23.5 C
Gondiā
Monday, July 7, 2025
Home Blog Page 3

एड.लखनसिंह कटरे यांनी दिला ग्रा.पं.सदस्यत्वाचा राजीनामा

0

गोंदिया,दि.०४ः ग्रामविकासाची सर्वांगीण व शाश्वत अशी विकासाची संकल्पना जी संयुक्त राष्ट्राने प्रस्तावित केली आहे,ती संकल्पना आपल्या अडीच वर्षाच्या ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच पदावर राहून सरपंच व इतर सदस्यांच्या मनात उतरवण्याचे सातत्याने प्रयत्न करुनही त्यात असमर्थ ठरल्याने सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक एड.लखनसिंह कटरे यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्यत्वासह उपसरपंचपदाचा राजीनामा १ जुर्ले रोजी ग्रामपंचायत सरपंचाना सादर केला आहे.

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील बोरकन्हार ग्रामपंचायत मधील वार्ड क्रं.३ मधून सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक राहिलेले एड.लखनसिंह कटरे यांनी निवडणूक लढली होती.निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर उपसरपंच पद ही मिळाले.आपण आपल्या गावाचा सर्वांगीण विकासाच्या ध्यास मनात घेत ग्रामपंचायततमधील प्रशासकीय कामकाजात विकासाचा दृष्टीकोन समोर ठेऊन पाऊल ठेवले होते.परंतु आपल्या अडीच वर्षाच्या काळात सरपंच व सदस्यांकडून त्याकरीता पाहिजे तसे सहकार्य न मिळाल्याने प्रशंसनीय व डोळ्यात भरण्यालायक असे कार्य आपणास करता आले नाही,ही बाब स्विकारत आपल्या ग्रामपंचायत सदस्यत्वासह उपसरपंच पदाचा राजीनामा एड.कटरे यांनी दिला.त्यांच्या या राजीनाम्याने ग्रामपंचायत प्रशासनात चांगले व्यक्ति जे शाश्वत विकासाची कास मनात घेऊन जाण्याची इच्छा ठेवतात अशा नागरिकांसमोर एक प्रश्न उभा ठाकला आहे.

सेजगाव ग्राम पंचायतीला आयएसओ मानांकन प्रमाणपत्र देवून सन्मान

0

गोंदिया : ग्रामपंचायतींचे प्रशासकीय कामकाज कार्यक्षम करण्यासाठी तसेच कार्यपद्धतीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने ग्राम पंचायतींना आयएसओ मानांकन दिले जाते. यात सेजगाव ग्राम पंचायतीने बाजी मारली असून आयएसओ मानांकन प्राप्त केले आहे. नुकतेच प्रमाणपत्र देवून सेजगाव ग्राम पंचायतीचा सन्मान करण्यात आला.
केंद्र सरकारच्या सूचनांनुसार पंचायत राज संस्थांच्या कारभारात पारदर्शकता आणणे, नागरिकांना विविध प्रशासकीय विभागाअंतर्गत आवश्यक असलेले दाखले मिळण्यासाठी ई-पंचायत प्रकल्प राबवण्यात येत आहे. ग्रामपंचायतींच्या कामकाजात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. ग्राम पंचायतींमधील कागदपत्रांचे संगणकीकरण करून पेपरलेस ग्रामपंचायतींकडे वाटचाल सुरू आहे. यासाठी ग्रामपंचायतींचे आयएसओ प्रमाणीकरण करून घेतले जात आहे. आयएसओ मानांकन घेण्यासाठी कोणत्या कार्यपद्धतीचा वापर करावा याचे वेळापत्रक निश्चित करून देण्यात आले होते. त्यानुसार राज्य आणि जिल्हा पातळीवर समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतींच्या कामकाजाचे मूल्यमापन करून त्यांना मानांकन देण्यात येणार आहे. यानुसार सेजगाव ग्राम पंचायतीने शासनाने दिलेल्या निकषानुसार कामगिरी करून उत्तम ठरली आहे.
वैयक्तिक – सार्वजनिक शौचालय सुविधा व वापर, पाणी गुणवत्ता तपासणी, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, पायाभूत सुविधांचा विकास, आरोग्य व शिक्षण विषयक सुविधा, केंद्र वा राज्य पुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी, बचतगट, प्लास्टिक वापर बंदी, ग्रामपंचायतीच्या घरपट्टी वा पाणीपट्टी वसुली आदिमध्येही सेजगाव ग्राम पंचायतीने दमदार कामगिरी करीत नाव लौकिक केले आहे. या कामगिरीची दखल घेत सेजगाव ग्राम पंचायतीला आयएसओ मानांकन देण्यात आले आहे. नुकतेच सरपंच सौ.उषा कठाणे, उपसरपंच टेकचंदउ बिसेन यांनी आयएसओ प्रमाणपत्र स्विकारले. यावेळी ग्राम पंचायत सदस्य टी.एल.पारधी, गौरीशंकर पारधी, ग्रा.पं.अधिकारी अतुल ठाकरे, भिकराम रहांगडाले, तथा कर्मचारी वृंद उपस्थित होते.

मंदीरासमोर भरधाव कार चालकाने 6 जणांना उडवले, दोन जणांचा मृत्यू

0

छत्रपती संभाजिनगर,दि.4- सिडकोतील काळा गणपती मंदीरासमोर एका कारचालकाने सहा जणांना उडवल्याची घटना आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली. या भिषण अपघातात मंदीरचे सुरक्षा रक्षक गुणाजी लक्ष्मणराव शेवाळे, वय 60, राहणार एन-2, विठ्ठल नगर, छत्रपती संभाजिनगर यांचा जागिच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहीती मिळत आहे. या घटनेत दुस-या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहीती आहे परंतु नाव समजले नाही असे एमआयडिसी पोलिसांनी सांगितले. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत एकनाथ मगर, वय 30, राहणार सिडको, छत्रपती संभाजिनगर हा गारखेडा येथील क्रीडा संकुल येथून टेनिस खेळून परतला होता. काळा गणपती मंदीरासमोर स्विफ्ट डिझायर कार क्रं.MH-20, HH-0746 वरील ताबा सुटल्याने हा भिषण अपघात घडला.

मंदीरासमोर टर्न घेताना त्याने निष्काळजीपणे भरधाव वेगाने कार चालवत रस्त्यावर चालणा-या नागरीकांना धडक दिली. यामध्ये सुरक्षारक्षक गुणाजी लक्ष्मणराव शेवाळे, वय 60 हे गंभीर जखमी होऊन या घटनेत त्यांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहे. जखमी विकास समधाने, वय 50 व मनिषा विकास समधाने, वय 40, यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविंद्र भगवंतराव चौबे, वय 65, श्रिकांत प्रभाकर राडेकर, वय 69 यांना चिकलठाणा येथील मिनी घाटीत प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांचे नातेवाईक अधिक उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलवत असल्याची माहिती आहे.

समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात;एकाच कुटुंबातील चार जणांचा करुण अंत

0

एकाची प्रकृती चिंताजनक

वाशिम:-समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र काही केल्या थांबत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात झाला, ज्यात नागपूरच्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतक नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील रहिवासी आहे. हे सर्वजण पुण्याहून नागपूरला परत येत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, जैसवाल कुटुंब पुण्यात एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. गुरुवारी ते आपल्या कारने नागपूरकडे परत येत असताना, रात्री ९ च्या सुमारास वाशिम जिल्ह्यात त्यांच्या चालकाचा कारवरील ताबा सुटला. गाडी अनियंत्रित होत महामार्गावर धडकली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, गाडीच्या पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. घटनास्थळावरच आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताची माहिती मिळताच वाशिम पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गंभीर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी अपघाताची नोंद घेत तपास सुरु केला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गाडीचा वेग जास्त असल्याने चालकाचा ताबा सुटल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, चालकाला डुलकी आली असण्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. समृद्धी महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांनी पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन, तसेच गाड्यांची नियमित तपासणी, चालकांच्या विश्रांतीला महत्त्व देणे, यासारख्या बाबींकडे प्रशासनाचे आणि वाहनचालकांचे लक्ष असणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या अपघातामुळे जैसवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या उमरेडमधील घरी शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शहरातील 62 जिर्ण इमारतींना मनपाची नोटीस

0

चंद्रपूर 4 जुलै – महापालिका क्षेत्रातील शिकस्त इमारतींपासून परिसरातील रहिवाशांच्या जीविताला निर्माण होऊ शकणारा संभाव्य धोका पाहता चंद्रपूर महानगरपालिकेने कारवाई करण्यास सुरवात केली असुन मागील काही दिवसात 62 जीर्ण इमारतींना नोटीस देण्यात आली आहे.
पावसाळ्यात दरवर्षी महापालिका क्षेत्रातील जीर्ण व शिकस्त इमारतींचा सर्व्हे करण्यात येतो. यात आढळलेल्या धोकादायक इमारतीतील रहिवाश्यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 चे कलम 264 अन्वये नोटीस जाहीर करण्यात येते. चंद्रपूर मनपातर्फे झोन 1 अंतर्गत 30, झोन 2 अंतर्गत 20 तर झोन 3 अंतर्गत 12 अश्या एकुण 62 धोकादायक इमारतींना नोटीस देण्यात आली आहे.
नोटीसनुसार धोकादायक इमारतीमध्ये वास्तव्यास असलेल्या सर्व व्यक्तींना व महत्वाचे साहित्य अन्यत्र सुरक्षित ठिकाणी तात्काळ स्थलांतरीत होण्यास सांगण्यात आले असुन त्वरित आपल्या इमारतीची दुरुस्ती करुन घेण्याचे तसेच त्यांनतर आपल्या इमारतीचे नोंदणीकृत स्ट्रक्चरल अभियंता यांचेकडून सर्वेक्षण करुन त्याबाबतचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट मनपा कार्यालयास सादर करण्यास कळविण्यात आले आहे.
अश्या 6 इमारती यापुर्वी मनपाने निर्लेखित केल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी सदर कारवाई दरवर्षी मनपातर्फे करण्यात येते मात्र काही मालमत्ताधारक जिवाची पर्वा न करता त्याच इमारतीत तळ ठोकून राहतात. यामुळे परिसरातील रहिवाशांच्या जिवालासुद्धा धोका निर्माण होतो. मग अश्या प्रसंगी निष्कासीत करण्याची अथवा नियमानुसार कारवाई मनपातर्फे करण्यात येते.

गोसेखुर्द धरणाची १३ वक्रद्वारे उघडली

0

भंडारा : भंडारा जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दिवसभर पावसाची रिपरिप सुरु आहे. कुठे दमदार तर कुठे रिपरिप पाऊस सातत्याने कोसळत आहे. तसेच गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार दमदार व जिल्ह्यालगतच्या प्रदेशात अतिवृष्टी होत असल्याने गोसेखुर्द धरणाच्या ३३ द्वारांपैकी १३ वक्रद्वारे दि. ३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी उघडण्यात आली. यामुळे काही प्रमाणात वैनगंगानदीच्या पात्रात पाणी वाढल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा ईशारा दिला आहे.

या वर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच गोसेखुर्द धरणाची १३ वक्रद्वारे अर्ध्या मिटरने उघडण्यात आली असून १३८५ क्युमेकस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. याशिवाय धापेवाडा धरणाची ७ द्वारे उघडली असून ८९०.९ क्युमेकस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वैनगंगा नदीची कारधा येथील धोक्याची पातळी २४५.५० मी असून सध्या पाण्याची पातळी ईशारा पातळीच्या खाली आहे. (Gosekhurd Dam) गोसेखुर्द धरणाची १३ वक्रद्वारे उघडल्यामुळे वैनगंगा नदी दुथळी भरून वाहत आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान,गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रामध्ये पूर नियंत्रण करिता दि.३ जुलै रोजी सायंकाळी ६.४५ वाजता १३ वक्रद्वारे खुली करून अंदाजे १३८५ क्यूमेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. दोन्ही जलविद्युत प्रकल्पांचा २०८ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग पकडून एकूण अंदाजे १५९३ क्युमेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदी पात्रात आवागमन करणार्‍यांनी तसेच नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा ईशारा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.

आमगांव मुख्य रस्त्यांवर जनावरांचा ठिय्या!

0

आमगांव  : आमगांव नगरपरिषदेच्या हद्दीतील मुख्य रस्त्यांवर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. परंतु सकाळपासून सायंकाळपर्यंत बसस्थानक चौक, गांधी चौक, कामठा चौक, आंबेडकर चौकातील मुख्य रस्त्यांच्या मधोमध गाई व पाळीव प्राण्यांनी आपला ठिय्या मांडल्याने वाहनचालकांना (Driver) कमालीचा त्रास होत आहे.आमगांव येथील या मुख्य रस्त्यांवरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना रस्त्यावर बसणाऱ्या जनावरांचा (Animals) त्रास सहन करावा लागतो. पशुमालकांचे (Animal Owner) याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यामुळे हे प्राणी दिवसभर रस्त्याच्या मधोमध बसलेले असतात. वाहनचालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना (Principal) याबाबत माहिती दिली. परंतु आजपर्यंत, रस्त्याच्या मधोमध बसणाऱ्या पाळीव प्राण्यांवर त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे वाहनधारक व नागरिकांनी त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आमगांव शहराच्या मुख्य रस्त्यावर बसणाऱ्या जनावरांच्या मालकांवर त्यांनी तातडीने कारवाई करावी, अशी विनंती जनतेने केली आहे.

अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती पारधी लाच घेतांना अटक

0

गोंदिया,दि.०४ः गोंदिया तालुका एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयातंर्गत येत असलेल्या अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती गुलाबो पारधी यांना सोमवार(दि.३०) रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अंदाजे ९०० रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ पकडल्याची घटना उघडकीस आली आहे.सदर महिला अंगणवाडी पर्यवेक्षिकेला लाच घेतांना अटक करण्यात आल्याची माहिती लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने जिल्हा महिला बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय,जि.प.गोंदिया यांना पत्राद्वारे कळविण्यात आली असून संबधित विभागाने अंगणवाडी पर्येवेक्षिका श्रीमती पारधी यांच्यावर निलबंनाची कारवाई सुरु केली आहे.

एमपीएससीत रितिका दोनोंडेची उत्तुंग भरारी

0

गोंदिया,दि.०४ः सालेकसा तालुक्यातील साखरीटोला/सातगाव येथील रितिका प्रभाकर दोनोंडे हिने एमपीएससी राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण करून गावासह आईवडिलांचे नाव मोठे केले. त्यामुळे तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मेहनत व जिद्द असेल तर सर्व काही शक्य आहे, हे रितिकाने राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण करून सिद्ध केले. एमपीएससी राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या पीडब्लूडी विभागात वर्ग 2 पदी तिची नियुक्ती झाली आहे. या यशाचे श्रेय तिने वडील प्रभाकर दोनोंडे, आई मंजुषा दोनोडे आणि मार्गदर्शक शिक्षक व सततच्या अभ्यासाला दिले. निरंतर अभ्यासामुळेच ही मजल मारल्याचे एमपीएससी परीक्षा विजेती रितिका दोनोंडे हिने प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. भविष्यात गोंदिया जिल्हा व सालेकसा तालुक्यात काम करण्याची संधी मिळाली तर नक्कीच आवडेल. तसेच तालुक्याचे नाव मोठे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तिने यावेळी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ग्रामपंचायतींना दिल्या प्रत्यक्ष भेटी

0
स्थानिक पातळीवर जनतेची कामे मार्गी लागण्यासाठी गाव पातळीवरील विविध कार्यालयांनी घेतली गती*
गावातील नागरिकांसमवेत संवादावर भर
नागपूर,दि.4: सर्वसामान्य लोकांना स्थानिक पातळीशी निगडीत असलेल्या अडचणींवर गावातच मात करता यावी, त्यांच्या अडचणी गावपातळीवरच निकाली निघाव्यात यासाठी गाव पातळीवरील कार्यालयांनी गती घेतली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना दररोज झालेल्या कामांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा प्रशासनाने निश्चित केल्या प्रमाणे पहिला बुधवार व इतर दिवशी ग्रामपंचायत व तलाठी साजा कार्यालयात संबंधित अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष हजर राहून लोकांच्या तक्रारी मार्गी लावत आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज मौदा तालुक्यातील पावडदौना, कामठी तालुक्यातील गुमथळा व इतर गावातील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून समाधान केले.
*पंधरा दिवसात अर्ज निघतील निकाली*
तुमचे प्रश्न गावातच निकाली निघावेत यासाठी अनेक उपक्रमासमवेत समाधान दिवस हा आपण सुरु केला आहे. महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या बुधवारी प्रत्येक गावातील संबंधित अधिकारी हे गावातच उपलब्ध असल्याने त्या अर्जाबाबत तातडीने कार्यवाही केली जाईल. पहिल्या बुधवारी आलेल्या अर्जाचा निपटारा हा तिसऱ्या बुधवारी म्हणजेच पंधरा दिवसाच्या कालावधीत मार्गी लागेल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी गुमथळा ग्रामपंचायत कार्यालयाच्या बैठकीत सांगितले. या बैठकीस सरपंच शिलाताई वांगे, उपविभागीय अधिकारी सचिन गोसावी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, तहसीलदार दत्तात्रय निबांळकर, मंडळ अधिकारी राहूल भुजाडे, तलाठी प्रतिक्षा पाटील, ग्रामसेवक अंकिता चकोले आदी उपस्थित होते.
*खोट्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत*
समाधान दिवसाच्या माध्यमातून गाव पातळीवरील प्रशासनाला अधिक कर्तव्य तत्पर व गतिमान केले जात आहे. यात नागरिकांनी दिलेला प्रतिसाद उत्तम आहे. तथापी काही गावांमध्ये जाणीवपूर्वक ब्लॉकमेल करण्याच्या उद्देशाने खोट्या तक्रारी केल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.
पावडदौना येथे आयोजित समाधान दिवसात दहा तक्रारी प्राप्त झाल्या. यात आठ महसूल व दोन कृषी विभागाशी निगडीत आहेत. त्याचे निराकरण केल्या जात आहे. समाधान दिवसाच्यानिमित्ताने या ठिकाणी आरोग्य शिबीराचेही आयोजित करण्यात आले होते. त्यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.