नक्षलग्रस्त भागातील जेठभावडा शाळा झाली ‘आयएसओ‘

0
15

शंभर टक्के आदिवासींचे गाव : विविध उपक्रमांची दखल ; पवनचक्की, सौरउर्जेचा वापर
गोंदिया,दि.२९ : देवरी तालुक्यातील जेठभावडा हे शंभर टक्के आदिवासी वस्तीचे गाव. या गावातील नागरिकांमध्ये शिक्षणाप्रती रुची निर्माण करण्यात शाळेतील शिक्षकांना यश आले. विविधांगी शिक्षण, विविध उपक्रम राबविण्यात आले. प्रभाग, तालुका आणि जिल्हास्तरीय अनेक पुरस्कार या शाळेच्या नावावर आहेत. नुकतेच या शाळेला ‘आयएसओङ्कचे प्रमाणपत्र बहाल करण्यात आल्याने या शाळेच्या शिपरेचात पुन्हा मानाचा तुरा रोवला गेला. आयएसओ नामांकन मिळविणारी ही जिल्ह्यातील पहिलीच शाळा ठरली.
देवरी तालुका तसा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील. अविकसीत तालुका म्हणून ओळख अद्यापही पुसली गेली नाही. ही ओळख नाहिशी करण्याकरिता अनेक होतकरू झटत आहेत. काहींना यश देखील आले. आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त भागाच्या विकासाकरिता शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. असे असताना देखील त्या भागाचा विकास अद्याप झाला नाही. त्याला कारण प्रशासनातील कर्मचाèयांची विकासाप्रती अनास्था, असाच आत्तापर्यंत समज होता. मात्र, देवरी तालुक्यातील जेठभावडा या शंभर टक्के आदिवासी वस्ती असलेल्या गावाच्या प्रगतीचे गोडवे जिल्हास्तरीय अधिकारी देखील गाऊ लागले आहेत. एक ते चार इयत्ता असणाèया जेठभावडा शाळेचे मुख्याध्यापक किशोर गर्जे यांनी आपल्या सहकाèयांसह शाळेतील शिक्षणाकडे विद्यार्थी आणि पालक कसे आकर्षित होतील, याकरिता जीवाचे रान केले. आजघडीला या शाळेतील विद्याथ्र्यांची उपस्थिती शंभर टक्के आहे. या शाळेत विजेचा वापर न करता पवनचक्की आणि सौरउर्जेचा वापर करण्यात येतो. जिल्ह्यातील पहिली वीजमुक्त शाळेचा मान देखील याच शाळेच्या नावावर आहे. बालोद्यानाची संकल्पना देखील येथे रुजविण्यात आली. या शाळेला आजतागायत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यात २००५-०६ या वर्षातील सानेगुरुजी स्वच्छ शाळेचा तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार, शैक्षणिक गुणवत्ता विषय कार्यक्रमात २००६-०७ या वर्षात शाळेने ६९ गुण घेऊन तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. सानेगुरुजी स्वच्छ शाळा २००७-०८ चा तालुकास्तरीय प्रथम, गावची शाळा आमची शाळा या उपक्रमात २०१३-१४ या वर्षातील प्रभागातून तिसरा, साने गुरुजी स्वच्छ शाळेचा २०१२-१३ या वर्षीचा तालुकास्तरीय प्रथम, गावची शाळा आमची शाळा या उपक्रमात २०१३-१४ या वर्षीचा तालुकास्तरीय प्रथम आणि साने गुरूजी स्वच्छ शाळा या स्पर्धेत २०१४-१५ या वर्षीचा जिल्हा स्तरीय प्रथम पुरस्कार शाळेला मिळाला.
विद्याथ्र्यांनी गावात श्रमदानातून वनराई बंधारा बांधला. सावित्रीबाई जयंतीनिमित्त शाळेने रक्तदान शिबीर घेतला. बालकदिनामित्त स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता करण्यात आली. नवरात्रोत्सवानिमित्त अंधश्रद्धा निर्मुलन कार्यक्रम, तीन दिवसीय निःशुल्क तायक्वांदो शिबीर आणि सिकलसेल रक्तनिदान शिबीर घेतले. या शाळेने आयएसओ नामांकनाकरिता ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केला. १९ ऑक्टोबर रोजी पुणे येथील तपासणी चमुने शाळेतील सोयी-सुविधा आणि उपक्रमांची माहिती जाणून घेतली. अखेर शाळेच्या प्रयत्नांना यश आले. दोन दिवसांपूर्वी या शाळेला आयएसओचे नामांकन मिळाले. नामांकन मिळविणारी ही जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली. शाळेत विविध उपक्रम राबविण्याकरिता मुख्याध्यापक किशोर गर्जे यांना सरपंच जे.पी. रहांगडाले, उपसरपंच भोजराम गावडकर, शिक्षक विनोद मेश्राम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकरराव गावडकर आणि गावकèयांची तसेच वरिष्ठांची वेळोवेळी मदत लाभली. आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील या शाळेने जिल्हापरिषदेच्या दिवसेंदिवस बंद पडत असलेल्या शाळांतील शिक्षकांसमोर आदर्श घालून दिला.