शिवनीबांध जलाशय येथे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा

0
13

साकोली,दि.22ः-शिवनीबांध जलतरण संघटनेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे तीसरे वर्ष असून स्पर्धा  २७ जानेवारी २०१९ रोज रविवारला सकाळी आयोजित केलेली आहे. स्पर्धेला उद्घाटक म्हणून अखिल भारतीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार नानाभाऊ पटोले उपस्थित राहणार आहेत तर बक्षिस वितरणासाठी प्रमुख अतिथी म्हणून मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्षा वर्षाबेन पटेल उपस्थित राहतील. याप्रसंगी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमारजी बडोले, खासदार मधुकरराव कुकडे, आमदार बाळाभाऊ काशिवार, आमदार चरणभाऊ वाघमारे, आमदार रामचंद्र अवसरे, आमदार संजय पुराम, आमदार डॉ. परिणय फुके, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार सेवकभाऊ वाघाये, माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनीलभाऊ फुंडे, चेतन भैरम, साकोलीच्या नगराध्यक्षा धनवंता राऊत, माजी जि.प. सभापती तथा सदस्य विनायक बुरडे, जि.प. सदस्य नेपाल रंगारी, दीपक मेंढे, होमराज कापगते, रेखा वासनिक, आकाश कोरे, माजी जि.प. सदस्य राजेश बांते, माजी जि.प. सदस्य अविनाश ब्राम्हणकर, शिवनी बांध येथील सरपंचा वैशाली चांदेवार आदी मान्यवर उपस्थित राहतील. स्पर्धा ही विविध गटात आयोजित केली असून पहिल्या गटात ११ वर्षाखालील मुले व मूली यांच्यासाठी ५०० मी अंतर राहील. दुसऱ्या गटात १४ वर्षाखालील मुले व मूली यांच्यासाठी १ किमी अंतर राहील. तिसऱ्या गटात १७ वर्षाखालील मुले मूली यांच्यासाठी २ किमी अंतर राहील. चौथ्या गटात ३० वर्षाखालील मुले व मूली यांच्यासाठी २ किमी अंतर राहील. पाचव्या गटात ४५ वर्षाखालील पुरुष व महिला यांच्यासाठी १ किमी अंतर राहील. सहाव्या गटात ५५ वर्षाखालील पुरुष व महिला यांच्यासाठी १ किमी अंतर राहील. सातव्या गटात ५६ वर्षावरील पुरुष व महिला यांच्यासाठी ५०० मी अंतर राहील. आठव्या गटात दिव्यांग पुरुष व महिला यांच्यासाठी ५०० मी अंतर राहील.
प्रत्येक गटात ३०००, २५००, २०००, १५००, १००० अशी रोख पारितोषिक देण्यात येतील. व प्रत्येक गटातील पहिल्या तीन स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व मेरिट प्रमाणपत्र देण्यात येईल. त्याचप्रमाणे स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला मेडल व प्रमानपत्र देण्यात येईल.
या राज्यस्तरिय स्पर्धेत अनेक नामवंत खेळाडू सहभागी होणार आहेत तेव्हा जास्तीत जास्त जलतरणपटूंनी यात सहभागी होण्याचे आवाहन शिवनीबांध जलतरण संघटनेचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत निंबार्ते, सचिव सचिन रंगारी, कोषाध्यक्ष मनिष कापगते, वैना स्विमिंग क्लबचे अध्यक्ष प्रा. शक्तीकर व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.