खेळांमुळे बालकांचा शारीरिक व बौद्धिक विकास-चंद्रिकापुरे

0
24

अर्जुनी मोर,दि.31ः-इयत्ता १ ते ४ प्राथमिक शिक्षण विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करणारे आहे आणि तो पाया मजबूत करण्याची जबाबदारी प्राथमिक शाळां ध्ये शिकविणार्‍या शिक्षकांची आहे. कारण आई-वडील सृष्टी देतात, तर शिक्षक दृष्टी देण्याचे काम करतात. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांची जबाबदारी ही सर्वांत मोठी असते. शालेय जीवनात शिक्षणाबरोबर खेळ व कलेला जास्त महत्त्व असते. स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांना कौशल्य दाखवून भविष्यात उच्च शिखर गाठता येते. स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाच्या माध्यमातून सुरू असलेल्या खेळाुंळे विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक विकास होतो, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी केले. स्वदेशी खेळोत्तेजक मंडळ तालुका अजुर्नी मोरच्या वतीने कोरंभीटोला येथे आयोजित केंद्र क्रीडा स्पर्धेच्या उद््घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून चंद्रिकापुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी पंस सदस्य सुधीर साधवानी होते. अतिथी म्हणून सरपंच संगीता नाकाडे, माजी उपसभापती आशा झिलपे, जयदेव आकरे, गुरुदेव राऊत, मंदा राऊत, कमला आकरे, संतोष शेंडे, जयगोपाल तु डाम, व्ही. जी. काशिवार, के. एस. बोरकर उपस्थित होते. सर्वप्रथम मैदानावर फीत कापून व ध्वजारोहण करून क्रीडा स्पर्धेचे उद््घाटन मनोहरराव चंद्रिकापुरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सुधीर माधवानी, आशा झिलपे, सरपंच संगीता नाकाडे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व्ही. जी. काशिवार यांनी, संचालन के. एस. बोरकर यांनी, तर आभार विलास शहारे यांनी मानले.