चांगले विद्यार्थी घडविणे हीच शिक्षकांची फलश्रुती

0
13

अर्जुनी मोरगाव,दि.10 : प्रत्येक शाळा, महाविद्यालयातील मुख्याध्यापकांनी विद्यालयाची गुणवत्ता, आदर्श शिक्षक व विद्यार्थी घडविण्यासाठी कार्यतत्पर असावे. शाळा, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यात समन्वय साधून शाळांचा उच्च दर्जा कायम ठेवावा. आई-वडील मुलांना सृष्टी देतात तर शिक्षक दृष्टी देतात. यामुळे प्रत्येक शिक्षक व मुख्याध्यापकांनी शीलवंत असावे. यामुळे संस्कारित पिढी निर्माण होईल. उत्तम व्यवस्थापन व प्रशासन यासाठी मुख्याध्यापकांनी अद्ययावत असणे गरजेचे आहे. चांगले विद्यार्थी घडविणे हीच शिक्षकांची फलश्रुती असल्याचे प्रतिपादन गोंदिया जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष तथा प्राचार्य यशवंत परशुरामकर यांनी केले. .

तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ तालुका अर्जुनी मोरगावच्या वतीने बचत भवन येथे आयोजित सेवानिवृत्त मुख्याध्यापकांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स.सभापती अरविंद शिवणकर होते. अतिथी म्हणून गोंदिया जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तनवानी, साहाय्यक गटविकास अधिकारी मयूर अंदेलवाड,प्रभारी गटशिक्षणाधिकारी निलकंठ सिरसाटे, सुनील पाऊलझगडे, राधेश्याम कापगते, ओमप्रकाशसिंह पवार उपस्थित होते. .

सर्वप्रथम देवी शारदा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी पंचशील विद्यालय बाराभाटीचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक मधुकर राखडे, अशोक हलमारे, राधेश्याम कापगते, बालकदास खोब्रागडे, दुधबुरे, सुधाकरराव नाईक, माणिक रामटेके, ताराचंद रहेले, वामन मेश्राम, रत्नघोष गजघाटे, नामदेव नाकाडे, दादाजी मस्के, लाला ब्राह्मणकर या मुख्याध्यापकांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक घनश्याम गहाणे यांनी केले. संचालन ओमप्रकाशसिंह पवार यांनी केले. आभार सुनील पाऊलझगडे यांनी मानले..