नगर पंचायत निवडणुकीत सहभाग घेणार्या केंद्रप्रमुखावर कारवाई कधी?

0
7

गोंदिया,दि.20: देवरी नगर पंचायतच्या पार पडलेल्या निवडणुकीत जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख असतांनाही आणि शिक्षण विभागाची कुठलीही परवानगी न घेता निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल केंद्रप्रमुख रामेश्वर हरिचंद वाघाडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुदाम राऊत यानी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्या तक्रारीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाने देवरी नगर पंचायतीच्या प्रभारी मुख्याधिकारी पत्र पाठवून चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
त्या आदेशाला  ८ महिन्याचा कालावधी लोटूनही नगर पंचायत व जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. राऊत यांनी दिलेल्या तक्रारीत गैरअर्जदार रामेश्वर वाघाडे यांची पत्नी पूनम वाघाडे या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगर पंचायत देवरीकरिता निवडणूक रिंगनात उभ्या होत्या. वाघाडे हे जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा डवकी येथे केंद्र प्रमुख असून ते डवकी येथे न राहता देवरी येथील वार्ड क्रमांक ५ मध्ये राहत असून पत्नीला वार्ड क्रमाक ११ मध्ये निवडणुकीत उभे करुन प्रत्यक्ष प्रचारात सहभाग घेतल्याचा उल्लेख केला आहे.
निवडणूक काळात कुठलीही रजा न घेता त्यांनी निवडणुकीचे काम केल्याचेगी राऊत यानी तक्रारीत म्हटले आहे. या संबंधीचे छायाचित्र सुद्धा त्यांनी तक्रारीसोबत मुख्य कार्याकारी अधिकारी व जिल्हाधिकार्याना देऊन ही कारवाई का झाली नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.