39.6 C
Gondiā
Sunday, May 11, 2025
Home Blog Page 2

सोनाली रायपुरे-सहारे यांच्या ‘सोनप्रहर’ ललित संग्रहाचे थाटात प्रकाशन

0

ब्रम्हपूरी,दि.१० मे: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूरच्या वतीने दि. ७ मे २०२५ रोजी ‘भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र व सभागृह’ छत्रपती संभाजीनगर येथे ‘गौरव अभिजात मराठी २०२५’ या कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय पुस्तक प्रकाशन समारंभ व काव्यवाचन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या भव्य प्रकाशन समारंभात विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीच्या सोनाली सहारे यांच्या ‘सोनप्रहर’ या ललित संग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते थाटात प्रकाशन करण्यात आले. सोबतच मुख्य संपादक राहुल पाटील यांनी काढलेल्या ‘गौरव अभिजात मराठी २०२५’ या विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले.
सोनाली सहारे यांचा काव्यवाचन स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक आला त्यांना सन्मानपत्र व सन्मान चिन्ह व बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांचे हे मराठी शिलेदार समूहातर्फे काढण्यात आलेले पाचवे पुस्तक आहे. यापूर्वी भावस्पर्श, काव्यसृष्टी, मनतरंग ,सूर्य विचार सोनशिल्प सूविचार संग्रह प्रकाशित झाले आहेत.तसेच आता सोनप्रहर हा ललित संग्रह प्रकाशित झाला.
याप्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष साहित्यरुचक आमदार मा.विक्रम काळे, उद्घाटक व मुख्य आयोजक मा.डाॅ.पद्मा जाधव, शिवव्याख्याते डॉ.बालाजी जाधव, यशवंतराव चव्हाण सेंटरचे सचिव मा.नरेश शेळके, बुलढाणा, आयोजक ए बी पठाण, प्रमुख अतिथी प्रसिद्ध कवयित्री स्वाती मराडे आटोळे पुणे, मराठीचे शिलेदार संस्थेचे विश्वस्त प्रमुख अशोक लांडगे, व अरविंद उरकुडे यांच्या हस्ते एकूण २१ कविता संग्रहाचे प्रकाशन संपन्न झाले.
आयोजित पुस्तक प्रकाशन समारंभात मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्थेतर्फे मानपत्र, शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, विशेषांकाच्या प्रती व पुष्पगुच्छ देऊन कौटुंबिक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कुटुंबातील सिध्दार्थ भाऊरावजी सहारे उपस्थित होते. आई बाबा सौ.अर्चना मारोतराव रायपुरे, गडचिरोली, मुले साची, सम्राट बहिण  मोनाली परमेश्वर दुर्गे, भाऊ लीना राहुल रायपुरे , जिया, अभीधम्म , शर्लिन यांनी शुभेच्छा दिल्या.
या समारंभाचे बहारदार सूत्र संचालन मुख्य परीक्षक व कोषाध्यक्ष सविता पाटील ठाकरे सिलवासा, आयोजक प्रशांत ठाकरे, सिलवासा व कवी विष्णू संकपाळ यांनी केले तर आभार आयोजक कवयित्री वर्षा मोटे यांनी मानले. याप्रसंगी राज्यातील व राज्याबाहेरील मराठी साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तिरखेडी येथील मालतीबाई कटरे यांचे निधन

0

सालेकसा,दि.१०ः तालुक्यातील तिरखेडीचे माजी सरपंच योगेश कटरे यांच्या मातोश्री मालतीबाई भरतसिंह कटरे यांचे आज १० मे रोजी दिर्घ आजाराने दुपारी १२.३० वाजता निधन झाले.त्यांच्यावर उद्या दिनांक:- 11/05/2025 रोज रविवारला दुपारी 12.00 वाजता तिरखेडी मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

गणित व विज्ञान विषयाचे शिक्षकच नसतांना जि.प.प्राथ.शाळेत आठवीचे वर्ग सुरु करण्याचा अट्टाहास का?

0

गोंदिया,दि.१०-राष्ट्रीय पातळीवर तयार करण्यात आलेल्या शैक्षणिक धोरणात प्राथमिक शिक्षणाची सुविधा गावातच असायला हवी.या शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून संबंधित जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पाचवी व आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मात्र ते वर्ग सुरु करतांना शासन शिक्षक देणार नाही,हे तेवढेच स्पष्ट आहे.सध्याच्या घडीला सेमी इंग्रजी व इंग्रजीमाध्यामाच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांच्या कल असतांना जिल्हा परिषदेच्या शांळामध्ये पाहिजे तसे गणित व विज्ञान विषयाचे शिक्षकच नसतांना जि.प.प्राथ.शाळेत आठवीचे वर्ग सुरु करण्याचा अट्टाहास का?असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

गोंदिया जिल्हा परिषदेने २०१५-१६पासून जिल्हा परिषदेच्या अनेक प्राथमिक शांळामध्ये आठवीचे वर्ग सुरु केले आहे,मात्र त्याठिकाणी विज्ञान व गणिताचे शिक्षकच नाहीत.सोबतच विद्यार्थी सेमी इंग्रजीकडे जाऊ इच्छित असला तरी स्थानिक राजकारण व शाळेत इयत्ता आठवीतील अभ्यासक्रमाच्या दृष्टीकोनातून शिक्षक नसतानाही अनेक शाळा समिती मुख्याध्यापक व शिक्षकासोबत वर्ग सुरु करण्याच्या अट्टाहास करु लागल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे जाणवू लागले आहे.इयत्ता आठवी वर्ग सुरु करणार्या शाळामध्ये बीएस्सी बीएड असलेले गणित व विज्ञान विषयाचे किती शिक्षक त्या शाळेत उपलब्ध आहेत अशी विचारणा केल्यावर मात्र शिक्षण विभाग हात वर करते.उलट शिक्षक आम्ही देणार नाही,या अटीवरच वर्ग सुरु करण्याची परवानगी देत असल्याचे स्पष्ट करुन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खेळत असल्याचे स्पष्ट झाले आहे,अशा वेळी जोपर्यंत विज्ञान व गणिताचे शिक्षक आठवी वर्ग सुरु करणार्या शाळेत आहेत की नाही,याची खात्री केल्याशिवाय शाळाव्यवस्थापनांनी सुध्दा मुलांच्या भविष्य़ाशी खेळणे कितपत योग्य अशा चर्चांना आता वेग आलेला आहे.

या नव्या निर्णयानुसार आता ज्या गावापासून पाचवी वर्ग असलेली शाळा एक किमीपेक्षा लांब असेल आणि आठवी वर्गाची शाळा तीन किमीपेक्षा दूर असेल, अशा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांना हे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्याचा शासनाचा निर्णय आहे.मात्र जर गावात व गावाशेजारीच शाळा असेल तर असे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली जाणार नाही असे सुद्धा शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.दरम्यान, हे वर्ग सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर केल्यानंतर त्या शाळेच्या सुविधांची पडताळणी होणे आवश्यक असते,पण ती पडताळणी न होताच स्थानिक राजकारणातील वर्चस्वाच्या लढाईतच अनेक शांळाना वर्ग सुरु करण्याची परवानगी दिली गेल्याने आज गोंदिया जिल्ह्यातील काही अपवादात्मक शाळा वगळता जिल्हा परिषदेच्या ज्या प्राथमिक शाळामध्ये आठवीचे वर्ग सुरु करण्यात आलेत,तेेथील परिस्थिती बिकट दिसून येत आहे.

राज्य माहिती आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी पदभार स्विकारला

0
अमरावती, दि.10: अमरावती खंडपीठ राज्य माहिती आयुक्तपदी रविंद्र हनुमंतराव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी गुरूवार, दि 8 मे रोजी कार्यभार स्वीकारला.
यावेळी राज्य माहिती आयोग, अमरावती खंडपीठातील उप सचिव देविसिंग डाबेराव, तत्कालीन उप सचिव अॅड. डॉ. सुरेश कोवळे आणि आयोगातील इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
नवनियुक्त राज्य माहिती आयुक्तांनी सर्वप्रथम आयोगातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी ओळख करून घेतली. त्यानंतर उप सचिव श्री. डाबेराव यांच्याकडून त्यांनी कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेतला. कार्यालयाची पाहणी करून आपल्या कामकाजाला सुरुवात केली.

कामचुकार कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई-जि.प.अध्यक्ष भेंडारकर

0

सडक अर्जुनी,दि.१०ः  जिल्हा परिषद शाळा वाचली पाहिजे यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे. एवढेच नव्हे तर हे सर्व करीत असताना डिजिटल शिक्षण सुविधा करणे सुद्धा आवश्यक आहे. सोबतच घरकुल बांधकामाचे जे सर्वेचे काम सुरू आहे ते १५ मे पर्यंत योग्य पद्धतीने झाले शिवाय तालुक्यातील इतर समस्या मार्गी लावण्याचे निर्देश जि. प. अध्यक्ष लायकराम भेडारकर यांनी दिले. स्थानिक पंचायत समिती येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सर्व विभागांचा आढावा घेवुन कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, असे संकेतही अध्यक्षांनी दिले.
पंचायत समिती अंतर्गत सुरू असलेल्या व प्रस्तावित विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी ९ मे रोजी बैठक पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.बैठकीला प्रामुख्याने समाज कल्याण सभापती रजनी कुंभरे, पं.स. सभापती चेतन वडगाये, उपसभापती निशा काशिवार, जि. प. सदस्य डॉ. भुमेश्वरजी पटले, पंचायत समिती सदस्य चंद्रकलाताई डोंगरवार,संगीताताई खोब्रागडे,शालिंदरजी कापगते, डॉ. रुकीराम वाढई, वर्षा शहारे, सपना नाईक, शिवाजी गहाणे, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष हर्ष मोदी,मनरेगा गटविकास अधिकारी लोहबरे,सहा.गटविकास अधिकारी खोटेले, गटविकास अधिकारी रविकांत सानप यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
आढावा बैठकीच्या प्रसंगी विविध विभागांचा आढावा घेत असताना ते बोलत होते. यावेळी उपस्थित ग्रामसेवक व कर्मचारी विविध विभागांचे अधिकारी, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि इतर लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत शिक्षण, पाणी, महिला सक्षमीकरण, गृहनिर्माण, जलसंधारण आणि रोजगार निर्मिती यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेता ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी, विहिरीचे पुनर्भरण, जलसंधारण प्रकल्प, तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा या उपाययोजनांवर भर देण्यात आला. लोकसहभागातून जलव्यवस्थापन न करण्यावरही करण्यावरही चर्चा झाली. तसेच जल जीवन मिशन अंतर्गत अनेक गावातील कामे अपूर्ण असल्याने यातील
काही काम चुकार लोकांवर सुद्धा आपण योग्य ती कारवाई केली असल्याचे सांगण्यात आले. बैठकीमध्ये जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची घटती संख्या ही चिंतेची बाब म्हणून मांडण्यात आली. या पार्श्वभूमीवर शिक्षकांची नियमित उपस्थिती, गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांना आकर्षक उपक्रम व प्रोत्साहन, शालेय सुविधा आणि पोषण आहार या बाबींवर भर देण्याचे निर्देश देण्यात आले.

शेतकऱ्यांना जलद न्यायासाठी “सस्ती अदालत” प्रभावी

0
परभणीत ५ प्रकरणांमध्ये सामंजस्य
परभणी,दि.10 : अतिक्रमणमुक्त पाणंद व शेतरस्ते या विषयांवर शेतकऱ्यांना तात्काळ आणि सोपा न्याय मिळावा यासाठी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी १६ एप्रिल २०२५ रोजी परिपत्रक व २ मे २०२५ रोजी पत्रक जारी करून दर पंधरा दिवसांनी “सस्ती अदालत” आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार तहसील कार्यालय, परभणी येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत “सस्ती अदालत” संपन्न झाली.
या सस्ती अदालतीत उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे, व नायब तहसीलदार (महसूल १)मधुकर क्षीरसागर यांच्या उपस्थितीत एकूण ११ प्रकरणांवर सुनावणी झाली. यापैकी ५ प्रकरणे समुपदेशन व सामंजस्याच्या माध्यमातून मार्गी लावण्यात यश आले, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली. मात्र, उर्वरित प्रकरणांमध्ये संबंधित पक्षकार अनुपस्थित असल्याने त्यावर तत्काळ कार्यवाही होऊ शकली नाही.
या उर्वरित प्रकरणांची सुनावणी येत्या २३ मे २०२५ रोजी नियोजित सस्ती अदालतीत करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी यांनी दिली.
सदर अदालतीस मंडळ अधिकारी नंदकिशोर सोनवणे, विकास आगलावे, एन.आर. सोडगीर, संचिन शिंदे, उद्धव सरोदे व ज्योती अढागळे यांची उपस्थिती होती. तसेच एकूण ५७ शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.
“सस्ती अदालत” उपक्रमामुळे शेतकऱ्यांना थेट प्रशासनाच्या माध्यमातून न्याय मिळण्याचा मार्ग सुकर झाला असून, यामुळे ग्रामस्तरावरच्या शेतविवादांवर सामंजस्याने तोडगा निघण्याची शक्यता वाढली आहे.

त्या राईस मिलर्सकडून खंडणी मागणारे ते पत्रकार कोण ?

0

गोंदिया: सीएमआर त्या तांदुळ पुरवठ्यात मोठा घोटाळा झाला यात तुमचा सहभाग आहे,अशी धमकीवजा माहिती देत राईस मिलर्सच्या कर्मचाऱ्यांकडून काही पत्रकारांनी खंडणी मागितल्याचा आरोप राईस मिलर्स व व्यापारी वर्गाने केल्याने एकच खळबळ उडाली आहे. एवढेच नव्हेतर राईस मिलर्सच्या महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तवणूक करण्यात आली. या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये चांगलेच असंतोष निर्माण झाले आहे. दरम्यान या प्रकरणाची तक्रार व्यापारी संघटनेच्या वतीने जिल्हा मार्केटिंग अधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे खंडणी मागणारे ते पत्रकार कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे. पोलिस विभाग या प्रकरणाची दखल घेवून त्या पत्रकारांना शोधन काढणार का? याकडेही लक्ष लागले आहे.
आधारभूत किंमतीमध्ये खरेदी केलेला धान राईस मिलर्सना भरडाईसाठी दिला जातो. त्या मोबदल्यात मिलर्स शासनाला सीएमआर तांदूळ पुरवठा करतात. मात्र काही मिलर्सकडून शासनाने ठरवून निकषान्वये सीएमआर तांदूळ पुरवठा करण्यात आला नाही. सीएमआर तांदूळामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात असतानाच काही पत्रकारांनी या संधीचा लाभ घेत आमगाव येथील दोन राईस मिलर्सचे कार्यालय गाठले.
आज (ता. ९) दरम्यान तीन पत्रकार राईस मिलर्सच्या कार्यालयात पोचले व सीएमआर तांदळाचा मोठा घोटाळा आहे? अशी चौकशी केली. दरम्यान कार्यालयात बसलेल्या महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तवणूक करीत पैशाची मागणी केली. पैसे दिले नाही तर घोटाळ्याचे वृत्त प्रकाशित करू, असा धमकीवजा इशारा दिला. या प्रकारामुळे आमगाव तालुक्यातील व्यापाऱ्यांमध्ये चांगलाच असंतोष पसरला आहे. या प्रकाराची जिल्हा मार्केटिंग फेडरेशन तथा जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. खंडणी मागणारे ते पत्रकार कोण? असा शोध व्यापारी घेवू लागले आहेत. त्यामुळे या प्रकरणात पोलिस विभागाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

१०३६ शेतकर्‍यांचे १० कोटी २० लाख रुपये थकले

0
भंडारा : देशाच्या अन्नदात्याला आर्थिक संकटाने घेरले आहे. खरीप २०२४ मध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर धानाची शेती करणार्‍या शेतकर्‍यांनी आधारभूत धान खरेदी केंद्रांवर हमीभावाने (२,३०० रुपये प्रति क्विंटल) आपला माल विकला. पण, गेल्या १५ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंतच्या १ हजार ३६ शेतकर्‍यांचे तब्बल १० कोटी २० लाख ७६५० रुपये थकले आहेत. या थकबाकीमुळे (Paddy Farmers) शेतकरी हतबल झाले असून, ‘पैसे कोणाकडे मागायचे?’ हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
खरेदी केंद्र सुरू होण्यास आधीच उशीर झाला. त्यात ऑनलाईन प्रक्रियेच्या जंजाळात शेतकर्‍यांना मनस्ताप सहन करावा लागला. धानाचे मोजमाप झाले, पण पैसे खात्यात जमा होण्याची वाट पाहत शेतकर्‍यांच्या आशा पाण्यात गेल्या. शासनाचे उदासीन धोरण शेतकर्‍यांना डिवचत असल्याची भावना वाढत आहे. ‘पैसे तातडीने मिळतील,’ या आशेने धान विकणार्‍या (Paddy Farmers) शेतकर्‍यांना आता आर्थिक तंगीचा सामना करावा लागत आहे.
कृषिप्रधान देशात शेतकर्‍यांवर अन्याय होत असल्याची खंत व्यक्त होत आहे. देशाची अर्थव्यवस्था शेतकर्‍यांच्या कष्टावर उभी असताना, त्यांच्याच हातात पैसा नाही. ऑनलाईन प्रक्रियेच्या नावाखाली खरेदी केंद्रांवर शेतकर्‍यांना ताटकळत ठेवले जात आहे. (Paddy Farmers) थकबाकीमुळे शेतकर्‍यांना पुन्हा खासगी सावकारांचा आधार घ्यावा लागण्याची भीती आहे. उदरनिर्वाहासाठी शेतकरी हताश झाले असून, त्यांच्यासमोर उपजिविकेचा प्रश्न गंभीर बनला आहे.शेतकरी वर्गातून आता संतापाची लाट उसळत आहे. लोकप्रतिनिधींनी तातडीने पुढाकार घेऊन शासनाकडे पाठपुरावा करावा आणि अडकलेले १० कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करावेत अशी मागणी जोर धरत आहे.
जिल्ह्यातील १ हजार ३६ शेतकर्‍यांचे १० कोटी २० लाख ७ हजार ६५० रुपयांची रक्कम थकीत आहे. शासनाकडून जमा करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग झाली नाही. लवकरच ही रक्कम जमा करण्यात येईल.
-एस.बी.चंद्रे, जिल्हा पणन अधिकारी, भंडारा

खरीप हंगामपूर्व जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा विक्रेत्यांची कार्यशाळा

0

गोंदिया, दि.9 : खरीप हंगामपूर्व जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा विक्रेते व कृषि निविष्ठा उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी यांची कार्यशाळा 7 मे 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीचे सभागृहात पार पडली. कार्यशाळचे अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश कानवडे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषि आयुक्तालयाचे कृषि अधिकारी शाहुराव मोरे उपस्थित होते.

        यावेळी शाहुराव मोरे यांनी खरीप हंगामातील खताचे संतुलीत वापर, माती परिक्षणाचे महत्व, धान बियाणेवरील बीज प्रक्रिया, किडरोग व्यवस्थापन व गुणवत्तेच्या निकषावर बियाण्यांची निवड या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच अनाधिकृत व बनावट खत विक्री टाळावी, खतासोबतची लिंकींग न करण्याबाबत व शेतकऱ्यांना प्रमाणित असलेले कृषि निविष्ठा पुरविण्याबाबत सूचना दिल्या.

        महाबीजचे प्रतिनिधी सुभाष मेश्राम यांनी साथी पोर्टल विषयी सखोल माहिती दिली. या पोर्टलच्या माध्यमातून बियाणे वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक कशी होईल याबद्दल मार्गदर्शन केले. सेवासंस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार यांनी सारस पक्षी संवर्धन व संरक्षण याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश कानवडे यांनी अनुदानीत खतासोबत इतर दुय्यम खते लिंकींग न करण्याबाबत उपस्थित सर्व खत उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींना सक्त सूचना दिल्या. तसेच पॉस मशिन साठा व प्रत्यक्ष साठा यांचे ताळमेळ ठेवणे, विहित नमुन्यात दस्ताऐवज जतन करुन शेतकऱ्यांना देयके देणे व वाजवी दरात कृषि निविष्ठांची विक्री करण्याबाबत सर्व कृषि निविष्ठा विक्रेत्यांना सूचना दिल्या.

       यावेळी आरसीएफ कंपनीद्वारे प्रातिनिधिक स्वरुपात ई-पॉस मशिनचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक वाय.बी.बावनकर व मोहिम अधिकारी पी.डी.कुर्वे यांनी सदर कार्यशाळेचे यशस्वीपणे आयोजन केले.

कुऱ्हाडीने वार करीत पतीनेच केले पत्नीला ठार

0

गोंदिया :-जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अंभोरा गावात संशयावरुन पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करीत ठार केल्याची घटना ८ मे च्या रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.घटनेनंतर आरोपी सुनील मदन पटले(वय ३५)यांने स्वतःच पोलीस स्टेशन गाठत आत्मसमर्पण केले.या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील पटलेचा पत्नीच्या चारित्रावर संशय होता.याच कारणावरून त्यांच्यात वारंवार वाद व्हायचे.८ मे रोजी रात्री उशिरा दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडण झाले, ज्यात सुनीलने रागाच्या भरात कुऱ्हाडने पत्नीवर हल्ला केला.या हल्ल्यात ती जागीच मरण पावली.