UPSC नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातील ८७ हून अधिक उमेदवार यशस्वी,गोरेगावची काजल व गोंदियाच्या युगलचे यश

0
45

नवी दिल्‍ली, 17: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत देशातील एकूण 1016 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 87 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास 8.6 टक्के महाराष्ट्रातून आहेत. राज्यातून समीर प्रकाश खोडे प्रथम आले असून देशात त्यांनी 42 वा क्रमांक पटकाविला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष 2023 च्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात  पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील तीन उमेदवारांचा समावेश आहे. नेहा राजपूत यांनी 51वा तर अनिकेत हिरडे यांनी  81 वा क्रमांक पटकावला आहे.

एक नजर निकालावर

समीर प्रकाश खोडे (४२) नेहा उद्धवसिंग राजपूत (५१) अनिकेत ज्ञानेश्वर हिर्डे (८१) विनय सुनील पाटील (१२२) विवेक विश्वनाथ सोनवणे (१२६) तेजस सुदीप सारडा (१२८) जान्हवी बाळासाहेब शेखर (१४५) आशिष अशोक पाटील (१४७) अर्चित पराग डोंगरे (१५३) तन्मयी सुहास देसाई (190) ऋषिकेश विजय ठाकरे (२२४) अभिषेक प्रमोद टाले (२४९) समर्थ अविनाश शिंदे (२५५) मनीषा धारवे (२५७) शामल कल्याणराव भगत (२५८) आशिष विद्याधर उन्हाळे (२६७) शारदा गजानन मद्येश्वर (२८५) निरंजन महेंद्रसिंह जाधवराव (२८७) समिक्षा म्हेत्रे (३०२) हर्षल भगवान घोगरे (३०८) वृषाली संतराम कांबळे (३१०) शुभम भगवान थिटे (३५९) अंकेत केशवराव जाधव (३९५) शुभम शरद बेहेरे (३९७) मंगेश पाराजी खिलारी (४१४) मयूर भारतसिंग गिरासे (४२२) अदिती संजय चौगुले (४३३) अनिकेत लक्ष्मीकांत कुलकर्णी (४३७) क्षितिज गुरभेले (४४१) अभिषेक डांगे (452) स्वाती मोहन राठोड (४९२) लोकेश मनोहर पाटील (४९६) सागर संजय भामरे (५२३) मानसी नानाभाऊ साकोरे (५३१) नेहा नंदकुमार पाटील (५३३) युगल कापसे,गोंदिया (५३५) हर्षल राजेश महाजन (५३९) अपूर्व अमृत बालपांडे (५४६) शुभम सुरेश पवार (५६०) विक्रम जोशी (593)  प्रियंका मोहिते (595) अविष्कार डेरले (604) केतन अशोक इंगोले (६१०) राजश्री शांताराम देशमुख (६२२) संस्कार निलाक्ष गुप्ता (६२९) सुमित तावरे (655) सुरेश लीलाधरराव बोरकर (६५८) अभिषेक अभय ओझर्डे (६६९) नम्रता घोरपडे (675) जिज्ञासा सहारे (681) श्रृति कोकाटे (685)  अजय डोके(687) सूरज प्रभाकर निकम (706) श्वेता गाडे (711) अभिजित पखारे (720) कृणाल अहिरराव (732) हिमांशु टेभेंकर (738) सुमितकुमार धोत्रे (750) गौरी देवरे (759) प्रांजली खांडेकर (७६१) प्रितेश बाविस्कर (767) प्रशांत डांगळे (775) प्रतिक मंत्री (786) मयुरी माधवराव महल्ले (७९४) राहुल पाटील (804) सिध्दार्थ तागड (809) प्राजंली नवले (815) सिध्दार्थ बारवळ (823) ओमकार साबळे (844) प्रशांत सुरेश भोजने (८४९) प्रतिक बनसोडे (862) चिन्मय बनसोड (893) निखील चव्हाण (900) विश्वजीत होळकर (905) अक्षय लांबे (908) निलेश डाके (918) किशनकुमार जाधव (923) ऐश्वर्या दादाराव उके (९४३) स्नेहल वाघमारे (945) शुभम त्रंबकराव डोंगरदिवे (९६३) गौरव हितेश टेंभुर्णीकर (९६६) मयांक खरे (९६८) शिवानी वासेकर (९७१) श्रावण अमरसिंह देशमुख (९७६) श्रुती उत्तम श्रोते (९८१) सुशीलकुमार सुनील शिंदे (९८९) आदित्य अनिल बामणे (१०१५)

या निकालात बार्टी संस्थेच्या युपीएससी नागरी सेवा २०२३ परीक्षेच्या मुलखतीस पात्र असलेल्या ३५ विद्यार्थ्यांपैकी १६ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे नावे व रँक खालीलप्रमाणे –

1. Vivek Vishwanath Sonawane – AIR 126
2. Vrushali Santram Kamble – AIR 310
3. Priyanka Suresh Mohite – AIR 595
4. Suresh Liladharrao Borkar – AIR 658
5. Namrata Damodhar Ghorpade – AIR 675
6. Sumitkumar Dattaharirao Dhotre – AIR 750
7. Kajal Anandkumar Chauhan – AIR 753
8. Pranjali Manohar Khandekar – AIR 761
9. Prashant Suresh Bhojane – AIR 849
10. Pratik Dadasaheb Bansode – AIR 862
11. Chinmay Girish Bansod – AIR 893
12. Nilesh Prakashrao Dake – AIR 918
13. Snehal Dnyanoba Waghamare – AIR 945
14. Shubham Trambakrao Dongardive – AIR 963
15. Gaurav Hitesh Tembhurnikar – AIR 966
16. Sushilkumar Sunil Shinde – AIR 989

केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी सप्टेंबर 2023 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली.  जानेवारी – एप्रिल 2024 दरम्यान परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 1016 उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सामान्य (ओपन) गटातून –347, आर्थिक मागास प्रवर्गातून  (ईडब्ल्यूएस) 115, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) – 303, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) – 165, अनुसूचित जमाती प्रवर्गातून- 86  उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 37  दिव्यांग उमेदवारांचा (16 ऑर्थोपेडिकली अपंग, 06 दृष्टीहीन, 05 श्रवणदोष आणि 10 एकाधिक अपंग) यांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने 240 उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List)  तयार केली आहे. यामध्ये  सामान्य गट- 120, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)- 36,  इतर मागास वर्ग -66, अनुसूचित जाती- 10, अनुसूचित जमाती – 04  उमेदवारांचा समावेश आहे. यासोबत एकूण चार दिव्यांग उमेदवारांचा समावेश आहे.

या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू

भारतीय प्रशासन सेवा (आयएएस) या सेवेत शासनाकडे एकूण -180 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (जनरल) – 73, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 17 इतर मागास वर्ग (ओबीसी) –49, अनुसूचित जाती (एससी) – 27, अनुसूचित जमाती (एसटी) 14  जागा रिक्त आहेत. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाईल.

भारतीय विदेश सेवा (आयएफएस) या सेवेत शासनाकडे एकूण – 37 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – 16, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 04,  इतर मागास वर्ग (ओबीसी) – 10, अनुसूचित जाती (एससी) – 05, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 02 जागा रिक्त आहेत.

भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) या सेवेमध्ये एकूण – 200 जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 80,  आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 20,  इतर मागास प्रवर्गातून – 55, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 32, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 13  उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.

केंद्रीय सेवा गट अ – या सेवेमध्ये एकूण – 613 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 258, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 64 , इतर मागास प्रवर्गातून – 160, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 86 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून –45  उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.

केंद्रीय सेवा गट ब – या सेवेमध्ये एकूण – 113   जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 47, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस)  10 उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून – 29, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 15 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून -12 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

एकूण 355 उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरुपाची  असेल. अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.