31.9 C
Gondiā
Friday, May 16, 2025
Home Blog Page 5653

जिल्ह्यात नवोदय विद्यालय सुरू करा

0

साकोली,दि.25: भंडारा जिल्ह्यात नवोदय विद्यालय तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी साकोलीवासीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसिलदारामार्फत दिलेल्या निवेदनातून केली निवेदन दिले.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यासह संयुक्त असताना साकोलीमध्ये नवोदय विद्यालय होते. जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली, त्याचवेळी नवेगावबांध जिल्हा गोंदिया येथे नवोदय विद्यालय हलविण्यात आले. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांना स्वतंत्रपणे नवोदय विद्यालय आहेत. मात्र भंडारा जिल्ह्याच्या विभाजनापासून या जिल्ह्यात नवोदय विद्यालयाची स्थापनाच करण्यात आली नाही.
शासनाच्या निर्णयाप्रमाणे या शैक्षणिक सत्रापासून वर्ग ५ ते ८ मध्ये शिकत असलेल्या मुलांची नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठीची स्पर्धा परीक्षा होणार आहे. परंतु फक्त गोंदिया जिल्ह्यातील नवोदय विद्यालयाच्या मंजुर तुकडी संख्याच्या आधारे भंडारा व गोंदिया स्पर्धा परीक्षा देणार्‍या मुलांचा निकाल लावला जातो. त्यामुळे बरीच गुणवंत विद्यार्थी नवोदय विद्यालयात प्रवेश मिळाल्यापासून वंचित राहतात. त्यामुळे इतर शाळा व महाविद्यालयमध्ये मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखनी व लाखांदूर तालुक्यात आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त तीन तालुके आहेत. नवीन निर्मित पालघर जिल्ह्यासह आदिवासी बहुल नंदुरबार व धुळे जिल्ह्यातही शासनाच्या वतीने नवोदय विद्यालयाची निर्मिती केली आहे. भंडारा जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवंत असलेल्या मुलांच्या पुढील प्रगतीसाठी भंडारा जिल्ह्यातही नवोदय विद्यालयाची स्थापना होणे आवश्यक आहे. शिष्टमंडळामध्ये एन.एम. घोडीचोर, कैलास गेडाम, फिरोज खान, शब्बीर पठान, विजय रामटेके, किशोर नंदुरकर, जयश्‍वर मेश्राम, प्रल्हाद रामटेके उपस्थित होते.

उरणमध्ये तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात

0

मुंबई : रायगड जिल्ह्यातील उरण शहरांत 4 संशयित घुसल्याची शक्यता असतानाच, तिकडे उरणमधील गव्हाण गावातून तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली.हे तीन संशयित कोण आहेत, त्यांचाउरणमधील घटनेशी संबंध आहे का, याचा तपास सुरु आहे.पोलिसांनी दोन संशयितांची रेखाचित्रं जारी केली होती.गुरुवारी सकाळी उरण शहरात 4 संशयित घुसल्याचं सांगण्यात येत होतं. शाळेतील विद्यार्थ्यांनी या संशयितांकडे बंदूक असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे उरण शहरात सुरक्षा रक्षकांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं होते.लष्कराचे गणवेश घातलेले चार संशयित उरणमध्ये फिरताना दिसल्याची माहिती शाळकरी विद्यार्थ्यांनी पोलिसांना दिली होती. तर ते चार संशयित दहशतवादीही असू शकतात अशी शक्यता पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी व्यक्त केली होती

थेट जनतेतूनच होणार नगराध्यक्षपदाची निवडणूक !

0

गोंदिया दि..२४:आगामी नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेतून होणार की नगरसेवकांमधून, अशा संभ्रमात राज्यभरातील राजकीय मंडळी असताना राज्य निवडणूक आयोगाने विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवून नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेतूनच होणार असल्याचा स्पष्ट उल्लेख केल्याने राजकीय मंडळींचा जीव भांड्यात पडला आहे.

राज्यातील नगरपरिषदांच्या निवडणुकांच्या तारखा जवळ येत असून, इच्छुकांची उत्सुकता दिवसेंदिवस शिगेला पोहचली आहे. यंदा राज्य सरकारने नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेतूनच करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी पूर्वीच्या अडीच वर्षांच्या कालावधीच्या अनुषंगाने नगराध्यक्षपदाचे आरक्षणही जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे अनेक इच्छूक कामाला लागले. अशातच जनतेतून नगराध्यक्षाची निवड करण्याचा निर्णय बदलण्याचा सरकार विचार करीत असल्याची चर्चा सुरु झाली. यंदाच्या उन्हाळ्यापासून अशा चर्चेला ऊत आला. प्रत्येक वेळी ‘या आठवड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होऊ शकतो’, असे सांगण्यासही अफवा बहाद्दर विसरत नव्हते. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी आपापल्या पक्षश्रेष्ठींकडे व नेतृत्वाकडे फिल्डिंग लावून बसलेल्या व आतापर्यंत पार्ट्यांवर बराच खर्च केलेल्या इच्छूक उमेदवारांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. मात्र, काल(ता.२३) राज्य निवडणूक आयोगाने सर्व विभागीय आयुक्त आणि मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळता सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले असून, निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व केंद्राध्यक्षांची नेमणूक करण्याची सूचना केली आहे. या पत्रात राज्य सरकारच्या ३० ऑगस्ट २०१६ च्या अध्यादेशाचा उल्लेख केला असून, नगर परिषदांमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी बहुसदस्यीय प्रभागपद्धती तसेच नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून करण्याची पद्धत लागू केल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता संभाव्य उमेदवारांच्या चेहऱ्यावर हसू फुलणार आहे.

स्वतंत्र विदर्भासाठी श्रीहरी अणेंनी काढला स्वतंत्र राजकीय पक्ष

0
नागपूर, दि. २४ –  स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी राजकीय पर्याय आवश्यक असल्याचे स्पष्ट करीत महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ते व विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी विदर्भ राज्य आघाडी (विरा) या राजकीय पक्षाची शनिवारी घोषणा केली. या पक्षाची लवकरच राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्यात येईल. यानंतर आगामी स्थाानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 विदर्भ राज्य आघाडीतर्फे (विरा) लकडगंज येथील टिंबर भवन येथे विदर्भस्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्याला मार्गदर्शन करतांना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्रीहरी अणे यांनी उपरोक्त घोषणा केली.
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्यावर आपण कधीपर्यंत काँग्रेस व भाजपाच्या भरवश्यावर राहणार ? आता आपल्यालाच सत्ता मिळवून स्वतंत्र राज्य निर्माण करून घ्यावे लागले. त्यासाठी विदर्भाची नवीन लीडरशीप निर्माण करण्याची गरज आहे. ते राजकीय पक्षाचा पर्यान निर्माण केल्यानेच होईल.  लवकरच स्थानिक स्वरज्य संस्थांचा निवडणुका येत आहेत. त्यामुळे हीच योग्य वेळ आहे. आम आदमी पार्टीने जशी चुक केली, तसे करणार नाही, असे स्पष्ट करीत विदर्भ राज्य आघाडी या निवडणुकांमध्ये आपले उमेदवार उभे करेल. परंतु सर्वच जागा लढवणार नाही. जया जागांवर शक्य आहेत. त्याच जागा लढणार. इतर विदर्भवादी राजकीय पक्षांसोबत आघाडी किंवा उमेदवार उभे करतांना तडजोड सुद्धा करता येईल, असेही त्यांनी सांगितले. मराठा समाजाच्या मोर्चासंदर्भात अ‍ॅड. अणे यांना पत्रकारंनी विचारले असता ते म्हणाले, त्यांना आरक्षण मिळायला हवे, परंतु आरक्षणासाठी सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण हे निकष हे. तेव्हा  या निकष तपासून पाहावे व त्यांना आरक्षण द्यावे. दुसरा मुद्दा अ‍ॅट्रोसिटीचा आहे. अ‍ॅट्रोसिटी कायद्याचा कधीकधी दुरुपयोग होतो, ही बाब खरी असली तरी एकच समाज सातत्याने जातीय अत्याचाराला बळी पडत आहे, ही सुद्धा वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नगरसेवक अशोक (गप्पू) गुप्ता के प्रयासों से प्रभाग क्र. 6 में सड़क बांधकाम की शुरूआत

0
गोंदिया। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के युवा आईकॉन एवं नगरसेवक अशोक (गप्पू) गुप्ता अपने जनप्रतिनिधित्व क्षेत्र/प्रभाग में हर प्रकार की समस्या के निराकरण के लिये सदैव तत्पर है। प्रभाग को स्वच्छ और साफ सुथरा रखने, नागरिकों की समस्यायें सुनने,क्षेत्र के विकास को लेकर निरंतर अपने प्रभागवासीयों के संपर्क में रहकर उनकी समस्याओं का समाधान करते है तथा अपने जनसंपर्क कार्यालय में हर समय उपलब्ध रहकर उन समस्याओं का निराकरण करते है।
हाल ही में नगर उत्थान निधि से मंजूर 6 लाख रूपयों की लागत से उनके द्वारा प्रभाग क्र. 6 गांधीवार्ड में डॉ. हागडे जी के घर से संतोषजी नेवारे के घर तक तथा नरेशजी आष्टीकर के घर से अमीतजी बोरकर के घर तक सड़क निर्माण के बांधकाम का शुभारंभ किया गया। इस दौरान नगरसेवक अशोक (गप्पू) गुप्ता के हस्ते निर्माण कार्य का शुभारंभ होते ही तत्काल सड़क निर्माण का कार्य भी युध्दस्तर पर जारी हो गया।
इस शुभ अवसर पर शांता सोनवाने, राजु तिड़के, सेजू पटेल, राजु रेड्डीवार, नरेश आष्टीकर, नामदेव रहिले, राजु सोनवाने, विजय उके, निता पटेल, संतोष नेवारे, राजकुमार कापसे, उश्या सोनवाने, गिता नागफासे, विलास भजे, प्रतिक भरणे, गणेश मेश्राम, सुखराम नागफासे, राजु चन्ने, लिलेश्वर सोनवाने, पूनाराम ब्राम्हणकर, मुरली चन्ने, मंगेश नागफासे, रौनक भरणे, संजु रोकडे, श्यालू तिडके आदि वार्डवासीयों सहित गणमान्य नागरिक उपस्थित थे।

जिल्हा सामान्य रूग्णालयात १६६ पदे रिक्त

0

चंद्रपूर : राज्य शासनाकडून आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्षच केले जात आहे. जिल्ह्यातील ३ उपजिल्हा रूग्णालये, १० ग्रामीण रूग्णालये व जिल्हा सामान्य रूग्णालयात वर्ग १, वर्ग २, वर्ग ३ व वर्ग ४ संवर्गातील तब्बल ३०७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे आरोग्य सेवा पुरती खिळखिळी झाल्याचे दिसून येते.

चंद्रपूर जिल्ह्यात ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३३९ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ९ अ‍ॅलोपॅथीक दवाखाने, १० आर्युवेदीक दवाखाने, ३ उपजिल्हा रूग्णालये, १० ग्रामीण रूग्णालये आहेत. यापैकेी ३ उपजिल्हा रूग्णालये, १० ग्रामीण रूग्णालये व जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये चारही संवर्गातील ९२० पदे मंजूर आहेत. यातील केवळ ५१३ पदे भरण्यात आली असून ३०७ पदे गेल्या कित्येक वर्षांपासून रिक्त आहेत. तर आरोग्य केंद्र व उपकेंद्रांचीही हीच अवस्था आहे.वरोरा, चिमूर व मूल या तीन उपजिल्हा रूग्णालयात वर्ग १ चे ३ पदे मंजूर असून एकच पद भरण्यात आले आहे. वर्ग २ च्या २९ पदांपैकी ११ पदे रिक्त आहेत. वर्ग ३ च्या ९५ पदांपैकी ३४ तर वर्ग ४ च्या ४६ पदांपैकी २५ पदे रिक्त आहेत. तर दहा ग्रामीण रूग्णालयात वर्ग १ चे १० पदे मंजूर असून ९ पदे रिक्त आहेत. वर्ग २ च्या ३१ पदांपैकी ६ पदे रिक्त आहेत. वर्ग ३ च्या १५४ पदांपैकी ४४ तर वर्ग ४ च्या ७० पदांपैकी २० पदे रिक्त असून ही पदे भरण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अत्यंत महत्त्वाचे रूग्णालय समजल्या जाणाऱ्या चंद्रपुरातील जिल्हा सामान्य रूग्णालयात तब्बल १६६ पदे रिक्त आहेत. या रूग्णालयात वर्ग १ च्या २० पदांपैकी १० पदे रिक्त आहेत. वर्ग २ च्या ३७ पदांपैकी १ रिक्त, वर्ग ३ च्या २७९ पदांपैकी ८५ पदे रिक्त असून वर्ग ४ संवर्गातील १७६ मंजूर पदांपैकी तब्बल ७० पदे रिक्त आहेत.

वाहनाच्या धडकेत हरीणाचा मृत्यू

0

भंडारा : जंगलातून भटकलेल्या एका हरीणाचा भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारला दुपारी २ वाजताच्या सुमारास भंडारा-रामटेक मार्गावरील खुर्शीपार-टवेपारनजीक घडली.

माहितीनुसार, भंडारा-रामटेक मार्गावरील खुर्शीपार हा परिसर जंगलाला लागून आहे. या मार्गाने पियुष घाटोळे हा तरूण दुचाकीने खातकडे जात होता. काही अंतरावर त्यांना मोठा आवाज आला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले असता खुर्शीपार मार्गावर एक हिरन तडफडत असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी या हरीणाला पाणी पाजले. जखमा जास्त असल्यामुळे या हरीणाचे तडफडणे बंद झाले नव्हते. काही वेळातच या हरीणाचा मृत्यू झाला. याची माहिती त्यांनी भंडारा वनविभागाला दिली. माहिती मिळाल्यानंतर वनकर्मचारी गौरी नेवारे हे ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून या मृत हरीणाला घेऊन गेले. त्यानंतर पशुवैद्यकीय रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह पुरण्यात आला.

नाली व सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

0

गोंदिया : खा. प्रफुल्ल पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून गोंदिया शहराच्या प्रभाग-१७ श्रीनगर येथे दिलीप तुळसकर यांच्या घरामागे नाली व सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. प्रभागातील नागरिकांच्या निवेदनावर नगरसेविका आशा पाटील यांच्याद्वारे सदर कार्य खा. प्रफुल्ल पटेल यांच्या निधीतून मंजूर करवून घेतली.
भूमिपूजनप्रसंगी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष विनोद हरिणखेडे, शहर अध्यक्ष शिव शर्मा, प्रदेश प्रतिनिधी देवेंद्रनाथ चौबे, नगरसेवक अशोक गुप्ता, माजी नगराध्यक्ष आशा पाटील, नगरसेवक मनोहर वालदे, अशोक शहारे, रवी मुंदडा, राजू एन. जैन, विष्णू शर्मा, प्रीतपाल होरा, माधवदास खटवानी, गुड्ड बिसेन, विनोद पाटील, रौनक ठाकूर, सोनू राय, विनित शहारे, दिलीप तुलसकर, परसराम सावरकर, आसाराम मोहनकर, गोविंदराव मेंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

निराधार योजनांचा आढावा

0

तिरोडा : स्थानिक तहसील कार्यालय येथे संजय गांधी निराधार योजनेच्या आढावा बैठकीमध्ये आ. विजय रहांगडाले यांनी तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनांचा आढावा घेतला. राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले. या वेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष उमाकांत हारोडे तसेच सदस्य भाऊराव कठाणे, मनोहर बुद्धे, उत्तम कुकडे, दिनेश पटले, राजू भांडारकर, उपविभागीय अधिकरी सुनील सूर्यवंशी, तहसीलदार रविंद्र चव्हाण, गटविकास अधिकारी मानकर, तालुका कृषी अधिकारी पोटदुखे, नायब तहसीलदार सतिश मासाळ, कुंभरे उपस्थित होते.

आत्मविश्वास व सकारात्मक विचारसरणीसाठी खेळ उपयुक्त- रामगावकर

0

गोंदिया दि. 24: खिलाडू वृत्तीने चांगले काम केल्यास यश नक्की मिळते. जीवनात आत्मविश्वास वाढीसाठी व सकारात्मक विचारसरणीसाठी खेळ उपयुक्त ठरतात, असे प्रतिपादन उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी केले.जिल्हा पोलीस क्र ीडा स्पर्धा-२०१६ चा समारोप आणि बक्षीस वितरण कार्यक्रम शुक्रवारी (दि.२३) कारंजा येथील पोलीस कवायत मैदानावर डॉ.रामगावकर यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते. पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते (गोंदिया), मंदार जवळे (देवरी), दिपाली खन्ना (आमगाव), परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक राजीव नवले, आयबीचे पशीने यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

या तीन दिवसीत स्पर्धांमध्ये देवरी विभागाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. आमगाव द्वितीय तर तिरोडा विभाग तृतीय क्रमांकावर राहीला. चौथ्या क्रमांकावर गोंदिया मुख्यालय तर पाचव्या क्रमांकावर गोंदिया विभाग राहीला.

विविध स्पर्धा आणि त्यातील विजेते स्पर्धक

५०० मीटर धाव (पुरूष गट) स्पर्धेत गुलाब हरिणखेडे प्रथम, कृपाण डोंगरवार द्वितीय, १००० मी. धावमध्ये शिशुपाल दमाहे प्रथम, अजय इंगळे द्वितीय, १५०० मी. धाव स्पर्धेत गुलाबचंद हरिणखेडे प्रथम, हिमेश भुजाडे द्वितीय, १५०० मी.धाव (महिला गट) रत्नकला भोयर प्रथम, ज्योती सव्वालाखे द्वितीय, ८०० मी.पुरुष- गुलाबचंद हरिणखेडे प्रथम, संजय घरतकर द्वितीय, ८०० मी. महिला- शिल्पा मते प्रथम, नितू चौधरी द्वितीय, ४०० मी.पुरुष आशिष छोेडे प्रथम, रणधीर साखरे द्वितीय, ४०० मी. महिला ज्योती बांते प्रथम, नितू चौधरी द्वितीय, २०० मी.पुरुष हितेश भुजाडे प्रथम, छगन खोटेले द्वितीय, २०० मी. महिला ज्योती बांते प्रथम, कल्पना अंबुले द्वितीय,

१०० मी.रिले पुरुष आमगाव विभाग प्रथम, तिरोडा विभाग द्वितीय, १०० मी.रिले महिला गोंदिया प्रथम, गोंदिया विभाग द्वितीय, ४०० मी.रिले पुरुष तिरोडा विभाग प्रथम, आमगाव विभाग द्वितीय, ४०० मी.ईडल्स पुरुष हितेश भुजाडे प्रथम, विजय चुलपार द्वितीय, ४०० मी.ईडल्स महिला ज्योती बांते प्रथम, रत्नकला भोयर द्वितीय, १०० मी.ईडल्स पुरुष रामेश्वर राऊत प्रथम, हिमश भुजाळे द्वितीय, १०० मी.ईडल्स गायत्री बरेजू प्रथम, रत्नकला भोयर द्वितीय, १०० मीटर महिला पोलीस मुख्यालयातील ज्योती बांते प्रथम, रत्नकला भोयर द्वितीय, १०० मीटर पुरूष आमगावचे सनोज सपाटे प्रथम, तिरोडाचे छगन खोटेले द्वितीय,

लांब उडी (पुरुष) राजू कासरे प्रथम, विशाल मरकाम द्वितीय, लांब उडी (महिला) ज्योती बांते प्रथम, श्यामकला भेयर द्वितीय, थाली फेक (पुरुष) जावेद प्रथम, तेजराम कावळे द्वितीय, थाली फेक (महिला) गायत्री बरेजू प्रथम, आशा मेश्राम द्वितीय, गोळा फेक (पुरुष) साकीर शेख प्रथम, महेश पाळे द्वितीय, गोळा फेक (महिला) संगीता गावळ प्रथम, गायत्री बरेजू द्वितीय, भाला फेक (पुरुष) कुलदीप डोळस प्रथम, पंकज खरवळे द्वितीय, भाला फेक (महिला) आशा मेश्राम प्रथम, स्मिता गजबे द्वितीय, उंच उडी (पुरुष) खेमराज कोरे प्रथम, राजेंद्र दमाहे द्वितीय, उंच उडी /महिला गायत्री बरजू प्रथम, श्यामकला भोयर द्वितीय, तिहरी उडी पुरुष विशाल मरकाम प्रथम, रामेश्वर राऊत द्वितीय.

सांघिक खेळातील विजेता-उपविजेता चमू

फुटबॉल (पुरुष) प्रथम गोंदिया, द्वितीय तिरोडा विभाग, हॅन्डबॉल (पुरुष) प्रथम देवरी विभाग, द्वितीय आमगाव विभाग, व्हॉलीबाल (पुरुष) प्रथम पो.मु.गोंदिया, द्वितीय आमगाव विभाग, व्हॉलीबॉल (महिला) प्रथम गोंदिया विभाग, द्वितीय पो.मु. गोंदिया, बास्केटबॉल (पुरुष) प्रथम देवरी विभाग, द्वितीय आमगाव विभाग,बास्केटबॉल (महिला) प्रथम गोंदिया विभाग, द्वितीय पो.मु. गोंदिया,

कबड्डी (पुरुष) प्रथम आमगाव विभाग, द्वितीय देवरी विभाग, कबड्डी (महिला) प्रथम पो.मु. गोंदिया, द्वितीत गोंदिया विभाग, खो-खो (पुरुष) प्रथम तिरोडा विभाग, द्वितीय आमगाव विभाग, खोे-खो (महिला) प्रथम पो.मु. गोंदिया, द्वितीय गोंदिया विभाग, बेस्ट अ‍ॅथलेटीक्स (महिला) ज्योती बांते पो.मु.गोंदिया, बेस्ट अ‍ॅथलेटीक्स (पुरुष) हिमेश भुजाळे तिरोडा विभाग, जनरल कॅम्पयनशीप (महिला) पो.मु. गोंदिया, जनरल चॅम्पयनशीप (पुरुष) देवरी विभागाने पटकावली