दारुच्या पैशाच्या वादातून गोळी झाडली

0
5

गोंदिया,दि.03ः-दारु विक्रेत्याकडे दारु प्यायला गेलेल्या एकाने दारु पिऊन झाल्यानंतर पैशाच्या वादातून एकावर देशी कट्टाने गोळी झाडून जखमी केल्याची घटना आज शनिवारला(दि.३) दुपारी ३ वाजेच्या सुमारास रावणवाडी पोलीस ठाणेंतर्गत लोधीटोला-घिवारी येथे घडली.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी प्रेमसागर उर्फ मिथुन वल्द भैय्यालाल ठाकरे (वय२५,रा.नवाटोला-नागरा) यांने गैरकायद्याची मंडळी जमवून दारु प्यायला दारु विके्रता खेमेंद्र साहेबलाल ठाकरे(वय ३२ रा.लोधीटोला-घिवारी) येथे आपल्या मित्रासोबत गेला.दारु प्यालानंतर विक्रेता ठाकरेने पैशाची मागणी केली असता झालेल्या बाचाबाचीत रागाच्या भरात प्रेमसागर याने खेमेंद्र ठाकरेच्या पायावर देशी कठ्यातून गोळी झाडली.या घटनेमुळे गावात काही वेळापुरते तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.रावणवाडी पोलीसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक सचिन सांडभोर हे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर खेमेंद्र ठाकरेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आरोपी प्रेमसागरला ताब्यात घेण्यात आले आहे.