34.8 C
Gondiā
Thursday, May 15, 2025
Home Blog Page 6490

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, २१ नव्या मंत्र्यांचा समावेश

0

नवी दिल्ली – मनोहर पर्रिकर, जे.पी.नड्डा, मुक्तार अब्बास नक्वी यांच्यासह २१ नव्या चेह-यांचा मंत्रिमंडळात समावेश करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार करण्यात आला आहे . १४ राज्यमंत्री, चार कॅबिनेट मंत्री आणि तीन राज्यमंत्र्यांनी(स्वतंत्र प्रभार) यावेळी शपथ घेतली.राष्ट्रपती भवनामधील दरबार हॉलमध्ये रविवारी हा शपथविधीचा हा सोहळा पार पडला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या सर्व मंत्र्यांना शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती सुमित्रा महाजन, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्री, भाजपचे खासदार यावेळी उपस्थित होते.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह जे.पी.नड्डा, सुरेश प्रभू, वीरेंद्र सिंह चौधरी यांनी केंद्रीय कॅबिनेटमंत्रिपदाची शपथ घेतली तर बंडारु दत्तात्रय, राजीव प्रताप रुडी, महेश शर्मा यांनी राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार)पदाची शपथ घेतली. यासोबतच गिरीराज सिंग, मोहन कुंदारिया, सनवर लाल जट, हरिभाई पार्थीभाई चौधरी, राम कृपाल यादव, मुख्तार अब्बास नक्वी, हंसराज आहिर ,डॉ. रामशंकर कटेरिया , वाय.एस.चौधरी(इंग्रजीमध्ये शपथ घेतली) ,जयंत सिन्हा ,राज्यवर्धन सिंग राठोड , बाबूल सुप्रियो(इंग्रजीमधून शपथ घेतली), साध्वी निरंजन ज्योती, विजय सम्पला यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

कॅबिनेट मंत्री

»मनोहर पर्रिकर,
»जे.पी नड्डा,
»सुरेश प्रभू,
»वीरेंद्र सिंह चौधरी

राज्यमंत्री

»गिरीराज सिंग
»मोहन कुंदारिया
»सनवर लाल जट
»हरिभाई पार्थीभाई चौधरी
»राम कृपाल यादव
»मुख्तार अब्बास नक्वी
»हंसराज आहिर
»डॉ. रामशंकर कटेरिया
»वाय.एस.चौधरी
»जयंत सिन्हा
»राज्यवर्धन सिंग राठोड
»बाबूल सुप्रियो
»साध्वी निरंजन ज्योती
»विजय सम्पला

राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार)

»बंडारु दत्तात्रय
»राजीव प्रताप रुडी
»डॉ. महेश शर्मा

शिवसेनेचा केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारावर बहिष्कार

0

मुंबई-आज केंद्रात होत असलेल्या केंद्रीय मंत्रीमडळामध्ये सहभागी न होण्याचा निणर्य शिवसेनेने घेतला अाहे.त्यासंबधात माहिती आनंदराव अडसूळ यांनी पत्रकारांना दिली असूून दिल्ली विमानतळावर हजर असलेल्या शिवसेनेच्या खासदारांना मंत्रीमंडळात सहभागी होणार नसल्याचे खुद्द अनिल देसाईंना फोन करुन शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कळविले आहे.शिवसेने्चया या भूमिकेमूळे शिवसेना महाराष्ट्रात आता विरोधी पक्षाच्या बाकावर बसण्याची शक्यता वतर्विली जात आहे.

हंसराज अहिर यांच्या नावावर शिक्कामोर्तब

0

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात राज्यातील चंद्रपूरचे खा. हंसराज अहिर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सायंकाळी त्यांना अधिकृतपणे सांगण्यात आले. त्यांना कोळसा मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार दिला जाणार असल्याचे संकेत मिळाले आहे. सध्या अहिर लोकसभेच्या कोळसा व खाण स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत.
त्यांच्या नावावर एकमत झाल्यांतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी गडकरींनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यानंतर ‘लोकमत’शी बोलताना अहिर म्हणाले, की माझ्या नावाचा विचार होणे हीच माझ्या कामाची पावती आहे. खात्याबाबत मला विचारणा झालेली नाही. मात्र कोळसा हा विषय आपल्या अभ्यासाचा आहे.
अहिर चारवेळा चंद्रपूर येथून विजयी झाले आहेत. २६ मे रोजी झालेल्या शपथविधीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश असल्याचा निरोप दिला होता. पण ऐनवेळी गडकरी यांनी त्यांना प्रकाश जावडेकर यांच्या सहभागामुळे आपल्या नावाचा विस्तारात विचार केला जाईल, असा निरोप दिला होता. मात्र यावेळी विस्ताराच्या दोन दिवस आधी स्वत: गडकरी यांनी त्यांचा सन्मान केल्याने अहिर आनंदी दिसत होते.
चंद्रपूरचा दबदबा केंद्र व राज्य सरकारात सध्या चंद्रपूर जिल्ह्याचा दबदबा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मूळचे चंद्रपूरच्या मूल येथील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरमधील बल्लारपूरचे आणि आता केंद्रीय मंत्री होणारे हंसराज अहिर चंद्रपूरचे खासदार आहेत.

संजूभाऊ, आता आमच्या विकासाची दोरी तुमच्या हाती!

0

देवरी- आजही संजय पुराम तरुणांच्या गळ्यातील ताईत आहेत, ते आंबेडकरी विचारसरणीमुळेच. केवळ गरीब, आदिवासीच नाहीत तर बहुजन समाजातील कोणत्याही व्यक्तीवर अन्याय झाला, हे कळताच ते कधीही स्वस्थ बसले नाही. अन्यायकर्ता कितीही प्रभावी असो, त्याला सडो की पळो करून सोडण्यात संजय पुराम आघाडीवर असायचे. म्हणूनच त्यांना हक्काने कालपर्यंत आणि आजदेखील मतदार बिनधास्त संजूभाऊ अशीच हाक मारतात. ते आता आमदार झाले. काही वर्षापूर्वी भाजप आणि काँग्रेस हे पक्ष त्यांचे टार्गेट असायचे. परंतु, जनकल्याणासाठी ते आता भाजपमधून आमदार झाले. त्यामुळे ते टीका करीत असलेल्याच देवी-देवतांचेच पूजन करण्याची वेळ त्यांच्यावर आली. असो, त्यांनी आता रंजल्या-गांजलेल्या तीनही तालुक्यांचा विकास करावा, एवढीच अपेक्षा त्यांच्याकडून मतदारांना आहे.
आमगाव-देवरी विधानसभेचे आरक्षण अनुसूचित जमातीकरीता राखीव होताच संजय पुराम यांनी बहुजन समाज पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. २००९ च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर संजय पुराम यांनी भाजपच्या तिकिटाच्या लालसेने प्रवेश केला. परंतु, त्यावेळी त्यांना तिकीट मिळाली नाही. नंतर २०१० या जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या सुविद्य पत्नी सविता पुराम यांनी भाजपने पुराडा जिल्हा परिषद क्षेत्रातून उमेदवारी दिली. सौ. पुराम यांनी त्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष दुर्गा तिराले यांचा दणदणीत पराभव करीत यशाची माळ आपल्या गळ्यात टाकली. सध्या पुराम या गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये महिला व बालकल्याणपदी विराजमान आहेत. यावेळी एक प्रखर नेतृत्व व युवा वर्गातील पकड असलेल्या संजय पुराम यांना भाजप श्रेष्ठी आमदारकीसाठी तिकीट देणार, हे २०१० मध्ये स्पष्ट झाले होते. तरी त्यांच्या तिकीटाला नेहमीच विरोध होत असे. परंतु, ते आपल्यालाच तिकीट मिळणार म्हणून सतत प्रयत्नशील राहिले. यात त्यांना त्यांच्या सुविद्य पत्नी सविता यांचे खूपच सहकार्य लाभले. शेवटी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांनी तिकीट दिलीच. विरोध असतानासुद्धा ते प्रचंड बहुमताने निवडून आले. आता एकेकाळचे संजू आता संजूभाऊ झाले. आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातून सर्वांत कमी वयाचे आमदार म्हणून एक कीर्तीमान त्यांनी प्रस्थापित केला. परंतु, आता संजयभाऊ यांच्यासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आमगाव, देवरी आणि सालेकसा या अतिदुर्गम नक्षल प्रभावित क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून अनेक समस्या रेंगाळलेल्या आहेत. यात ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यांची दयनीय अवस्था याचा सुद्धा समावेश आहे. या भागात शिक्षणाची समस्या आहे. सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याविषयी गैरसोय होत आहे. त्याचप्रमाणे qसचनाची पुरेशी सोय नसल्याने येथील बळीराजा देखील qचतेत आहे. येथील बेरोजगारांच्या हाताला काम नाही. अशा अनेक समस्या या विधानसभा क्षेत्राला भेडसावत आहेत. यापूर्वीच्या आमदारांनी या समस्यांकडे लक्षच दिले नाही किंवा त्यांचे प्रयत्न अपुरे पडले म्हणावे. यामुळे नेहमी आमगाव विधानसभा क्षेत्राच्या विकासाची हमी देणारे नवनिर्वाचित आमदार संजय पुराम यांच्याकडे या क्षेत्रातील लोकांच्या बèयाच अपेक्षा आहेत. तसा विचार केला तर आमगाव-देवरी क्षेत्रातील सर्वच अडचणी आणि समस्यांची पुराम यांनी चांगलीच जाण आहे. मात्र, आजपर्यंत ज्या बहुजनांच्या मदतीकरिता, प्रबोधनाकरीता ते सरसावत होते, तेच कार्य त्यांना यापुढे देखील सुरू ठेवता येतील काय? असा प्रश्न मात्र मतदारांच्या मनात अद्यापही कायम आहे.

संघ स्वयंसेवकावर स्मृती इराणी मेहेरबान, व्हीएनआयटीचे अध्यक्षपद प्रदान!

0

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असल्याचा अर्जामध्ये उल्लेख केलेल्या, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यावर त्यांचे अभिनंदन करणाऱया आणि नागपूरमधील दौऱयावेळी काही वेळासाठी तुम्ही आपल्याच घरामध्ये थांबला होतात, याची त्यांना आठवण करून देणाऱया विश्राम जामदार यांची नागपूरमधील ‘विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर नियुक्ती करण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एकूण चार जणांची नावे सुचविली होती. ती सर्व बाजूला ठेवत केवळ जामदार यांचेच नाव राष्ट्रपती कार्यालयाकडे पाठविण्यात आले. त्याला १५ सप्टेंबर रोजी मंजुरी देण्यात आली. स्मृती इराणी यांच्याकडून करण्यात आलेली ही नियुक्ती वादाच्या भोवऱयात अडकण्याची शक्यता आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. स्मृती इराणी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर दोन दिवसांनी २८ मे रोजी जामदार यांनी त्यांना पत्र लिहिले होते. त्यामध्ये त्यांनी स्मृती इराणी यांचे तोंडभरून कौतुक केले होते. आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला तुमचे व्यक्तिमत्त्व एकमेवाद्वितीय असल्याचे वाटते. तुमच्या नेतृत्त्वाखाली मनुष्यबळ विकास मंत्रालय नव्या उंचीवर जाईल, असे या पत्रामध्ये लिहिण्यात आले होते. त्याचबरोबर नागपूरमधील दौऱय़ावेळी तुम्ही आमच्याच घरामध्ये काहीवेळासाठी थांबला होतात, याचीही आठवण जामदार यांनी पत्रामध्ये करून दिली होती. या पत्रासोबतच केलेल्या अर्जामध्ये त्यांनी व्हीएनआयटीचे अध्यक्षपदी आपली नियुक्ती करण्याची विनंतीही केली होती. अर्जामध्ये त्यांनी आपण संघाचे स्वंयसेवक असल्याचा उल्लेख केला होता. त्याचबरोबर केंद्रात अर्जुनसिंग मनुष्यबळ विकासमंत्री असतानासुद्धा उत्तम कामामुळेच मला व्हीएनआयटीच्या संचालक मंडळावर कायम ठेवण्यात आले होते, असेही त्यांनी अर्जामध्ये म्हटले आहे. व्हीएनआयटीच्या सध्याच्या अध्यक्षांची मुदत मे २०१४ मध्येच संपुष्टात येत असल्याची आठवण करून देत त्यांनी आपली अध्यक्षपदी नियुक्ती करण्याची मागणी अर्जामध्ये केली होती. अध्यक्षपदी नियुक्ती केल्यास आपण मनापासून आणि प्रामाणिकपणे काम करून संस्थेचा विकास करू, असेही त्यांनी पत्रामध्ये म्हटले होते.

गोंदियावरुन जाणारी वैष्णवदेवी विशेष रेल्वे रद्द

0

गोंदिया-गोंदिया येथील श्री वैष्णव देवी यात्रा समितीच्यावतीने 6 नोव्हेंबर रोजी विशेष रेल्वेगाडीने गोंदिया परिसरातील 1500 भावीक देवीच्या यात्रेकरीता रवाना होणार होते.त्यासाठी समितीच्यावतीने बिलासपूूर रेल्वे मंडळाशी करार करण्यात आला होता.या करारापोटी सूमारे 72 लाख द्यावयाचे होते.सुरवातीला 20 लाख रुपये दिल्यानंतर गाडी बुक करण्यात आली.नंतर काही कारणाने गाडी रद्द करण्यात आली होती.परंतु समितीला विशेष ट्रेन मिळत नसल्याचे कळताच त्यांनी राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांच्याकडे साकडे घातले.पटेलानी लक्ष घालून रेल्वेगाडीची सुविधा करुन दिल्याचे समितीतील काही सदस्यांचे म्हणने आहे.त्यानुसार ही रेल्वेगाडी बिलासपूरवरुन गुरुवारी रात्री 8 वाजता गोंदिया स्थानकावर पोचली.
20141106_225333
रात्री 9 वाजता दरम्यान यात्रेच्या या विशेष गाडीला झेंड़ी दाखविण्याकरीता खासदार नाना पटोले आले असता या गाडीला जो़डण्यात आलेल्या प्रेंट्री कार(रसोईयान)मध्ये स्वयपाक करण्यास अडचणी येणार असल्याचे लक्षात येताच समितीच्या पदाधिकार्यानी खासदार पटोले यांच्या निदर्शनास आणून दिले.त्यानंतर त्या पेंट्रीकार एैवजी रसोईयान लावून देण्याची मागणी करण्यात आली विशेष म्हणजे करारपत्रात रसोईयानचा स्पष्ट उल्लेख असताना रेल्वेने रसोईयान असलेला डब्बा दिला नाही.त्यातच 120 सीट अधिक डब्बे असलेली गाडी देऊन समितीकडून अधिकचे भाडेही वसुल केले त्यामुळे चिड़लेल्या समितीने रेल्वेगाडी बदलून देण्यासाठी हट्ट धरला.खासदार नाना पटोले यांनीही बिलासपूर रेल्वेच्या अधिकायाशी दुरध्वनीवर सतत चचार् केली त्याना महाराष्ट्र एक्सप्रेस गाडी यात्रेसाठी देण्याची मागणी केली ते होत नसेल यात्रेकरुना रेल्वेच्या चुकीमूळे हा प्रकार घडला असल्याने रेल्वेने या यात्रेकरुना निशुल्क जेवण उपलब्ध करुन द्यावे अशीही भूमीका मांडली.परंतु रेल्वेचे अधिकारी खासदाराचेही मानायाला तयार दिसून आले नाही.विशेष म्हणजे हा सवर् प्रकार सुरु असताना गोंदिया रेल्वेस्थानकाच्या सल्लागार समिती व रेल्वे मडंळ सद्स्य असलेले एकही सदस्य मात्र रेल्वेस्थानकावर आले नाही.ही यात्रा कुठल्या एका पक्षाची नव्हती परतु त्यालाही राजकीय रंग देण्याचा काही लोक प्रयत्न करताना दिसून आले.खासदार रात्री उशीरापयर्ंत रेल्वेस्थानकावर यात्रेकरु आणि समितीच्या सदस्यासोबंत समाधानकारक मागर् काढण्याचे प्रयत्न करीत राहिले परंतु रेल्वेच्या हेकेखोरपणामूळे समाधान न निघू शकल्याने शेवटी यात्रा समितीने ही यात्राच रद्द करीत विशेष गाडी रद्द केली.खासदार पटोले हे समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे येथील भाजप नेत्यांना कळूनही शहर अध्यक्ष,महामंत्रीसह अनेकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली.
20141106_234127

राज्यपालांना अवगत केल्या समस्या

0

गडचिरोली : राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची सर्कीट हाऊसमध्ये भेट घेऊन जिल्ह्यातील समस्या राज्यपालांना अवगत करून दिल्या, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी गुरूवारी गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान दिली.
वनकायद्यामुळे जिल्ह्यातील सुमारे २२ सिंचन प्रकल्पांचे काम रखडले आहे. देसाईगंज-गडचिरोली मार्ग मंजूर आहे. मात्र या मार्गासाठी राज्य शासनाच्या वाट्याचा निधी राज्य शासनाने दिला नाही. जिल्ह्यात ७८ टक्के जंगल आहे. भरपूर प्रमाणात खनिज साधनसंपत्ती उपलब्ध आहे. त्यामुळे या ठिकाणी उद्योग स्थापन करण्याचा फार मोठा वाव आहे. मेडीकल व आयुर्वेदीक कॉलेज स्थापन करण्यात यावे, ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे, नोकरी संदर्भातील ९ जून २0१४ च्या अधिसुचनेत बदल करण्यात यावा व त्यामध्ये स्थानिक नागरिकांना प्राधान्य देण्यात यावे, आदी मागण्या राज्यपालांकडे करण्यात आल्या. यावेळी राज्यपालांनी नोकरीसंदर्भातील अधिसूचनेत चार ते पाच दिवसांत बदल करण्यात येईल. वनरक्षक व परिचारिका ही दोनच पदे आदिवासींमधून भरण्यात येतील, असे आश्‍वासन राज्यपालांनी दिले असल्याची माहिती खासदार अशोक नेते यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली. यावेळी आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, बाबूराव कोहळे आदी उपस्थित होते

वीसपेक्षा कमी पटाच्या शाळांना अभय

0

मुंबई – वर्गाचा पट 20 पेक्षा कमी असणाऱ्या शाळा बंद पडू देणार नाही, असे आश्‍वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेला दिले आहे. परिषदेच्या शिष्टमंडळाने बुधवारी (ता. 5) तावडे यांची भेट घेतली; त्या वेळी ते बोलत होते.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध, जुन्या निकषांप्रमाणे 2013-14 ची संचमान्यता, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आश्‍वासित प्रगती योजना, पायाभूतपेक्षा अधिक वाढीव पदांना मान्यता, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्‍त्या आणि आवश्‍यक तेथे शिक्षकभरती या मुद्द्यांवर संबंधितांशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्‍वासन तावडे यांनी दिले. शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष आणि शिक्षक आमदार रामनाथ मोते, शिक्षक परिषदेचे राज्य सदस्य सुधीर घागस, ज्ञानेश्‍वर गोसावी, अनिल बोरनारे यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध माध्यमिक शाळा संहितेप्रमाणे, चिपळूणकर अहवालाप्रमाणे, 25 नोव्हेंबर 2005 च्या सरकारी निर्णयानुसार, की 23 ऑक्‍टोबर 2013 च्या निर्णयानुसार मान्य करावा, याबाबत सरकारने प्रचंड घोळ घातला आहे. राज्य सरकारच्या 23 ऑक्‍टोबर 2013 च्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे या गोंधळात भर पडली आहे. त्यामुळे एकही कर्मचारी अतिरिक्त होणार नाही, ही भूमिका घेऊन आकृतिबंध मंजूर करण्यात येईल, असे तावडे यांनी शिष्टमंडळाला सांगितले.