28.7 C
Gondiā
Friday, May 3, 2024
Home Blog Page 4

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

0

सोलापूर, दिनांक 1:- महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त तसेच कामगार दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. व जिल्ह्यात विविध धर्माचे, पंथाचे, वंशाचे, जातीचे तसेच विविध प्रदेशाचे लोक बंधुभावाने, सलोख्याने एकतेच्या भावनेने नांदत असल्याचे सांगून सर्वजण मिळून राष्ट्रीय ऐक्य अधिक मजबूत करुया, असे आवाहन ही यावेळी त्यांनी केले.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, प्रांताधिकारी विठ्ठल उदमले, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्यासह अन्य विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व नागरिक, पत्रकार उपस्थित होते.

1 मे 1960 हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिन. याच दिवशी महाराष्ट्राचा मंगलकलश मिळाला आणि नव्या महाराष्ट्र राज्याची मुहुर्तमेढ रोवली गेली. आजच्या या मंगलदिनी मराठी भाषिकांचे  राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात बलिदान दिलेल्या 105 हुतात्मांना ही श्रध्दांजली अर्पण करून महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी आपले योगदान व बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात महान विभूतींना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिवादन केले.

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

0

सिंधुदुर्गनगरी, दि.1 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, उपजिल्हाधिकारी शारदा पोवार, आरती देसाई, तहसिलदार प्रज्ञा काकडे,  जिल्हा नियोजन अधिकारी श्री बुधावले, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, माविमचे जिल्हा व्यवस्थापक नितीन काळे, जिल्हा उद्योग केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक श्री.दामले, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्यासह मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

देशाच्या विकासात महाराष्ट्राचे मोलाचे योगदान – जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर

0

मुंबई उपनगर, दि. 1 : राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही मोलाचे योगदान दिले आहे. लोकशाहीला अधिक मजबूत बनविण्यासाठी आपण सर्वांनी मतदानाच्या या प्रक्रियेत सहभागी होऊन 20 मे 2024 रोजी मतदानाचा हक्क बजावू या, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.

आज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, चेतना कॉलेज जवळ सकाळी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रॅलीची सुरूवात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर व अन्य प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीमध्ये झेंडा दाखवुन करण्यात आली. या रॅली मध्ये मुंबई शहरच्या अपर जिल्हाधिकारी फरोग मुकादम, अपर जिल्हाधिकारी तथा स्वीपचे नोडल अधिकारी किरण महाजन, बृहन्मुंबई महानगरपालिका उपायुक्त विश्वास मोटे, उपजिल्हाधिकारी संदीप निश्चित, स्वीप चे नोडल अधिकारी डॉ.सुभाष दळवी, समाज कल्याणचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार आणि जिल्ह्यातील सायकल ग्रुपचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

 

मुंबई उपनगर जिल्ह्यात 26-मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम, 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या या महोत्सवात अधिकाधिक मतदारांनी मतदान करून आपले कर्तव्य पार पाडावे म्हणून तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय व ‘स्वीप’ उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आज महाराष्ट्र दिनी या  बीवायसीएस, मुंबई व मुलुंड रायडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे (पूर्व), मुंबई येथून सायकल रॅलीला सुरवात करण्यात आली. त्यानंतर ही रॅली वेगवेगळ्या मार्गाने मार्ग बोरीवली येथील प्रबोधन ठाकरे नाट्यगृह, अंधेरी क्रीडा संकुल, एनसीपीए, दक्षिण मुंबई आणि मुलुंडचे कालिदास नाट्यमंदिर  येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. अनेकांनी उत्स्फूर्तपणे या रॅलीमध्ये सहभाग घेतला आणि मतदानाचे आपले कर्तव्य बजावण्याचा संकल्प केला. यावेळी स्वीपच्या माध्यमातून ‘मी मतदान करणार’ अशी प्रतिज्ञाही सर्वांनी घेतली.

६५ वा महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस : राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण

0

मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन मुंबई येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राष्ट्रगीत व राज्य गीत सादर करण्यात आले.  राज्यपालांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तसेच मुंबई पोलीस दलाचे अधिकारी व जवान उपस्थित होते.

००००

राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र दिन साजरा

मुंबईदि. १ : महाराष्ट्र राज्याच्या ६५व्या स्थापना दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आज गौरवगीत गायनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

शिवाजी पार्क येथील मुख्य शासकीय सोहळ्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे क्रीडाभवन येथे ६५ व्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम पार पडला.

 

यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणीअतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशीअतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदेउपायुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळेसहायक आयुक्त (जी उत्तर) अजितकुमार आंबी आदी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम् गायनाने करण्यात आली. महानगरपालिकेच्या संगीत अकादमीच्या वाद्यवृंदाने यावेळी देशभक्तीपर गीतांचे वाद्य संगीताच्या माध्यमातून सादरीकरण केले. यावेळी राज्यपालांनी संगीत अकादमीच्या सर्व कलाकारांचे अभिनंदन केले.

जिवंत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणत्र कोर्टात नेले, पोलिसांच्या जाळ्यात सापडले

0

गोंदिया:कोर्टानं ठोठावलेला आर्थिक दंड वाचवण्यासाठी जिवंत व्यक्तीचं मृत्यू प्रमाणपत्र नेणाऱ्यांचा पोलिसांनी मोठ्या हुशारीनं पर्दाफाश केला. एखाद्या चित्रपटात शोभेल असा हा प्रकार गोंदियामध्ये घडलाय. या प्रकरणात कोर्टानं दोन्ही आरोपींना दोषी ठरवलंय. त्यांना 5 वर्ष कैद आईणि 1000 रुपयांची शिक्षा सुनावली आहे.

जिल्हा न्यायालय गोंदिया यांच्या वतीनं ऑक्टोबर 2017 मध्ये पोलीस कर्मचारी मेथीलाल ब्रिजलाल भंडारी यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार झालेल्या सुनावणीत कोर्टानं श्रीकांत भैयालाल मोटघरे आणि प्रवीण गभणे यांना 10 हजारांचा आर्थिक दंड ठोठावला होता. या निर्णायाच्या विरोधात प्रवीण गभणेनं अपील केलं होतं. या अपिलाच्या सुनावणीच्या दरम्यान प्रवीण गभणेचा मेहुणा श्रीकांत मोटघरे गैरहजर होता. त्यावर प्रवीणने श्रीकांत मोरघरे याचे मृत्यू प्रमाणपत्र कोर्टात सादर केले.प्रवीणनं मृत्यू प्रमाणपत्र सादर करताच गोंदिया पोलीस कामाला लागले. त्यांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून श्रीकांतला पकडलं आणि कोर्टात सादर केलं. मृत्यू प्रमाणपत्र सादर केलेल्या व्यक्तीलाच कोर्टात सादर केल्यानं संपूर्ण बनाव उघड झाला. या प्रकरणात गोमदिया न्यायालयानं दोन्ही आरोपींना सबळ पुराव्याच्या आधारे दोषी ठरवलं आहे. दोन्ही आरोपींना कलम 555/17 कलम 420, 468 अन्ववये दोषी ठरवत 5 वर्षांची कैद आणि 1000 रुपये दंडाची शिक्षा न्यायालयानं दिली आहे.

ट्रेन के एसी कोच में मिला , 33 किलो गांजा भरा बैग

0

गोंदिया। उड़ीसा तथा छत्तीसगढ़ के कई शहरों से मादक पदार्थों की बिक्री का गौरव धंधा फल फूल रहा है , नशे के सौदागर नशीले पदार्थों की खेप एक राज्य से दूसरे राज्य तक पहुंचाने के लिए ट्रेन का इस्तेमाल कर रहे हैं , इन तस्करों पर नकेल कसने के लिए रेलवे सुरक्षा बल हर गतिविधि पर नज़र बनाए हुए हैं और अवैध रूप से मादक पदार्थों की तस्करी के रोकथाम हेतु आरपीएफ गोंदिया पोस्ट द्वारा विशेष निगरानी एवं चेकिंग करते हुए ऑपरेशन नार्कोस चलाया जा रहा है।

गांजा तस्करी के संदर्भ में रविवार 29 अप्रैल 2024 को गोपनीय जानकारी मिली इसके बाद संबलपुर से पुणे जा रही समर स्पेशल ट्रेन ( गाड़ी संख्या क्रमांक 08327 ) जैसे ही गोंदिया में प्लेटफार्म क्रमांक 3 पर पहुंची तो एसी कोच B2 को चेक करते हुए सीट के नीचे रखे बैग के बारे में कोच में बैठे संदिग्ध यात्रियों से पूछताछ की गई , वे संतोष पूर्ण जवाब नहीं दे पाए जिस पर बैग खुलवाने पर तीक्ष्ण गंध वाला गांजा जैसा पदार्थ पाया गया , नशीले पदार्थ को प्लास्टिक की थैलियां में अच्छी तरह से टेपिंग कर उन्हें बैग में भरकर ट्रेन की बोगी में रखा गया था , गांजे के पैकेट्स सहित दो महिला और तीन पुरुष यात्रियों को आरपीएफ पोस्ट गोंदिया लाया गया जहां अधिकारियों व गवाहों के समक्ष बैग खोला गया , बरामद किए गए अच्छी क्वालिटी के गांजे का कुल वजन 33 किलो 210 ग्राम है जिसका वर्तमान बाजार मूल्य 6 लाख 64 हजार रुपए आंका गया है।बहरहाल बैग व गांजा भरे बंडलों को कानूनी कार्रवाई हेतु दस्तावेजों सहित जीआरपी पुलिस के सुपुर्द किया गया है ।रेलवे पुलिस ने पकड़े गए सभी पांच आरोपियों पर मामला दर्ज करते इस बात की जांच पड़ताल शुरू कर दी है कि इस गांजा तस्करी सिंडिकेट के तार कहां-कहां तक और किस-किस से जुड़े हुए हैं।

गोंदिया शहर में पहली बार विदर्भस्तरीय बैडमिंटन टूर्नामेंट का आयोजन

0

गोंदिया. स्थानीय प्रताप क्लब बैडमिंटन हाल, गोंदिया में विदर्भ स्तरीय बैडमिंटन प्रतियोगिता का आयोजन २७ एंव २८ अप्रेल को किया गया था। जिसमे विदर्भ के कुछ प्रमुख जिलों के खिलाड़ियों ने सहभाग लिया था। इस प्रतियोगिता में गोंदिया जिले के खिलाड़ियों ने बढ़ चढ़कर भाग लिया एवम उत्कृष्ट खेल का प्रदर्शन भी किया। इस प्रतियोगिता में गोंदिया जिले से अनिकेत बोस, अभिजीत शाह, अकबर, आर्यन, अमित साबू, मनीष सोनी, कुणाल नामुजवार, संतोष बिसेन, पार्थ मोदी, वैभव अग्रवाल, मिहीर अग्रवाल, अंश भाटिया, मुकुल अग्रवाल, धनराज आहूजा, राजेश व्यास, मार्शल एंथोनी, सनी अरोरा, ललित शर्मा, सूरज फंडे, लक्ष्य साहू, प्रभाकर पालंदुरकर, शंकर भदाड़े, अनिल शिवनकर, मुनेश ठाकरे, जयेश वेगड़, सुभाष असाटी, अभय तानडेकर, तरंग, देवांश, लाबोनी, रिया, आदर्श विश्वकर्मा, रजत, शिवम, निखिल ने भाग लिया एवम उत्कृष्ट खेल का प्रदर्शन किया। टूर्नामेंट में ओपन डबल्स के विजेता रहे नागपुर के गौरव रेगेे और प्रणव लोखंडे। नागपुर के पिनाकी मुखर्जी और जयेंद्र ढोले उपविजेता रहे। नागपुर के ही जयेंद्र ढोले और प्रणव लोखंडे टैग डबल्स में विजेता और पिनाकी मुखर्जी और गौरव रेगे उपविजेता रहे। गोंदिया शहर के वरिष्ठ खिलाड़ी सुभाष असाटी को स्टार प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के रूप में चुना गया।

टूर्नामेंट के सफल आयोजन के पश्चात पुरस्कार वितरण समारोह में सुनील धोटे, मनोज अग्रवाल, जयंत लक्केवार, निलेश शाह, करण मनुजा उपस्थित थे। पुरस्कार वितरण के बाद अपने मनोगत व्यक्त करते हुए सुनील धोटे ने बाहर अलग अलग जगह से आए हुए सभी खिलाड़ियों के खेल की प्रशंसा की और निकट भविष्य में प्रताप क्लब में इससे और बड़े स्तर के और अधिक बेहतर खेल के आयोजन होने की घोषणा की। उन्होंने आयोजकों के कार्यों को भरपूर सराहना की। इस प्रतियोगिता में उपस्थित सभी खिलाड़ियों ने गोंदिया शहर में बैडमिंटन के खेल को और अधिक ऊंचे दर्ज पर ले जाने के लिए अपने अपने सुझाव भी दिए। अन्य जिलों से आए खिलाड़ियों ने गोंदिया में ऐसे टूर्नामेंट के बार बार आयोजन करने का आग्रह भी किया। कार्यक्रम का संचालन एवम आभार प्रदर्शन अनिकेत बोस ने किया।

हिरडामाली नाल्यात मिळाले अज्ञात इसमाचे मृतदेह

0

गोरेगाव- पोलीस ठाणे अंतर्गत हिरडामाली जवळील नाला परिसरात अज्ञात इसमाचे मृतदेह 30 एप्रिल मंगळवारच्या दुपारच्या असल्याचे समोर आले.गोरेगाव गोंदिया राज्य मार्गावर हिरडामाली नाला येतो या नाला परिसरात एक एका अज्ञात इसमाचा मृतदेह दिसून आला.घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिंसानी घटनास्थळ गाठून घटनेच्या पंचनाम्याची प्रक्रिया करुन मृतदेह ताब्यात घेतले.वृत्तलिहेपर्यंत मृतकाची ओळख पटली नव्हती.

‘लोकराज्य निवडणूक विशेषांक’ माहितीपूर्ण आणि संग्रहणीय – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

0

मुंबई, दि. 30 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेला उत्सव निवडणूकीचा अभिमान देशाचा’ हा  लोकराज्यचा निवडणू्‌क विशेषांक माहितीपूर्ण आणि संग्रहणीय असल्याचे मतप्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी व्यक्त केले.

राज्यात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात होत असून या संपूर्ण प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगामार्फत करण्यात येत असलेली तयारीमतदारांच्या सोयीसाठीच्या विविध ॲपची माहितीत्याचसोबत आचारसंहिता बाबतची  सविस्तर माहिती या अंकात देण्यात आली आहे. यासोबतच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची विश्वासार्हतास्वीप उपक्रमयापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीतील आकडेवारी अभ्यासक,पत्रकार वाचकांच्या सुलभ संदर्भासाठी या अंकात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

तसेच वाचकांसाठी हा विशेषांक dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच महासंचालनालयाच्या महासंवाद या ब्लॉग समाजमाध्यमावर ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध आहे.

प्रत्येकाने मतदार दूत म्हणून काम करावे – जिल्हाधिकारी अभिनव गोयल

0

धुळे, दि. ३०  : येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी प्रत्येकाने आपले कुटूंब, शेजारी, नातेवाईक यांना मतदान करण्यास प्रेरीत करुन मतदार दूत म्हणून काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी धुळेकरांना केले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ‘स्वीप’ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून धुळे शहरात आज महसूल, जिल्हा परिषद, पोलीस, महानगर पालिका व इतर विविध विभागांसह अनेक सामाजिक संस्था, संघटनामार्फत महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी श्री. गोयल बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी तथा ‘स्वीप’ चे जिल्हा नोडल अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, स्वीपचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी संजय बागडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, मनपा अतिरिक्त उपायुक्त करुणा डहाळे, उपायुक्त संगीता नांदुरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, गणेश मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, उपनिबंधक सहकार मनोज चौधरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले की, येत्या २० मे २०२४ रोजी होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी धुळ्यातील प्रत्येक मतदाराने दूत म्हणून काम करुन लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कार्यास हातभार लावावा. आज धुळे शहरात ‘स्वीप’ अंतर्गत जिल्हा प्रशासनामार्फत महारॅली काढण्यात आली असून या रॅलीमार्फत नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

धुळ्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘वोट कर धुळेकर’ ही संकल्पा राबविण्यात येत असून सर्व धुळेकरांनी मतदान करण्याबरोबरच तुम्ही तुमच्या कुटूंब, कॉलनी, परिसर, नातेवाईक तसेच तुमच्या संपर्कातील सर्व नागरिकांनाही मतदानासाठी प्रवृत्त करावे. विद्यार्थ्यांनीही आपल्या पालकांना व नातेवाईकांना मतदानासाठी प्रवृत्त करुन येत्या लोकसभेत सर्वांनी भयमुक्त निपक्षपणे मतदान करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. भारत निवडणूकीच्या आदेशानुसार उन्हाळयाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्पची व्यवस्था, पिण्याचे पाणी, शेडची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. नागरिकांना मतदानाच्या वेळी कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यांची दक्षता प्रशासनामार्फत घेण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी महसूल, जिल्हा परिषद, पोलीस विभाग, महानगर पालिका व इतर विविध विभागांसह अनेक सामाजिक संस्था, संघटनांच्या चार पथकामार्फत रॅली आयोजित करण्यात आली होती. या चारही रॅली शिवतीर्थ, संतोषी माता चौक, धुळे येथे एकत्रितपणे येऊन संतोषी माता चौक ते गरुड मैदानापर्यंत महारॅली काढण्यात आली. यावेळी उपस्थितांनी मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, मी मतदान करणार, वोट कर धुळेकर, इथे सगळी बोटे सारखी आहेत,अठराव वरीस मोक्याच., मधाच्या बोटाला बळी पडू नका, आदि घोषणा दिल्या. या महारॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

गरुड मैदान येथे मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी शिक्षक कलापथकाने तसेच महाविद्यालयीन विद्यार्थींनीनी पथनाट्य तर दुर्गेश बोरसे यांनी अहिराणी गीत सादर केले. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सर्व उपस्थितांना मतदान करण्याबाबत शपथ दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्लेफी पॉईंट वर सेल्फी फोटो घेतला तसेच ‘मी मतदान करणार’ याबाबत स्वाक्षरी मोहिमेच्या  बोर्डवर स्वाक्षरी केली. कार्यक्‌रमाचे प्रास्ताविक स्वीप नोडल अधिकारी मनपा तथा उपायुक्त संगिता नांदुरकर यांनी तर आभार प्रदर्शन उप मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी केले. या महारॅलीत ज्येष्ठ नागरिक संघ, माध्यम प्रतिनिधी, दिव्यांग, योगा क्लब, सायकलींग क्लब, लायन्स क्लब, रोटरी क्लब, विविध सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था आणि शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, हौसिंग सोसायटी, जिल्हा व सहकारी बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, माथाडी कामगार, तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला.

०००