पुणे, दि. 20 – डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला शनिवारी तीन वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून ओंकारेश्वर पुलावर निषेध रॅलीचं आयोजन करण्यात आलं. हत्येला तीन वर्ष पुर्ण होऊनदेखील तपासाची चक्र अजूनही संथ असून आरोपी मोकाट असल्याचा निषेध करत यावेळी अंनिसतर्फ मोर्चा काढण्यात आला. अंनिसने काढलेल्या निषेध मोर्चामध्ये प्रकाश आंबेडकर, बाबा आढाव, अतुल पेठे, संध्या गोखले, मुक्ता दाभोलकर उपस्थित होते.
कानशिलात लगावणा-या भाजप आमदाराचे आत्मसमर्पण
भंडारा,दि. 20- भंडारा येथील भाजपाचे आमदार रामचंद्र अवसरे यांनी एका पोलिसाच्या कानशिलात लगावली होती. एका मिरवणूकीतून आमदाराची कार चालत होती. पोलिसाने आमदाराच्या कारचालकाला कार बाजूला घेण्यास सांगितले. यावरुन हा वाद निर्माण झाला. आमदाराची ही दबंगगीरी कॅमे-यात कैद झाली. पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी आमदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आज भाजप आमदार रामचंद्र अवसरे यांनी पोलिसांकडे आत्मसमर्पण केले आहे.
अधिकारवाणी नाकारली तरच मानवी विकास शक्य-पद्मभूषण प्रा.डॉ.माधव गाडगीळ
गडचिरोली, दि.२०: विज्ञानाने अधिकारवाणी मान्य करणं थांबवलं, तेव्हाच आधुनिक विज्ञान युरोपात विकसित झाला. आता भारतातील लोकांनीही विज्ञानवादी बनून अधिकारवाणी नाकारली, तरच या देशातील मानवी विकास शक्य आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मभू्षण डॉ.माधव गाडगीळ यांनी आज येथे केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ‘सामूहिक वनहक्क मान्यता प्राप्त करण्यासाठी ग्रामसभांसाठी वनकार्यआयोजना मार्गदर्शक तत्त्वे आणि मार्गदर्शिका’ या पुस्तिकेचे प्रकाशन डॉ.गाडगीळ यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त तथा विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष श्री.अनुपकुमार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून राज्यपालांच्या कार्यालयातील उपसचिव परिमल सिंह, आदिवासी विकास विभागाच्या उपायुक्त डॉ.माधवी खोडे, विदर्भ विकास मंडळाच्या सदस्य सचिव निरुपमा डांगे, जिल्हाधिकारी रंगा नायक, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यपालन अधिकारी श्री.गोयल, सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, मोहन हिराबाई हिरालाल, डॉ. विजय एदलाबादकर आदी मान्यवर उपस्थित होते.
NPAs nearly doubled to 8.5 per cent in Q1: Report
MUMBAI(PTI): The banking sector’s non-performing assets (NPA) almost doubled to 8.5 per cent in the first quarter of this fiscal, driven by surging bad assets of state-run lenders, Care Ratings said.
The banking system’s gross NPAs shot up to 8.5 per cent by the June quarter, as against 4.6 per cent a year ago. The spike was largely due to the doubling of NPAs at public sector banks to 10.4 per cent compared to 5.3 per cent in June 2015.
However, the rating agency did not quantify the bad loans in absolute terms.
Private sector lenders witnessed their NPA ratio increasing to 3 per cent from 2.1 per cent a year ago, it added.
“The state-run banks have been under pressure to identify and provide for their NPAs, which could last for another one to two quarters,” the agency said, adding the high NPAs and consequent provisioning is an “area of concern” that will impact their profitability going forward.
Many state-run lenders reported net losses in the June quarter, with market leader SBI turning in a 32 per cent drop in net income, while private sector banks’ net collectively fell just 2.6 per cent.
The agency said given the government’s plan to raise money by offloading stakes in banks, profit is an important issue.
“High NPAs and low profitability would not augur well if the government is working towards lowering its stake in these banks to 51 per cent,” it said.
However, it termed the recognition of NPAs as a positive step in the long term as higher provisioning makes the state-run lenders better prepared to face the market.
पी. व्ही. सिंधूने उंचावली देशाची मान
पी. व्ही. सिंधूला बॅडमिंटनमध्ये रौप्य
रिओ डि जानिरो(वृत्तसंस्था) : जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या कॅरोलिना मरिनच्या अनुभवासमोर भारताची पी. व्ही. सिंधू अगदी थोडक्यात कमी पडली. अत्यंत चुरशीने आणि जिद्दीने खेळल्या गेलेल्या बॅडमिंटनच्या अंतिम लढतीत मरिनने सिंधूवर 2-1 अशी मात केली. सिंधू रौप्य पदकाची मानकरी ठरली. बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक पटकाविणारी सिंधू ही पहिलीच भारतीय आहे. ऑलिंपिक पदक मिळविणारी सिंधू ही सर्वांत तरुण भारतीय खेळाडू आहे. वयाच्या 21 व्या वर्षीच तिने ही कामगिरी केली आहे.
कॅरोलिन मरिन ही बॅडमिंटनमधील अनुभवी खेळाडू आहे. आतापर्यंत तिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि युरोपीय स्पर्धांमध्ये प्रत्येकी दोन वेळा विजेतीपदे पटकाविली आहेत. डावखुऱ्या मरिनसमोर खेळणे हेच अनेक खेळाडूंना जड जाते. आतापर्यंत कॅरोलिनाने 239 विजय मिळविले आहेत, तर केवळ 74 पराभव स्वीकारले आहेत. पण कॅरोलिनच्या गत कामगिरीचे दडपण न घेता सिंधू खेळली. तब्बल एक तास 20 मिनिटे हा सामना सुरू होता.
सामन्याच्या पहिल्या गेमपासून सिंधू-मरिनमध्ये कडवी लढत सुरू झाली होती. पिछाडी भरून काढत सिंधूने पहिला गेम 21-19 असा जिंकला. यामुळे मरिनवर दडपण आले होते. पण अनुभवी मरिनने दुसऱ्या गेममध्ये धडाक्यात सुरवात केली. जोरदार स्मॅशच्या जोरावर तिने सिंधूला या गेममध्ये पुनरागमनाची संधी दिली नाही. हा गेम सिंधूने 12-21 असा गमावला.
दोघींनी प्रत्येकी एक गेम जिंकल्यामुळे तिसरा गेम निर्णायक ठरणार होता. यात मरिनने सुरवातीलाच सलग चार गुण घेत सिंधूवर दडपण आणले. तरीही सिंधूने काही अप्रतिम स्मॅश मारत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण मरिनने सुरवातीला घेतलेली आघाडी भरून काढणे सिंधूला शक्य झाले नाही. या सामन्यातील प्रत्येक गेममध्ये बहुतांश गुणांसाठी सिंधू-मरिनमध्ये दीर्घ रॅली झाल्या.
सिंधूने इतिहास घडवला, रौप्य पदक पटकावलं
वृत्तसंस्था
रिओ डि जानिरो : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या कॅरोलिना मरिनच्या अनुभवासमोर भारताची पी. व्ही. सिंधू अगदी थोडक्यात कमी पडली. अत्यंत चुरशीने आणि जिद्दीने खेळल्या गेलेल्या बॅडमिंटनच्या अंतिम लढतीत मरिनने सिंधूवर 2-1 अशी मात केली. सिंधू रौप्य पदकाची मानकरी ठरली. बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक पटकाविणारी सिंधू ही पहिलीच भारतीय आहे. ऑलिंपिक पदक मिळविणारी सिंधू ही सर्वांत तरुण भारतीय खेळाडू आहे. वयाच्या 21 व्या वर्षीच तिने ही कामगिरी केली आहे.
कॅरोलिन मरिन ही बॅडमिंटनमधील अनुभवी खेळाडू आहे. आतापर्यंत तिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि युरोपीय स्पर्धांमध्ये प्रत्येकी दोन वेळा विजेतीपदे पटकाविली आहेत. डावखुऱ्या मरिनसमोर खेळणे हेच अनेक खेळाडूंना जड जाते. आतापर्यंत कॅरोलिनाने 239 विजय मिळविले आहेत, तर केवळ 74 पराभव स्वीकारले आहेत. पण कॅरोलिनच्या गत कामगिरीचे दडपण न घेता सिंधू खेळली. तब्बल एक तास 20 मिनिटे हा सामना सुरू होता.
सामन्याच्या पहिल्या गेमपासून सिंधू-मरिनमध्ये कडवी लढत सुरू झाली होती. पिछाडी भरून काढत सिंधूने पहिला गेम 21-19 असा जिंकला. यामुळे मरिनवर दडपण आले होते. पण अनुभवी मरिनने दुसऱ्या गेममध्ये धडाक्यात सुरवात केली. जोरदार स्मॅशच्या जोरावर तिने सिंधूला या गेममध्ये पुनरागमनाची संधी दिली नाही. हा गेम सिंधूने 12-21 असा गमावला.
राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे आमदार पुराम यांना निवेदन
देवरी,19 (berartimes.com)- येत्या मार्च महिन्यामध्ये मुदत संपत असल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रुग्णसेवा देणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने त्यांच्या सेवेची दखल घेऊन या कर्मचारी व अधिकाऱ्यांना समकक्ष पदावर कायम ठेवण्याविषयीच्या मागणीचे निवेदन राज्यशासनाला आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांचे मार्फत पाठविण्यात आले आहे.
आज शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास स्थानिक आमदार संजय पुराम यांच्या जनसंपर्क कार्यालयात जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आ. पुराम यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे, आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ.मीनाक्षी वट्टी, कनिष्ठ अभियंता थनेंद्र येडे, जिल्हा सनियंत्रण व मूल्यांकन अधिकारी बिसेन, देवरीचे तालुका लेखापाल प्रकाश थोरात आदी अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश होता.
यावेळी झालेल्या चर्चेत शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान हे 2005 पासून संपूर्ण देशात राबविले जात असून एकट्या महारा्ष्ट्रात सुमारे 80 हजारावर कर्मचारी व अधिकारी यांची नेमणूक केली. यातील बहुतांश कर्मचाऱ्यांनी वयाची 45वी गाठली असून त्यांनी लाखो रुग्णांची सेवा केली आहे. सदर योजना येत्या मार्च नंतर पुढे चालू ठेवली नाही तर अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबींयांवर उपासमारीची वेळ येईल. याशिवाय राज्याच्या आरोग्यसेवेवर त्याचे गंभीर परिणाम होतील. तरी रुग्णसेवेचा आणि कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार करून या योजनेला मुदतवाढ द्यावी किंवा अधिकारी व कर्मचारी यांना समकक्ष पदावर कायम ठेवण्यात यावे, अशी विनंती शिष्टमंडळाच्या वतीने राज्य शासनाला करण्यात आली आहे. यावेळी आमदार पुराम यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की, सरकार या विषयावर गंभीर आहे. मी सुद्धा कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारशी चर्चा करून हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांना दिले.
शिष्टमंडळात जिल्ह्यातील सर्व लेखापाल, डाटा ऑपरेटर, आरोग्य सेविका, आरोग्य साहाय्यिका, आशा समन्वयक आदी कर्मचारी व अधिकारी यांचा समावेश होता.
‘साईबाबा’ प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी
गडचिरोली,- नक्षल्यांना मदत करीत असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी अटक केलेले व सध्या जामीनावर असलेले दिल्ली विद्यापीठाचे प्रो.जी.एन.साईबाबा यांच्या प्रकरणाची सुनावणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु असून, सरकारी पक्षातर्फे सर्व साक्ष पुरावे तपासल्यानंतर आज पुरावे पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.
गडचिरोली पोलिसांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे प्रा.जी.एन.साईबाबा यांना ९ मे २०१४ अटक केली होती. ४ एप्रिल २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर प्रा.साईबाबा कारागृहाबाहेर आले. मात्र तत्पूर्वीच २७ ऑक्टोबर २०१५ पासून साईबाबा प्रकरणाची सुनावणी गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु करण्यात आली. ही सुनावणी आताही सुरु असून, आज सरकारी पक्षातर्फे सर्व साक्ष पुरावे तपासून पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी प्रा.साईबाबा यांच्या वकिलांनी साक्षदारांची उलटतपासणी घेतली. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ ऑगस्टला घेणार असल्याचे जाहीर केले. सरकारी पक्षातर्फे अॅड.सत्यनाथन व अॅड. सचिन कुंभारे यांनी काम पाहिले, तर प्रा.जी.एन.साईबाबा यांच्यातर्फे अॅड. सुरेंद्र गडलिंग व अॅड.जगदीश मेश्राम यांनी युक्तीवाद केला.
सोशल मीडियाचा वापर आक्रमकपणे करा- राठोड
वृत्तसंस्था
नवी दिल्ली- पोलादी पडद्याचे युग काळाआड गेले आहे. आता सरकारने जनतेला योग्य माहिती जलद गतीने उपलब्ध करून देण्याची गरज असल्याने सोशल मीडियाचा आक्रमकपणे वापर करा, असा सल्ला केंद्रातील माहिती व नभोवाणी खात्याचे राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी अधिकाऱ्यांना गुरुवारी दिला.
संवाद साधण्यासाठी फेसबुकचा प्रभावी वापर कसा करावा, यासंदर्भात पत्रसूचना कार्यालयातील (पीआयबी) अधिकाऱ्यासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन राठोड यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, “”आपण खुले होण्याची गरज आहे. अजूनही सरकार पोलादी पडद्याच्या आधार घेत आहे. पण आता काळ बदलत असल्याने प्रथम आपल्या विचारसरणीत बदल करायला हवा. निर्णय घेणाऱ्यांपासून तिचा प्रसार करणाऱ्यांपर्यंत माहिती पोचविण्याची प्रक्रिया जलद गतीने होणे आवश्यक आहे. यात सोशल मीडिया महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. कारण दूरचित्रवाणीवरील चर्चा असे याचे स्वरूप नसून सार्वजनिक मतांचे प्रतिबिंब त्यात दिसत असते.
भाजपा नगरसेवक महेंद्र निंबार्तेचा काँग्रेस पक्षात प्रवेश
भंडारा,दि.१९-भंडारा जिल्ह्यातील सक्रिय युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे भाजपाचे नगरसेवक महेंद्र निंबार्ते यांनी मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोकराव चौहाण, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, प्रदेश महासचिव रामकिशन ओझा, ऍड गणेश पाटील, यांच्या प्रमुख उपस्थितीत तर प्रदेश महासचिव डॉ. बबनरावजी तायवाडे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी आमदार सेवक वाघाये, प्रदेश सरचिटणीस जिया पटेल, माजी आमदार आनंदराव वंजारी, प्रफुल्ल गुढघे पाटील, मुजीब पठाण, आसवारीताई देवतळे, प्रमोद तितिरमारे, प्रमिला कुटे, मनोहर सिंगनजुडे, सीमाताई भुरे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
१९९४ पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत प्रवेश घेऊन त्यांनी विदयार्थी चळवळीत सक्रिय भूमिका निभावली. १९९८ ते २००५ पर्यंत अभाविपचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून चंद्रपूर,गडचिरोली,नागपूर महानगर,नागपूर जिल्हा,यवतमाळ तसेच वाशीम या जिल्ह्यांमध्ये संघटनमंत्री म्हणून कार्य केले. त्यांनी विविध कार्यकारणी वर काम केले. विदर्भ प्रदेश शिक्षा प्रकोष्ठाचे पाच वर्ष भरीव कार्य केले. अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड तसेच प्रदेश सहमंत्री म्हणून निवडीमुळे त्यांनी यादरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक समस्या जाणून घेतल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व्दितीय वर्ष संघ शिक्षा वर्ग शिक्षित स्वयंसेवक सुद्धा आहेत. विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून लोकप्रिय झालेले महेंद्र निंबार्ते २००५ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठावर सिनेट सदस्य म्हणून प्रचंड बहुमताने निवडून आले. युवा सदस्य म्हणून त्यांनी विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नांवर विद्यापीठाला नेहमीच धारेवर धरले. याशिवाय विद्यार्थी कल्याण हे केंद्रबिंदू मांडून शिक्षणक्षेत्रात कार्य केले. २०११ मध्ये दुसऱ्यांदा सिनेट सदस्य म्हणून निवडून येण्याचा मान पटकाविला. यातूनच पुढे ते विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवडून आले. व्यवस्थापन परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी कल्याणाच्या दृष्टीने विविध योजना मंजूर करून घेतल्या तसेच विद्यापीठ प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या समस्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यास बाध्य केले. समाजातील प्रत्येक स्तरातील विद्यार्थ्यांना शासकीय, विद्यापीठाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी लढा दिला. विद्यार्थी सहाय्यता निधीच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदत मिळवून दिली. २०११ मधेच भंडारा नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग पाच मधून नगरसेवक या पदावर निवडून आले. याशिवाय त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सचिव व भाजयुमोच्या जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले. आपल्या कार्याने युवकांच्या मनात अढळ स्थान मिळवून त्यांनी पदवीधरांची प्रतिनिधी म्हणून नाव लौकिक मिळविला आहे. सध्या ते वाईल्डलाईफ प्रोटेक्शन फोर्स ऑफ विदर्भ चे अध्यक्ष सुद्धा आहेत.