादव ठार झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुमला जिल्ह्यातील पालकोट जंगलक्षेत्रात रविवारी दुपारी ही चकमक झाली. या चकमकीत माओवाद्यांचा नेता म्हणून प्रसिद्ध असलेल्या आशिष यादवला ठार मारण्यात यश आले आहे. त्याच्याकडून मोठ्याप्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
 
केंद्रीय राखीव पोलिस दल आणि पोलिसांनी संयुक्तरित्या मोहिम राबवत ही कारवाई केली. माओवाद्यांच्या बिहार-झारखंड विशेष भाग समितीचा तो नेता होता. आशिष यादववर सरकारकडून 25 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.

न्यूझीलंडविरोधी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, रहाणे उपकप्तान

0
मुंबई, दि. १२ – न्यूझीलंडविरुद्ध भारतात खेळल्या जाणा-या कसोटी मालिकेसाठी यजमान भारतीय संघ जाहीर झाला असून रोहित शर्मा व चेतेश्वर पुजाराला आणखी एक संधी देण्यात आली आहे. संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समितीने सोमवारी संघाची घोषणा केली. येत्या २२ सप्टेंबरपासून ही कसोटी मालिका सुरू होणार आहे.
कसोटी सामन्यातील रोहितच्या निराशाजनक कामगिरीनंतरही कर्णधार विराट कोहलीने त्याच्यावर विश्वास दाखवला असून  वन-डे स्पेशालिस्ट रोहितला कसोटी क्रिकेटमध्ये अधिक संधी मिळायला हवी असे मत त्याने मत मांडले होते. आघाडीच्या फळीतील अन्य एक फलंदाज चेतेश्वर पुजारावर नेहमी टांगती तलवार असते, मात्र न्युझीलंडविरोधात घरच्या मैदानावर होणा-या या मालिकेत त्याचा समावेश करण्यात आला आहे.
भारतीय संघ:  विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, मुरली विजय, रोहित शर्मा, आर.अश्विन, वृद्धीमान सहा, रवींद्र जडेजा, शमी, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, शिखर धवन, अमित मिश्रा, उमेश यादव.

स्वबळावर लढण्यासाठी कामाला लागा !-प्रफुल्ल पटेल

0

अकोला : काँग्रेस पक्षाचा आतापयर्ंत कटू अनुभव लक्षात घेता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यानी आतापासूनच स्वबळावर कामाला लागावे, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी येथे केले. राष्ट्रवादी पक्षाचे जेवढे नुकसान काँग्रेसने केले, तेवढे कोणीही केले नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीची बदनामी करण्याची कोणतीच कसर सोडली नाही. ‘खुद तो डुबे सनम, हमको भी ले डुबे’ अशा पद्धतीची काँग्रेसची राकाँसोबत खेळी राहीली, असे टीकास्त्र प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसवर सोडले.
महेश भवनात खा. प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. खा. पटेल म्हणाले की, काँग्रेसशिवाय दलित आणि अल्पसंख्याकांना दुसरा पर्याय नाही असा या पक्षाचा गैरसमज आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र तसे नाही. अल्पसंख्याकाच्या प्रश्नावर राष्ट्रवादीने वेळप्रसंगी संघर्षही केला आहे. ही बाब सलत असल्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादीचे नेहमीच पाय ओढले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर असून कार्यकर्त्यांनी आतापासूनच 8कामाला लागावे.