नागपूर,दि.20-स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लहान ध्येय न ठेवता असामान्यत्व राखण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची गरज नागपूर महानगर पालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी व्यक्त केली. माहिती व जनसंपर्क खात्याच्या सिताबर्डी येथील माहिती केंद्रात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिकेच्या उद्घाटन प्रसंगी हर्डिकर बोलत होते.
स्पर्धा आणि परीक्षा या दोहोंंमधील फरक स्पष्ट करतांना श्रावण हर्डिकर पुढे म्हणाले की, परीक्षा केवळ पास व्हावी लागते, परंतु स्पर्धा ही सगळयांना मागे टाकून जिंकावी लागते. स्पर्धा ही करिअर असल्यामुळे उपलब्ध संधी मिळवण्यासाठी कठोर परिश्रमाची तयारी ठेवावी. अभ्यास करतांना सामुहिकपणे तयारी केल्यास विविध विषयाचे आकलन होण्यास मदत होते. स्पर्धा मीच जिंकेन असा आत्मविश्वास ठेवून पुढे जा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. स्पर्धा परीक्षांसाठी माहिती केंद्रातर्फे निशुल्क अभ्यासाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. काही जादा सुविधा येथे महानगरपालिकेतर्फे उपलब्ध करुन देण्यात येतील.
त्यामुळे अभ्यासिकेसाठी येथे चांगले वातावरण निर्माण होईल, अशी ग्वाही देखील मनपा आयुक्त यांनी शेवटी दिली. अध्यक्षीय भाषणात संचालक मोहन राठोड यांनी विभागीय माहिती केंद्रातर्फे स्पर्धा परीक्षासाठी विविध सुविधा उपलब्ध करतांनाच संदर्भग्रंथालय, विविध विषयावर चर्चासत्रे आदी उपक्रम येथे घेण्यात येणार असल्याचे सांगितले. माहिती केंद्राच्या स्थापनेचा हाच हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कौशल्य विकास उपसंचालक सुनिल काळबांडे यांनी शासनाने युवकांमध्ये कौशल्य विकसित करुन प्रात्याक्षिकासह प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले .
जेष्ठ पत्रकार राहूल पांडे यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करतांना जिद्द, परिश्रम व चिकाटी ठेवली तरच यश निश्चित आहे असे सांगितले. आपण परिश्रम करतांना कुठेही कमी पडणार नाही याची खबरदारी घ्या, असेही त्यांनी आवाहन केले.
माहिती केंद्राच्या दुरुस्तीसाठी धंतोली झोनचे विभागीय अधिकारी जयदेव व अभियंता श्री. सांभारे यांचा आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या हस्ते शालव श्रीफळ देवून गौरव करण्यात आला.
माहिती केंद्राचे जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी प्रास्ताविकामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिकेबद्दल माहिती केंद्रात स्पर्धापरीक्षासाठी १६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून येथे संदर्भ ग्रंथासह आवश्यक सुविधा निशुल्क उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याचे सांगितले. विभागीय विशेषत: ग्रामीण भागातील गरिब विद्यार्थी अभ्यासिकेचा लाभ घेतात, असे ते म्हणाले.प्रारंभी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी व्दिप प्रज्वलीत करुन अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन केले. स्वागत सचिन काळे, अपर्णा यावलकर, श्रीमती फाले यांनी केले. आभार जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे यांनी मानले. यावेळी वृत्तपत्र विभागाचे प्रमुखबबन नाखले, माहिती विभागाचे माजी संचालक शरद चौधरी, भि. म. कौशल, माजी जिल्हा माहिती अधिकारी नरेश मेश्राम आदि अधिकारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षेसाठी मोठे ध्येय ठेवा : श्रावण हर्डिकर
नगर पंचायत निवडणुकीत सहभाग घेणार्या केंद्रप्रमुखावर कारवाई कधी?
गोंदिया,दि.20: देवरी नगर पंचायतच्या पार पडलेल्या निवडणुकीत जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख असतांनाही आणि शिक्षण विभागाची कुठलीही परवानगी न घेता निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल केंद्रप्रमुख रामेश्वर हरिचंद वाघाडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुदाम राऊत यानी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्या तक्रारीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाने देवरी नगर पंचायतीच्या प्रभारी मुख्याधिकारी पत्र पाठवून चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
त्या आदेशाला ८ महिन्याचा कालावधी लोटूनही नगर पंचायत व जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. राऊत यांनी दिलेल्या तक्रारीत गैरअर्जदार रामेश्वर वाघाडे यांची पत्नी पूनम वाघाडे या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगर पंचायत देवरीकरिता निवडणूक रिंगनात उभ्या होत्या. वाघाडे हे जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा डवकी येथे केंद्र प्रमुख असून ते डवकी येथे न राहता देवरी येथील वार्ड क्रमांक ५ मध्ये राहत असून पत्नीला वार्ड क्रमाक ११ मध्ये निवडणुकीत उभे करुन प्रत्यक्ष प्रचारात सहभाग घेतल्याचा उल्लेख केला आहे.
निवडणूक काळात कुठलीही रजा न घेता त्यांनी निवडणुकीचे काम केल्याचेगी राऊत यानी तक्रारीत म्हटले आहे. या संबंधीचे छायाचित्र सुद्धा त्यांनी तक्रारीसोबत मुख्य कार्याकारी अधिकारी व जिल्हाधिकार्याना देऊन ही कारवाई का झाली नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
भारतीय जवानांनी केला 10 जणांचा खात्मा,1 जवान शहीद
वृत्तसंस्था
– मात्र, सतर्क असलेल्या भारतीय सैनिकांनी या गोळीबाराला चोख उत्तर दिले आहे.
– भारतीय जवानांनी 10 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
– दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असल्याची माहिती आहे.
– त्यामुळे आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
– दोन दिवसांपूर्वीच उरीतील सैन्याच्या मुख्यालयावर चार दहशतवाद्यांनी हल्ला केला.
– दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल््यात भारताचे १८ जवान शहीद झाले.
आशिष देशमुख भारतीय वुडबॉल संघाचे कर्णधार
नागपूर, दि. २० : पाचव्या आशियाई बीच गेम्समध्ये सहभागी होत असलेल्या भारतीय वुडबॉल संघाच्या कर्णधारपदी आ. डॉ. आशिष देशमुख यांची निवड करण्यात आली. व्हिएतनाममधील दानांग शहरात २४ सप्टेंबरपासून आयोजित आशियाई बीच
गेम्ससाठी भारतीय वुडबॉल संघ २३ रोजी मुंबईहून रवाना होईल. भारतीय आॅलिम्पिक संघटनेद्वारे(आयओए) वुडबॉल संघ पाठविण्यात येत आहे.भारतीय वुडबॉल महासंघाचे अध्यक्ष असलेले आशिष देशमुख हे नेतृत्व करीत असलेल्या भारतीय संघात डॉ. सूरज येवतीकर, डॉ. प्रेमप्रकाश मीना, कपिल साहू, सुदीप मानवटकर, भरत गुरव, विकास इंगळे, हेमंत भालेराव, हर्ष रंजन, भरत गुंडप्पा, जितेंद्र पटेल, अर्चना महाजन, अल्का वांजेकर, राधा कलवा राव, पूजा साहू, सुष्मिता जगदीश, पूजा चौधरी, खोमेश्वरी, दीक्षा हर्ष या खेळाडूंचा समावेश आहे. प्रशिक्षक प्रवीण मानवटकर, सहप्रशिक्षक अजयसिंग मीना, संघ व्यवस्थापक व तांत्रिक अधिकारी गिरीश गदगे हे संघासोबत असतील.
ग्रामीण भागातील शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी वास्तव्य करणे बंधनकारक
गुणवत्तापूर्ण आणि वेळेत सेवेसाठी मुख्यमंत्र्यांकडून निर्णय
मुंबई, दि. 20 : ग्रामस्थांना गुणवत्तापूर्ण आणि वेळेत सेवा उपलब्ध होण्यासाठी ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या आणि घरभाडे भत्त्याचा लाभ घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी वास्तव्य करणे बंधनकारक करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
ग्रामीण जनतेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या आरोग्य, शिक्षण,पशु वैद्यकीय यासारख्या सुविधा गावातच आणि वेळेत उपलब्ध होण्यासाठी शासनाच्या वैद्यकीय अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, ग्रामसेवक, शिक्षक, तसेच राज्याच्या विविध विभागाच्या अधिपत्याखालील राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना ग्रामीण भागात नियुक्ती दिली जाते. ग्रामविकासासाठीच्या विविध योजना आणि कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याबरोबरच संबंधित सेवा ग्रामस्थांना वेळेत उपलब्धतेच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांनी पदस्थापना झालेल्या गावातच राहणे अपेक्षित आहे. मात्र, बहुतेक कर्मचारी जवळच्या मोठ्या गावात, शहरात किंवा तालुक्याच्या ठिकाणी राहणे पसंत करतात. त्याचा ग्रामीण भागातील विविध सेवांवर विपरित परिणाम होताना दिसतो. सेवा हमी कायदा आणि आपले सरकारच्या माध्यमातून ठराविक कालावधित सेवा देण्यासाठी राज्य शासनाने प्रभावी उपाययोजना आखल्या आहेत. त्यानुसार ग्रामीण जनतेला वेळेत दर्जेदार सेवा मिळण्यासाठी आज हा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्र्यांची सॅन फ्रॅन्सिस्कोत कंपनीशी चर्चा
डिजिटल ग्रामपंचायती करण्यासाठी ह्युलेट-पॅकर्ड सहकार्यास उत्सुक
मुंबई, दि. 20 : राज्यातील 28 हजार ग्रामपंचायती डिजिटल
करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या महानेट या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमात
सहयोग देण्याची तयारी ह्युलेट-पॅकर्ड या जगप्रसिद्ध कंपनीने दर्शविली
असून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सॅन फ्रॅन्सिस्को येथे
कंपनीच्या पदाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली.
मुख्यमंत्री फडणवीस सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून
त्याअंतर्गत त्यांनी ह्युलेट-पॅकर्ड या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील
जगप्रसिद्ध कंपनीच्या सॅन फ्रॅन्सिस्को येथील कार्यालयास भेट दिली.
यावेळी त्यांनी ह्युलेट-पॅकर्ड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेग
व्हाईटमन यांच्याशी सविस्तर चर्चा केली. महाराष्ट्र सरकार राज्यातील 28
हजार ग्रामपंचायती डिजिटल करण्यासाठी महानेट हा महत्त्वाकांक्षी
कार्यक्रम राबवित आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण ग्रामीण
महाराष्ट्र डिजिटल सक्षम करण्याचा सरकारचा निर्धार आहे. त्यामुळे
ग्रामपातळीपर्यंतचे प्रशासन गतिमान आणि पारदर्शक होणार आहे. विशेषत:
आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात अधिकाधिक सुविधा उपलब्ध करणे शक्य
होणार असून ग्रामीण भागातील नागरीकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा
होण्यास मदत होणार आहे. त्यादृष्टीने करावयाच्या प्रयत्नांना सहकार्य
करण्याची तयारी ह्युलेट-पॅकर्ड कंपनीने दाखविली आहे. त्याबाबत यावेळी
श्री. व्हाईटमन यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली.
युएस इंडिया बिझनेस कौन्सिलचे ऊर्जा धोरणविषयक संचालक नॉल्टी
थेरिऑट यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. या भेटीत राज्यात
उद्योगसुलभतेसाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची मुख्यमंत्र्यांनी
श्री. थेरिऑट यांना माहिती दिली. तसेच अहाना रिन्युएबल्सचे व्यवस्थापकीय
संचालक जेसन तायी यांच्याशीही मुख्यमंत्र्यांची भेट झाली.
वंचित समाजाच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द- राजकुमार बडोले
विमुक्त भटक्या जमातीला जात प्रमाणपत्राचे वाटप
विविध महामंडळाचा घेतला आढावा
भंडारा,berartimes.com दि. २० :- भटक्या विमुक्त तसेच वंचित समाजाच्या कल्याणासाठी शासनाने विविध योजना सुरु केल्या असून या योजनांच्या माध्यमातून वंचित समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
महाराजस्व अभियानांतर्गत मांग गारोडी, गोपाळ, वडार व इतर अनुसूचित जाती जमातीचे प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम सामाजिक न्याय भवन येथे आयोजित करण्यात आला, त्यावेळी ना. बडोले बोलत होते. या वेळी उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त देवसूदन धारगावे, तहसिलदार संजय पवार, भटक्या विमुक्त समाज परिषदेचे शिवा कांबळे, राहुल चव्हाण, अंकुश तांदूळकर, उकंडजी वडस्कर व दिलीप चित्रिव उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात सामाजिक न्याय विभाग भंडारा यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन ना.बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.
सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेवून आपल्या विकासास चालना दयावी. समाजाची परिस्थिती जर सुधारावयाची असेल शिक्षण घेणे महत्वाचे आहे. या समाजाने शिक्षणास प्राधान्य देवून आपले जीवन सुकर करावे, असे ते म्हणाले. भटक्या विमुक्तांना समाजाने आपले म्हणावे, असे आवाहन करुन ना. बडोले म्हणाले की, सर्वांना जात प्रमाणपत्र देण्यासाठी पाठपूरावा केला जाणार आहे. मांग गारुडी समाजाला अनुसूचित जातीच्या योजनांचा लाभ देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत भंडारा जिल्हयात जागा मिळण्यासाठी व मांग गारुडी समाजाला स्वत:ची वसाहत मिळण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या. शासनाच्या विविध योजना व विकासात भटक्या विमुक्तांना अग्रक्रम तसेच प्राधान्य देण्यात यावेत, असे ते म्हणाले. जात प्रमाणपत्र मिळालेल्यांमध्ये विद्यार्थी असल्यास त्यांनी शिक्षण घ्यावे व समाजाला पुढे न्यावे, असे ते म्हणाले. दहावी झालेल्या विद्यार्थ्यांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. या समाजातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार देण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असे आश्वासन ना. बडोले यांनी दिले.
ना. बडोले पुढे म्हणाले, आज जात प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यात ज्यांना प्रमाणपत्र मिळाले नाही त्यांनी नाराज व्हायचे कारण नाही. प्रमाणपत्राबाबत शासकीय स्तरावर काही त्रुटी असल्यास त्याबाबत जिल्हाधिकारी व ग्रामस्तरावर बैठक घेवून तोडगा काढण्यात येईल. लवकरच त्यांनाही दाखले देण्यात येतील. असेही ते म्हणाले. या समाजाने शिक्षणाला प्रथम प्राधान्य दयावे तरच समाजाचा उध्दार होईल, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी केले तर संचालन व आभार तहसिलदार संजय पवार यांनी मानले.
या कार्यक्रमांनंतर सहाय्यक आयुक्त यांच्या कक्षात ना. बडोले यांनी विविध महामंडळाची आढावा बैठक घेतली. विमुक्त भटक्या ज माती महामंडळाने थेट कर्जाचे २५ प्रकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. अण्णाभाऊ साठे महामंडळाअंतर्गत मांग गारुडी समाजाचे थेट कर्जाचे जास्तीत जास्त प्रकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या या सोबतच महात्मा फुले महामंडळ, अपंग महामंडळ व मिटकॉम यांनी सुध्दा जास्तीत जास्त प्रकरण करावे, असे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले.
हिंदीचे ज्येष्ठ कवी/व्यंगकार मदन पांडे यांचा सत्कार
गोंदिया-विदर्भ साहित्य संघाच्या भवभूती रंगमंदिरात हिंदी दिवस आणि वि.सा.संघ, गोंदियाचे माजी अध्यक्ष स्व.मनोरमाबाई धोटे जयंती अशा संयुक्त कार्यक्रमात कविश्री मदन पांडे यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला.या प्रसंगी अध्यक्ष यशवंत सरुरकर,चंद्रकांत खंडेलवाल,नरेश गुप्ता, उपाध्यक्ष माणिक गेडाम, सहसचिव दीपक वेरुळकर, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ.
राजश्री धामोरीकर,श्रीमती निलाताई धोटे मंचावर उपस्थित होते.एका मराठी साहित्य संस्थेने हिंदी भाषी कवीचा सत्कार करावा ही घटना अत्यंत आनंददायक व प्रेरणादायक आहे.ही घटना म्हणजे सर्व हिंदीभाषी साहित्यिकांचा आणि राष्ट्रभाषा हिंदीचा सन्मान आहे,अशी प्रतिक्रिया कविवर मदन पांडे यांनी व्यक्त केली.संचालन प्रा.किंजल मेहता व आभार दीपक वेरुळकर यांनी मानले.
शहीदांच्या स्मृतीत साकोलीत कॅंडलमार्च
साकोली,दि.20: साकोली तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जम्मू काश्मिर येथील उरी येथे आतंकवाद्यांनी केलेल्या हल्यात शहीद झालेल्या १८ भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅंडलमार्चचे आयोजन करण्यात आले होते.
या कॅंडलमार्चमध्ये अजयराव तुमसरे, साकोली तालुका काँग्रेस अध्यक्ष नंदुभाऊ समरीत, अश्विन नशिने, होमराज कापगते, दिलीप मासरकर, ब्रम्हानंद करंजेकर, अविनाश ब्राम्हणकर, अशोक कापगते, उमेश कठाने, दीपक रामटेके, प्रकाश करंजेकर, मंदा गणवीर, ताराबाई तजुर्ले, निर्मला कागपते, रुपलता वलथरे आदी श्रद्धांजली सभेत व कॅडलमार्चमध्ये सहभागी झाले होते.
विदर्भातील दोन्ही शहीदांना श्रद्धांजली…
नागपूर/गोंदिया,दि.20-जम्मू कश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांशी कडवी झुंज देतांना विदर्भाचे दोन जवान शहीद झाले. यात यवतमाळ जिल्ह्यातील पुरळ गावाचे विकास जनार्दन कुळमेथे व अमरावती जिल्ह्यातील नांदगाव येथील विकास उर्फ पंजाब जानराव उईके यांचे पार्थिव आज वायूसेनेच्या विमानाने सोनेगाव विमानतळावर आणण्यात आले. विमान तळावर कर्नल बलबीर सिंह व एअर कमांडर अलोक शर्मा, विंग कमांडर डी. के. पांडे, ग्रुप कमांडर जी. एल. नागेंद्र यांनी शहीद जवानांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
जिल्हा प्रशासनातर्फे आमदार अनिल सोले, सुधाकर कोहळे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा सैनिक कार्यालयाचे अधिकारी कॅप्टर दीपक लिमये यांनी पुष्पचक्र अर्पण करुन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. १९ सप्टेंबरला रात्री ११ वाजेच्या सुमारास शहीद विकास कुळमेथे यांचे पार्थिव विमानाने नागपूर विमानतळावर आणण्यात आले. विमानतळावर कर्नल बलबीर सिंह यांनी पार्थिव सन्मानाने राष्ट्रध्वजात ठेवून त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. त्यानंतर शहीद विकास कुळमेथे यांचा पार्थिव सैन्यदलाच्या वाहनाने कामठी येथील गार्ड रेजिमेंट सेंन्टर येथील सैन्यदलाच्या रुग्णालयात ठेवण्यात आला.
आज सकाळी साडे सहा वाजता शहीद विकास कुळमेथे यांचे पार्थिवावर कामठी येथील गार्ड रेजिमेंट सेंन्टर येथे कर्नल बलबीर सिंह व प्रहार समाज जागृती संस्थांच्या वतीने निवृत्त कर्नल सुनील देशपांडे व फ्लाईंग ऑफिसर श्रीमती शिवाली देशपांडे यांनी पुष्पचक्र अर्पण करुन भावपूर्ण श्रद्धांजल वाहिली. त्यानंतर पार्थिव सोनेगांव विमातळावर मिलटरी वाहनाने आणण्यात आले. त्यानंतर शहीद जवानांचे पार्थिव वायूसेनेच्या हेलिकॉप्टरने त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले.अमरावती जिल्ह्यातील शहिद विकास उर्फ पंजाब जानराव उईके यांचे पार्थिव आज सकाळी 11-15 वा बेलोरा विमानतळावर लष्कराच्या हेलिकाॅप्टरने आणण्यात आले. पालकमंत्री प्रविण पोटे, आम.सर्व डाँ अनिल बोंडे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, आर्मी चे कँप्टन आशिष चंदेल, नायक सुभेदार एल जी ढोले, नायक सभेदार एन पी जिवन, पोलिस अधीक्षक लखमी गौतम,यांनी यावेळी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी फ्लाइट लेफ्टनंट रत्नाकर चरडे, दिनेश सर्यवंशी, सौ निवेदिता दिघडे चौधरी,राष्ट्र सेविका समितीच्या मधुरा पांडे ,चंद्रशेखर भोंदु, आदी मान्यवरांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली.