राज्य शासनाच्या सेवेतील १५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे राज्य शासनाने बुधवार दि.२/७/२०२५ रोजी आदेश काढले असून गेल्या काही दिवसांतील ही बदल्यांची तीसरी यादी आहे.
 
०१) जगदीश मिनियार (IAS:SCS:2015) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांची मुख्य प्रशासक (नवीन टाउनशिप), सिडको, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
०२) श्रीमती वर्षा लड्डा (IAS:SCS:2015) व्यवस्थापकीय संचालक, MAVIM, मुंबई यांची सदस्य सचिव, महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
०३) वैभव वाघमारे (IAS:RR:2019) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम यांची अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग), मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
०४) श्रीमती. मिन्नू पी.एम. (IAS:RR:2021) सहाय्यक जिल्हाधिकारी, भातकुली-तिवसा उपविभाग, अमरावती यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
०५) अर्पित चौहान (IAS:RR:2022) प्रकल्प अधिकारी, ITDP, नाशिक-सह- सहाय्यक जिल्हाधिकारी, नाशिक उपविभाग, नाशिक यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशीम म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
०६) सिद्धार्थ शुक्ला (IAS:RR:2023) सुपर न्युमररी असिस्टंट कलेक्टर, गडचिरोली यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, गोंडपिंपरी उपविभाग, चंद्रपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
०७) श्रीमती. लघिमा तिवारी (IAS:RR:2023) सुपर न्युमररी असिस्टंट कलेक्टर, यवतमाळ यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, बल्लारपूर उपविभाग,चंद्रपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
०८) श्रीमती.अनुष्का शर्मा (IAS:RR:2023) सुपर न्युमरी असिस्टंट कलेक्टर, नांदेड यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, कुरखेडा उपविभाग, गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
०९. डॉ.जी.व्ही.एस. पवनदत्त (IAS:RR:2023) सुपर न्युमररी असिस्टंट कलेक्टर, नंदुरबार यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, देसाईगंज उपविभाग, गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
१०) डॉ. कश्मीरा किशोर संखे (IAS:RR:2023) सुपर न्युमरी असिस्टंट कलेक्टर, चंद्रपूर यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, तुमसर उपविभाग, भंडारा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
११) डॉ. बी.सरवणन (IAS:RR:2023) सुपर न्युमरी असिस्टंट कलेक्टर, धुळे यांना सहाय्यक जिल्हाधिकारी, भोकरदन उपविभाग, जालना म्हणून नियुक्त केले आहे.
 
१२) श्रीमती अर्पिता अशोक ठुबे (IAS:RR:2023) सुपर न्युमरी असिस्टंट कलेक्टर, बीड यांची प्रकल्प अधिकारी, ITDP, नाशिक-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, नाशिक उपविभाग, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
१३) अमर भीमराव राऊत (IAS:RR:2023) सुपर न्युमरी असिस्टंट कलेक्टर, अमरावती यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, वरोरा उपविभाग, चंद्रपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
१४) रेवैय्या डोंगरे (IAS:RR:2023) सुपर न्युमरी असिस्टंट कलेक्टर, वर्धा यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, भूम उपविभाग, धाराशिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
१५) अरुण एम. (IAS:RR:2023) सुपर न्युमरी असिस्टंट कलेक्टर, जालना यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, चामोर्शी उपविभाग, गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.