39.6 C
Gondiā
Sunday, May 11, 2025
Home Blog Page 3

देवरी येथे तथागत बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूर्तीचे अनावरण येत्या सोमवारी

0

■ या निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन.

देवरी,दि.०८: बुध्द पोर्णिमेच्या पर्वावर देवरी येथील ऊरूवेलावन बुध्द विहारात थाईलॅंड येथून बनवून आणलेल्या अष्ठधातूंच्या तथागत बुध्दांच्या मुर्ती व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पंचधातू मूर्तीचे अनावरण कार्यक्रमाचे आयोजन देवरी येथील वार्ड क्रं १३ येथे उरूवेला बुध्द विहार समिती च्या वतीने येत्या सोमवारी(दि.१२ मे ) रोजी सकाळी ९ वाजेपासून आयोजित करण्यात आले आहे. या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात सकाळी ९ वाजता धम्म ध्वजारोहण, सामूहिक बुध्द वंदना,सकाळी १०.३० वाजे पासून लहान मुलांकरीता प्रश्न मंजुषा, दुपारी ४ वाजता तथागत बुध्द व डॉ. आंबेडकर यांच्या मुर्तीसह शांती कँडल रैली, सायंकाळी ६.३० वाजता दोन्ही मुर्तीचे विधीवत अनावण व परित्राणपाठ भन्ते भदंत संघधातु स्थवीर व मुलगंधकुटी बुध्द विहार देवरीचे पुज्य भन्ते परमपदा यांच्या हस्ते होणार आहे.
या प्रसंगी आयोजीत कार्यक्रमात सायंकाळी ७.३० वाजता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य के.सी. शहारे आणि प्रमुख आमंत्रीत देवरीचे नगराध्यक्ष संजू उईके, जि. प.सदस्य उषाताई शहारे, कल्पना वालोदे, कौशल्यायन महिला महाविद्यालयाचे संस्थापक चरणदास उंदिरवाडे आणि सामाजिक कार्यकर्ता नितेश वालोदे आदीची प्रामुख्याने उपस्थीती राहणार आहे. त्याचप्रमाणे रात्री ८.३० वाजता स्मृतीशेष रविकांता शहारे यांचे स्मृती प्रित्यर्थ खामखुर्रा येथील शंकर शहारे यांचे कडुन भोजन दान व रात्री ९ वाजता लोकांच्या मनोरंजना करीता भिमगितावर आधारीत भिमगित आर्केस्ट्रा चे आयोजन ही करण्यात आले आहे.
तरी या कार्यक्रमात देवरी व परीसरातील बौध्द समाज व इतर समाज बांधवानी जास्तीत जास्त संख्येत सहभाग घेवून या कार्यक्रमाला यशस्वी करावे असे आवाहन उरूवेला बुध्द विहार समितीचे अध्यक्ष जयपाल शहारे,उपाध्यक्ष शालीकराम शहारे,सचिव राजकुमार साखरे, सहसचिव चेतन कोचे,कोषाध्यक्ष मनोहर तागडे यांच्यासह समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.

वीर शिरोमणी महाराणा प्रताप स्मारकाचे भव्य अनावरण सोहळा उत्साहात

0

*आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते प्रतिमेचे अनावरण, सुकळी नाक्यावरील चौकाला “महाराणा प्रताप चौक” असे नामकरण

चित्रा कापसे
तिरोडा —वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ एक भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. विजय रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली वीर महाराणा प्रताप यांच्या भव्य स्मारकाचे अनावरण करण्यात आले. सुकळी नाका येथील गोंदिया-तुमसर मार्गावरील चौकात हे स्मारक उभारण्यात आले असून, याच ठिकाणी चौकाचे नावही “वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक” असे घोषित करण्यात आले.
या गौरवशाली प्रसंगी आमदार विजय रहांगडाले यांनी आपल्या भाषणात महाराणा प्रताप यांच्या शौर्य, स्वाभिमान व राष्ट्रभक्तीवर प्रकाश टाकला. त्यांनी असेही सांगितले की, “महाराणा प्रताप हे केवळ इतिहासातील एक योद्धा नव्हते, तर स्वातंत्र्य व स्वाभिमानाचे प्रेरणास्थान होते. त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी हे स्मारक म्हणजे आपल्या समाजाचा त्यांना मानाचा मुजरा आहे.”
कार्यक्रमाची सुरुवात विधीवत पूजा-अर्चनेने करण्यात आली. स्थानिक पंडितांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेची पूजा,हवन व स्तुती करण्यात आली. या धार्मिक विधीनंतर आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते प्रतिमेचे अनावरण झाले. स्मारक अनावरणानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून महाराणा प्रताप यांना अभिवादन केले.कार्यक्रमास क्षत्रिय राजपूत समाजाचे शेकडो सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या व्यतिरिक्त शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमात उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष संजयसिंह बैस, अजयसिंह गौर, विनोद परमार, झलेद्रसिंह चौव्हान, झामसिंह चौव्हान, आनंदसिंह बैस, अजयसिंह तोमर, देवेंद्रसिंह गहेरवार, शैलेंद्रसिंह गौर, संजय परमार, आनंद गहेरवार, राजेश गुनेरिया,सलीम जवेरी ,अशोक असाटी, देवेंद्र तिवारी,विजय बनसोड, बाळू येरपुडे, दिलीप असाटी,निखील बैस, ममता बैस, ज्योती बैस, योगिता तोमर आणि रश्मी गौर,हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अविनाश जयस्वाल यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. संजयसिंह बैस यांनी केले. त्यांनी उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आणि महाराणा प्रताप यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे आश्वासन दिले.

देवरीत टिल्लू पंप लावून पाणीचोरी करणा-या विरूध्द धरपकड अभियान

0

■ देवरी नगरपंचायत द्वारे शहरात धरपकड मोहीमेला सुरवात.

देवरी,दि.०९:स्थानिक नगरपंचायत प्रशासनाद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. परंतु, काही महाभाग पाणी पुरवठा करणाऱ्या नळाला टूल्लू पंप बसवून अधिकचा पाणी घेतात. यामुळे पाणी वितरण व्यवस्था प्रभावीत होत असून इतर नागरिकांना पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत असतो. परिणामी, अवैधरीत्या नळाला टुल्लू पंप लावणाऱ्या विरुद्ध नगरपंचायत प्रशासनाने कंबर कसली असून त्याविरूद्ध धरपकड कार्यवाही सुरू केली आहे.

  देवरी नगरपंचायत द्वारे विविध वार्डात पाणीपुरवठा विभागाच्या वतीने प्रत्येक घरात नळाद्वारे पाणिपुरवठा करण्यात येतो. परंतू ,काही लोक या नळा वर टिल्लूपंप लावून अवैद्यरित्या पाणि पुरवठा करतात त्यामुळे इतर लोकांना पाणी कमी प्रमाणात मिळतो. याला आळा घालण्याकरीता नगरपंचायत पाणि पुरवठा विभागाच्या पथकाद्वारे टिल्लूपंप धरपकड मोहिम मागील २२ एप्रिल पासून सुरू केली आहे.
या अभियानाद्वारे देवरी येथील वार्ड क्रं.८,९,१४ मधील एकूण चार लोकांच्या घरून टिल्लूपंप जप्त करून या प्रत्येक लोकांविरूध्द पाच हजार रूपयाच्या दंडाची कारवाई केली.
पाणीपुरवठा विभागाच्या या पथकात पाणीपुरवठा अभियंता सुनील नागपूरे, लिपीक देवचंद बहेकार,वाँल ऑपरेटर रफीक शेख, कृष्णा डोये,रमेश कुंभरे, संजय कानेकर आदींचा समावेश असून ही टिल्लूपंप धरपकड कारवाई सतत सुरू आहे.
या कारवाई मुळे देवरी ंशहरात अवैद्यरित्या टिल्लूपंप बसविणाऱ्या लोकांचे टांगलेच धाबे दणाणले आहे.

सिविल लाइन में टूटे हुए गट्टू से हो सकती है दुर्घटना

0

गोंदिया: गोंदिया नगर परिषद अंतर्गत शहर के सिविल लाइन परिसर स्थित कापसे बिल्डिंग के सामने ,माता मंदिर चौक परिसर में लगे हुए गट्टू टूटकर काफी मात्रा में रोड से बाहर निकल गए हैं।
जो लोगों के लिए आने जाने में काफी परेशानी खड़े कर रहे है, बीच शहर में सौंदर्यकरण के नाम पर रोड के बीचो-बीच चौराहे पर गट्टू लगाए गए हैं।
किंतु कहीं ना कहीं गट्टू लगाने में अनियमितता दिखाई पड़ती है।
जिसके कारण गट्टू उखड़ जाने के कारण आते जाते कई दुपहिया वाहन धारक जान जोखिम में डालकर चलने के लिए मजबूर हो गए हैं।
जिससे आजू-बाजू परिसर के लोगों द्वारा नगर पर परिषद की कार्यप्रणाली पर सवाल उठाए जा रहे हैं, कि अभी मात्र कुछ ही महीना पहले ही इस चौक पर (पेविंग ब्लॉक) गट्टू लगाए गए थे।
फिर आखिर इतने कम समय में नगर परिषद के द्वारा लगाए गए गट्टू कैसे निकल रहे हैं।
गट्टू कई जगह से उखड़ गए हैं, जिस कारण वहां से जाते हुए दो पहिया वाहनधारकों का बैलेंस बिगड़ जाता है, जिससे लोग काफी परेशान हो रहे हैं। भविष्य में
दुर्घटना कभी भी घटित हो सकती है, विशेष बात यह है कि इस परिसर से दिनभर भारी यातायात रोड पर बना रहता है।
शहर के अधिकतर सफेद पोश नेता भी इसी रोड से आना-जाना करते हैं।
काफी कद्दावर नेताओं का रहना भी और राजनीति भी इसी क्षेत्र से होने की बात कही जाती है।फिर भी नगर परिषद गोंदिया के बांधकाम विभाग द्वारा द्वारा इस तरह का कार्य इस परिसर में किया गया।जो कि नगर परिषद की कार्य प्रणाली पर प्रश्न चिन्ह निर्माण करता है।

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक..! जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक

0

अकोला : सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने आघामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लक्षात घेता अकोला जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक संपन्न.
ही बैठक गुरुवार,दिनांक 8 मे रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाप्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर व जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी महानगरप्रमुख योगेश अग्रवाल, पश्चिन शहर प्रमुख रमेश गायकवाड, पूर्व शहर प्रमुख अँड.पप्पू मोरवाल, उपजिल्हाप्रमुख शशिकांत चोपडे, गोपाल म्हैसणे, निवासी उपजिल्हाप्रमुख संतोष अनासने, तालुकाप्रमुख विजय वानखडे, प्रकाश गीते, अनंत बगाडे, मुर्तीजापुर तालुका प्रमुख दीपक दांदळे, सचिन गालट, मंगेश म्हैसणे, जिल्हा समन्वयक गजानन पावसाळे, गणेश बोबडे, जिल्हा संघटक बादल सिंग ठाकूर, तालुका संघटक रमेश थुकेकर, शहर संघटक सागर पूर्णेय, राहुल जाधव,महिला समन्वयक स्वानंदीताई पांडे, महिला उपजिल्हाप्रमुख संगीताताई शुक्ला, महिला महानगरप्रमुख निशाताई ग्यारल, महिला शहर प्रमुख प्रीती मोहोळ, जयश्री तोरडमल, प्रतिभा दांगटे, युवा सेना लोकसभा प्रमुख कुणाल पिंजरकर, उपशहर प्रमुख प्रदीप काशीद, राजेश पिंजरकर, राजेश दांडेकर, प्रतीक मानेकर, नितीन बदरखे, भूषण इंदोरिया,स्वप्निल देशमुख, अश्विन लांडगे,दीपक नावकार, शुभम वानखडे, राजेश कलाने, सतीश समुद्रे, जिल्हा सचिव सतीश गोपनारायण, संजय रोहनकर, मधुकर सोनारगन ,चेतन जैन, समीर शहा, सुभाष भागवत, प्रवीण गावंडे, ऋषिकेश सोनारगन , राहुल सोनारगण, शेख एजाज, सुशांत साठे, योगेश ढोरे, अविनाश मोरे, तुषार इंगळे, प्रकाश परीयाल, आशु काळे, वैभव बोरचाटे, उत्तम डुकरे, विलास मानकर, प्रशांत घाटोळ, सुधाकर गोपकर, अनंत वाकोडे, सचिन शेवलकर, विकास कुरेकर, अक्षय येरमेकर, विशाल धोटे, फिरोज खान, मिलिंद बेंडे, गणेश शेळके, सौरभ शेळके, गोपाल शेळके, सोपान चावरे, तेजस वक्टे , सचिन घावट, सागर आवारे, अतुल अंभोरे, सुरत सिंग राजपूत, राजीव विल्हेकर, प्रवीण घोरमोडे, ज्ञानेश्वर जानोकार, संतोष काटोले, नितीन गंगलवार, नागेश इंगोले, किशोर घाडगे, संदेश काजळकर,भावेश नवले यासह शेकडो पदाधिकारी, शिवसैनि उपस्थित होते. यावेळी शहर प्रमुख रमेश गायकवाड, पप्पू मोरवाल, अकोला तालुकाप्रमुख विजय वानखडे, तालुकाप्रमुख सचिन गालट महिला जिल्हा समन्वयिका स्वानंदीताई पांडे, जिल्हा समन्वयक गजानन पावसाळे यांनी आपले विचार प्रकट केले. आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने संघटन बांधणी, संघटन रचना, व निवडणुकीच्या तयारीबाबत मार्गदर्शन शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंग दादा पिंजरकर व जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांनी केले. यावेळी अकोला पश्चिम, अकोला पूर्व व पातुर विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांना शिवसेना पक्षामध्ये प्रवेश देण्यात आला. यावेळी पेहेलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी झालेल्या भारतीय नागरिकांचा मिशन सिंदूर राबवत भारत सरकारने जे सडेतोड उत्तर दिले त्या प्रित्यर्थ पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना मिशन सिंदूर हीच खरी श्रद्धांजली या भावनेने श्रद्धांजली अर्पन आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार महानगर प्रमुख योगेश अग्रवाल यांनी मानले.अशी माहिती जिल्हा प्रसिद्ध प्रमुख शंकर जोगी यांनी दिले.

मोझरी चौथे पुस्तकाचे गाव साकारणार-उद्योग मंत्री उदय सामंत

0
उद्योगांसाठी लवचिक उद्योग धोरण राबविणार
-उद्योग मंत्री उदय सामंत
अमरावती, दि. 9 :अमरावती येथील टेक्सटाईल पार्कमध्ये उद्योगांना चांगल्या सेवा पुरविण्यात येत आहे. आता याठिकाणी पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहे. या पार्कमध्ये उद्योग यावेत, यासाठी जमिनीचे दर एक वर्षासाठी 600 रूपये ठरविण्यात आला आहे. उद्योगांसाठी लवचिक धोरण राबविणार असल्याची माहिती उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. सामंत यांनी उद्योजकांच्या समस्यांबाबत बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव यांच्यासह उद्योग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. सामंत यांनी, पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कमध्ये 5 उद्योजकांनी 1300 कोटी रूपयांचे करार केले. मात्र जमिनीच्या दराबाबत प्रश्न असल्याने उद्योग सुरू होण्यास अडचण झाली. यावर उपाययोजना म्हणून आता एक वर्षासाठी 600 रूपये दर ठरविण्यात आला आहे. त्यामुळे याठिकाणी उद्योग सुरू होण्यास वेग येईल. त्यासोबतच सामाईक सोयीसुविधांचे दर 67 रूपयांवर आणण्यात आले आहे. यात अधिकच्या दराबाबतही 50 टक्के सवलत देऊन प्रलंबित रक्कम उद्योजकांकडून भरून घेतली जाणार आहे. या प्रकल्पामधून 10 ते 20 हजार रोजगार निर्मिती होणार आहे.
उद्योगांशी करार करण्यात आल्यानंतर 68 टक्के उद्योग सुरू करण्यात आले आहे. उद्योगांना सहकार्याची भूमिका शासनाने घेतली आहे. मात्र उद्योगांसाठी जमिन घेऊन उद्योग सुरू केला नसल्यास जमिनी परत घेतल्या जातील. येत्या काळात अमरावतीमध्ये आयटी पार्क, लघू व मध्यम उद्योजक पार्क यासोबतच आमझरी हे मधाचे गाव म्हणून साकारण्यात येणार आहे. उद्योजकांना चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी शासनाचा पुढाकार राहणार आहे.
गुरूकुंज मोझरी येथे राज्यातील चौथे पुस्तकाचे गाव निर्माण करण्यात येणार आहे. यात 35 कुटुंबांचा समावेश करण्यात येणार आहे. या कुटुंबांनी खानपानाचा परवाना काढल्यास पर्यटकांना चहा, नास्ता आणि जेवण, तसेच होमस्टेची सुविधा देऊ शकतील. याठिकाणी उत्कृष्ट आणि दुर्मिळ पुस्तके उपलब्ध राहणार आहे. त्यासोबतच येत्या सत्रापासून मराठी भाषा विद्यापिठात अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.

राष्ट्रवादीत विलीनीकरणाचे संकेत?; मोठा भूकंप होणार

0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुलाखतीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. “आमच्या पक्षातील एका गटाला अजित पवारांसोबत जावं वाटतंय,” या त्यांच्या वक्तव्यानं राजकारणात नवा रंग भरला आहे.

सध्या ठाकरे गट (Thackarey Group) आणि इतर विरोधकांमध्येही एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असताना, शरद पवारांच्या (Sharad Pawar) या सूचक विधानाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचे वारे वाहत असल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पवारांनी स्पष्टपणे सांगितले की, पक्षात दोन विचारधारा आहेत – एक गट अजित पवारांसोबत (Ajit Pawar) जाण्याचा विचार करत आहे, तर दुसरा गट भाजपसोबत जाऊ नये असा आग्रह धरत आहे. तसेच इंडिया आघाडीबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि विरोधी बाकांवर बसायचं की नाही हे सुप्रिया सुळे ठरवतील, असेही सांगितले.

यापूर्वी अनेक आमदारांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी मतदारसंघातील प्रश्नांसाठी संपर्क साधल्याचंही समोर आलं होतं. मात्र, माध्यमांसमोर कोणीही उघडपणे भूमिका मांडली नव्हती. आता पक्षप्रमुखांनीच थेट यावर भाष्य केल्यामुळे पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

गेल्या काही महिन्यांत शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) अनेकदा एकाच कार्यक्रमात दिसून आले. वेगवेगळ्या साखर कारखान्यांच्या बैठकीत दोघांची उपस्थिती आणि झालेल्या गुप्त चर्चांमुळे एकत्र येण्याच्या शक्यतेला पुष्टी मिळाली होती. मात्र यावर अधिकृतपणे कुठलाही खुलासा नव्हता.

आता शरद पवारांनी स्वतः या चर्चांना उघडपणे वाचा फोडल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आगामी काळात हे दोघे पुन्हा एकत्र येतात का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

महाराष्ट्राची वित्तीय शिस्त आणि आर्थिक विकासातील योगदान कौतुकास्पद

0
– सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया
• सोळाव्या वित्त आयोगाची बैठक
• राज्याने आर्थिक वाटपासाठी मांडल्या महत्त्वाच्या मागण्या
मुंबई, दि.9: महाराष्ट्राच्या वित्तीय शिस्तीचे आणि देशाच्या आर्थिक विकासात राज्याच्या भरीव योगदानाचे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया यांनी कौतुक केले. सह्याद्री अतिथीगृह येथे सोळाव्या वित्त आयोगाची बैठक झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार, यांनी आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया, सदस्य डॉ. मनोज पांडा व डॉ. सौम्यकांती घोष यांचे स्वागत केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या वतीने आयोगासमोर निवेदन सादर केले. या निवेदनात आयोगाच्या कार्यसूचीनुसार राज्याच्या विविध मागण्या व सूचना मांडण्यात आल्या. महाराष्ट्र शासनाने केंद्र व राज्यांमधील विभागणी (Vertical Devolution) ४१ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. तसेच अधिभार (cesses) व उपकर (surcharges) हे मुख्य करांमध्ये समाविष्ट करावेत आणि केंद्र सरकारच्या करेतर उत्पन्नाचाही समावेश विभागणीच्या निधीत करावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे.
राज्याने क्षैतिज वाटपासाठी (Horizontal Devolution) नवीन निकष सुचवले आहेत, ज्यामध्ये ‘शाश्वत विकास व हरित ऊर्जा’ आणि भारताच्या ‘जीडीपी’मध्ये राज्यांचा वृद्धीमान योगदान’ यांचा समावेश आहे. याशिवाय ‘उत्पन्न अंतर निकष’ (Income Distance Criteria) ४५ टक्क्यांवरून ३७.५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची विनंती करण्यात आली आहे.
विशेष अनुदानासाठी १,२८,२३१ कोटींची मागणी
राज्याने विशेष अनुदानांतर्गत मुंबई महानगर प्रदेशाच्या आर्थिक मास्टर प्लॅनची अंमलबजावणी, नदीजोड प्रकल्प, नवीन उच्च न्यायालय संकुल, कारागृह पायाभूत सुविधा, वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर वसतीगृहे आणि इको-टूरिझमसाठी एकूण ₹१,२८,२३१ कोटींच्या निधीची मागणी केली आहे. तसेच राज्यासाठी महसूल तूट अनुदान (Revenue Deficit Grant) सुद्धा शिफारस करण्याची विनंती आयोगाकडे करण्यात आली.
‘एसडीआरएफ’ व स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वाढीव निधीची मागणी
राज्याने आपत्ती निवारण निधी (SDRF) अंतर्गत एकूण तरतूद वाढवावी आणि केंद्र-राज्य वाटपाचा हिस्सा ७५:२५ वरून ९०:१० असा करावा, अशी मागणी केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अनुदान ४.२३ टक्क्यांवरून ५ टक्के विभागणी निधीतून करावे तसेच राज्यातील ग्रामीण व नागरी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार या अनुदानाचे वितरण करावे. शहरे व महानगरपालिकांसाठी सार्वजनिक बस वाहतूक व अग्निशमन सेवेसाठीही स्वतंत्र अनुदान द्यावे, अशी विनंती करण्यात आली.
या बैठकीदरम्यान आयोगाने व्यापारी व उद्योग प्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशीही चर्चा केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार– शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

0
महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक
नवी दिल्ली, 9 : हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूपात माहिती व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे महत्त्वपूर्ण मागणी केली असून, ती मागणी तात्काळ मान्य करण्यात आली आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यात नवी दिल्लीत पार पडलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीदरम्यान हा ऐतिहासिक निर्णय आज घेण्यात आला. या बैठकीत शैक्षणिक सुधारणांसह अनेक महत्त्वपूर्ण मागण्या व प्रस्ताव मांडण्यात आले, ज्यांना केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
शास्त्री भवन येथे श्री. प्रधान यांच्या कार्यालयात संपन्न झालेल्या या बैठकत केंद्रीय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार, अतिरिक्त सचिव अनिल कुमार सिंघल, अतिरिक्त सचिव आनंद पाटील, राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, रणजीतसिंह देओल, शिक्षण आयुक्त संचिंद्र प्रताप सिंह, राज्य शैक्षणिक विभाग व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार तसेच अन्य वरिष्ठ अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देशव्यापी शैक्षणिक अभ्यासक्रमात अधिक व्यापक स्वरूपात समाविष्ट करण्याची महत्त्वपूर्ण मागणी महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आली. ही मागणी तात्काळ मान्य करत, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संबंधित सचिवांना केंद्रीय पाठ्यपुस्तक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (NCERT) पाठ्यपुस्तकांमध्ये याचा समावेश करण्याचे निर्देश दिले. “छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध होणे, ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे,” असे श्री. भुसे यांनी बैठकीनंतर प्रसार माध्यमांना महाराष्ट्र सदन येथे ही माहिती दिली.
यासोबत, मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्याच्या पार्श्वभूमीवर, मराठी भाषेचा राष्ट्रीय शैक्षणिक पातळीवर उचित समावेश होण्याबद्दलची मागणी केली. या मागणीला श्री. प्रधान यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी दिले. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीत महाराष्ट्रात सध्या राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक योजनांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये ‘पीएम श्री’ योजनेच्या धर्तीवर राज्यात ‘सीएम श्री’ योजनेअंतर्गत 5,000 शाळांना आदर्श शाळा बनवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यासोबत, 100 पेक्षा जास्त विद्यार्थी असलेल्या वर्गांना आदर्श वर्ग, स्मार्ट क्लासरूम, आनंद गुरुकुल आणि विभागनिहाय विशेष शाळा सुरू करण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला. या प्रकल्पांसाठी आवश्यक आर्थिक सहायता बाबत श्री. भुसे यांनी श्री. प्रधान यांना विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले.
यासोबतच, ‘पीएम पोषण’ योजनेअंतर्गत शाळांमधील स्वयंपाकी आणि स्थानिक पातळीवरील कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवणे, शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांच्या कोट्यात वाढ करणे, केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये सरकारी अनुदानित शाळांचा समावेश करणे आणि ग्रामीण तसेच आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी परिवहन सुविधा सुधारणे यासारख्या मागण्या बैठकीत मांडण्यात आल्या. या सर्व मागण्यांना धर्मेंद्र प्रधान यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

महिला तलाठी अश्विनी ठोंबरेला ८०० रुपयांची लाच घेणे भोवले

0

सडक अर्जुनी: वारस फेरफार नोंद घेण्यासाठी पैशांची मागणी करून ती कार्यालयातील खासगी इसमामार्फत स्वीकारल्याप्रकरणी ग्राम चिखली येथील महिला तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकली आहे. अश्विनी ठोंबरे असे महिला तलाठी तर ओंकार शेंडे (रा. कोहळीटोला) असे खासगी इसमाचे नाव आहे.नाव असून सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली येथील तलाठी साजा क्रमांक १७ येथे कार्यरत आहे.
प्राप्त माहितीनुसार तक्रारदाराच्या आईचा मृत्यू झाल्याने सातबारा उतारावरून नाव कमी करून वारस फेरफार नोंद घ्यायची होती. यासाठी त्यांनी रीतसर कारवाईदेखील केली होती. मात्र वारस फेरफार नोंद घेण्यासाठी १ हजार रुपये लागतील असे सांगण्यात आले व तडजोडीअंती ८०० रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याची तक्रार त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता तलाठी ठोंबरे यांनी लाच स्वीकारण्याची इच्छा दर्शविली.
यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.८) दुपारी २:३० वाजता दरम्यान सापळा लावला व तक्रारदार लाच रक्कम देण्यासाठी तलाठी कार्यालयात गेला असता तलाठी ठोंबरे यांनी रक्कम कार्यालयात काम करणाऱ्या खासगी इसम ओंकार शेंडे यांच्या मार्फत स्वीकारली असता पथकाने दोघांनी रंगेहात पकडले.