गोंदिया : बहुजन समाज पार्टीचा सेक्टर पदाधिकारी मेळावा सिव्हील लाईन येथील केमीस्ट भवनात महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अँड. खा. विरसींग यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी प्रदेश अध्यक्ष विलास गरूड, प्रेम रोडेकर, कृष्णा बेले, जितेंद्र म्हैसकर, विश्वास राऊत, मिलींद बंसोड, युवराज जगणे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना विरसींग यांनी मोदी सरकारवर कडाडून टिका केली.काळ्या धनातून प्रत्येकाच्या खात्यात २0 लाख जमा होणार होते ते गेले कुठे, असा टोलाही त्यांनी लावला.कार्यक्रमाची प्रस्तावना पंकज वासनिक, संचालन मिलींद बंसोड व आभार युवराज जगणे यांनी मानले.
यशस्वीतेसाठी दुर्वास भोयर, जनार्दन बनकर, डॉ. एल.एस.तुरकर, कमल हटवार, जी.बी.बागडे, पवन टेकाम, दिनेश गेडाम, आनंद बडोले, मनोहर ठाकरे, कुंदा गाडकीने, नुरलाल उके, कैलाश बोरकर, सुजीत वैद्य, संकल्प खोब्रागडे, विनोद खोब्रागडे, सुर्यकुमार बोंबार्डे, मंदीप वासनिक, रंजीत वासनिक, रंजीत बंसोड, डेविड बडगे, विरु उके यांनी सहकार्य केले
२0 लाख गेले कुठे-खा. विरसींग
रांगोळी, पोस्टर्स, निबंध व वक्तृत्व स्पर्धा अवयवदानाची मिळाली प्रेरणा
महा अवयवदान अभियान – २०१६
गोंदिया, दि. १ :- ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान आयोजीत महा अवयवदान अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. आबालवृध्दांपासून सर्वाचाच सहभाग यामध्ये मिळत आहे. अवयवदानाबाबत जनजागृती व्हावी यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
३१ ऑगस्ट रोजी या अभियानाच्या निमित्ताने शासकीय वैद्यकिय महाविद्यालय गोंदिया येथे विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महा अवयवदान या विषयावर रांगोळी स्पर्धा, महा अवयवदान या विषवर पोस्टर्स स्पर्धा, अवयवदान- सर्वश्रेष्ठ दान या विषयावर निबंध स्पर्धा, आणि अवयवदान- महानकार्य या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेतून अवयवदानाचे महत्व विषद करण्यात आले. निबंध व वक्तृत्व स्पर्धेतून तर विद्यार्थ्यानी अवयवदानाचे महत्व व आवश्यकता स्पष्ट केली. या स्पर्धेमुळे अनेकांना अवयवदान करण्याची प्रेरणा मिळाली.
गोंदिया शहरातील निर्मल इंग्लिश हायस्कूल,मनोहर म्युसीपल हायस्कूल, व ज्युनिअर कॉलेज,मारवाडी विद्यालय, एस.एस.गर्ल्स कॉलेज, जे.एम.ज्युनिअर कॉलेज,डि.बी.सायंस कॉलेज,एस.एस.ऐ.एम गर्ल्स हायस्कूल, व श्रीमती सरस्वतीबाई महिला विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी या स्पर्धामध्ये सहभाग घेतला.
स्पर्धेचे परिक्षक म्हणून शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे प्रा. डॉ. व्ही.पी.रुखमोडे, प्रा.डॉ.आर.एल.कांबळे, प्रा. डॉ.मकरंद व्यवहारे, प्रा.डॉ. सुरेखा मेश्राम, प्रा.डॉ.खन्नाडे, प्रा.डॉ.सुनंदा श्रीखंडे, प्रा.डॉ.संजीव चौधरी, प्रा.डॉ.प्रवीण जाधव, प्रा.डॉ.कवीता जैसवाल, प्रा.डॉ.संगीता भलावी, व डी.बी.सायंस कॉलेजचे प्रा.डॉ.गुणवंत गाडेकर यांनी काम पाहिले.
पेट्रोल, डिझेल महागले
नवी दिल्ली (पीटीआय)- पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.38 रुपये आणि डिझेलच्या दरात 2.67 रुपये वाढ बुधवारी करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव 13 टक्क्यांनी वाढल्याने तेल कंपन्यांनी हा दरवाढीचा निर्णय घेतला आहे.
मागील दोन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात सुरू होती. याआधी 16 ऑगस्टला पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर एक रुपया आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपये कपात करण्यात आली होती. मागील पंधरवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या भावात सुमारे 13 टक्के म्हणजेच प्रतिबॅरल 5 डॉलरपेक्षा अधिक वाढ झाली आहे. तसेच, पेट्रोलियम उत्पादनांच्या भावातही वाढ झाली आहे. चालू आंतरराष्ट्रीय भावानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याची गरज होती, असे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (आयओसी) म्हटले आहे. मागील पंधरवड्यामधील आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव आणि डॉलरचा भाव पाहून आयओसीसह सरकारी मालकीच्या हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (एचपीसीएल) आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल) या कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या आणि शेवटच्या तारखेला पेट्रोल व डिझेलच्या दरात बदल करतात.
हैदराबादला पावसामुळे सात जण मृत्युमुखी
वृत्तसंस्था
हैदराबाद – मुसळधार पावसाचा फटका दिल्ली पाठोपाठ हैदराबादला बसला असून, येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. या पावसामुळे आतापर्यंत सात जण मरण पावले असून, त्यातील तीन जण भिंत कोसळल्याने मरण पावले आहेत. त्यातील तीन जण हे रामनथपूर येथील असून उर्वरित चौघे भोलकपूर भागातील आहेत. इमारतीची भिंत कोसळून झालेल्या अपघातामुळे संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे मृतांच्या नातेवाइकांना एक लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली आहे.
मुसळधार पाऊस सुरू असल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सरकारने कर्मचाऱ्यांना कार्यालयात एक तास उशिराने येण्याची परवानगी दिली आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवस आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये 15 वर्षांतील झाला नाही इतक्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.
वृक्षलागवडीसाठी जिल्हाधिका-यांना विद्यार्थ्यांचे निवेदन
गोंदिया, दि. ३१ :-गोंदिया शहरातील काही विद्यार्थ्यानी एकत्र येवून समाजासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढाकार घेवून ङ्कङ्कमाझी भेट निसर्गासाठीङ्कङ्क या गटाची स्थापना केली. या गटातील काही सदस्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची नुकतीच भेट घेवून गटामार्फत राबविण्यात येणा-या विविध उपक्रमाला पाठबळ देण्याची अपेक्षा जिल्हाधिका-यांकडे निवेदनातून व्यक्त केली. गोंदिया शहरात मोठया प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून त्याचा परिणाम शहरातील नागरिकांच्या आर्रोग्यावरही होत असल्याबाबत जिल्हाधिका-यांचे लक्ष वेधले.
विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या या गटाने त्यांच्या कार्याची सुरुवात पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्षलागवडीपासून करण्याचे निश्चित केले. भविष्यात नदीची स्वच्छता करणे, पेपर, प्लास्टिक, ग्लास, पॉलीथीनचा पुनर्वापर याबाबत जनजागृती करणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून बदल करण्यासाठी आमचा गट काम करणार असून सोबत लोककल्याणाचे विविध उपक्रम राबविणार असल्याचे गटातील विद्यार्थ्यानी जिल्हाधिका-यांना सांगितले.
अवयवदान – काळाची गरज
गोंदिया,दि ३१ आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे मानवाचे आर्युमान उत्तरोत्तर वाढतच चालले आहे. विविध व्यक्तीवर परिणामकारक उपाययोजना अस्तित्वात असली तरी एक अवयव निकामी झाल्यास दुसरा अवयव प्रत्यारोपण करण्याव्यतिरिक्त दुसरा उपाय नाही, व तो अवयव उपलब्ध न झाल्यामुळे रुग्ण प्राणाला मुकतात.देशभरातील अवयवदानाचे प्रमाण अजूनही १० लाख लोकसंख्येमागे केवळ ०.५ टक्के इतकेच आहे. वर्षभरात देशामध्ये तब्बल दोन ते अडीच लाख किडनीची गरज असतांना केवळ ७ हजार किडनीचे प्रत्यारोपण होत आहे. ५० हजार हृदयाची गरज असतांना केवळ ५० ते ६० हृदयांचे प्रत्यारोपण होत आहे. ५ हजार यकृतांची गरज असतांना १०० ते २०० यकृत मोठया मुश्किलीने प्रत्यारोपण होत आहेत ही आजची वस्तुस्थिती आहे.
त्यामुळेच अवयवदानाच्या जनजागृतीसाठी महाराष्ट्र सरकार ने तीन दिवस महा अवयवदान अभियान व्यापकपणे राबविण्याचा संकल्प केला आहे. या अभियानातून इच्छुक दात्यांचा ङ्कडाटाङ्क तयार होणार आहे. डाटामुळे अवयवदानाचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे.अजूनही अवयवदानाबाबत खूप कमी माहिती देशवासियांना आहे. १.४ लाख लोकांचा दरवर्षी रस्ते अपघातामध्ये मृत्यू होतो. या सर्व लोकांकडून अवयवदान झाले तर किडनीसह इतर बहुतेक अवयवांची देशभरातील गरज पूर्ण होऊ शकते. अमेरिका,ब्रिटन,जर्मनी, नेदरलॅड मध्ये कुटुंबाच्या संमतीव्दारे अवयवदानाची पध्दत आहे.
सिंगापूर,बेल्जीयम,स्पेनमध्ये व्यक्तीने जिवंतपणी अवयवदानास नकार न दिल्यास व्यक्तीची मरणोत्तर अवयवदान संमती गृहीत धरली जाते. तसे पाहिले तर भारतात बहुतांश व्यक्ती जिवंतपणी दानधर्म, देवधर्म, तप-तपस्या या मरणोत्तर आत्मशांती व अमरत्व प्राप्तीसाठी करतात पण अवयवदान हे मानवाच्या इतिहासातील अमरत्वाकडे जाणा-या वाटचालीतील पहिले पाऊल आहे. अवयवदाता अवयवदान रुपाने इहलोकी निवास करतो.
एवढेच नाही तर बहुविध जाती धर्माच्या समाजाला अवयवांच्या देवाण घेवाणघेवाणीतून एकत्र बांधणारे अवयवदान हे सूत्र मानवाच्या हाती लाभले आहे.पूर्वीच्या काळात सुरुवातीला रक्तदानासाठी दाते स्वइच्छेने समोर पुढाकार घेत नव्हते पण काळाच्या ओघात रक्तदान सर्व सामान्य झाले आहे. कुठलाही निरोगी सुदृढ व्यक्ती जिवंतपणीच एक मुत्रपिंड, लिव्हरचा काही भाग, फुप्फुसाचा काही भाग, आतडयांचा काही भाग, स्वादुपिंडाचा काही भाग अवयवदानाव्दारे दुस-या गरजू व्यक्तीला देऊन त्याला संजिवनी देऊ शकतो. ब्रेनडेथ झालेली व्यक्ती दोन्ही मुत्रपिंड, हृदयाच्या झडपा, हृदय,आतडे,संपूर्ण यकृत,संपूर्ण फुफ्फूस जोडऊती, त्वचा,संपूर्ण स्वादुपिंड,अंगदान देऊ शकतो.
कुठलीही व्यक्ती मरणेपरांत संपूर्ण देहदान, नेत्रदान ( ४ ते ६ तासातच), त्वचादान ( ६ तासातच) दान देऊन जिवंत व्यक्तीला संजीवनी देऊ शकतो.ब्रेन डेड म्हणजे मेंदूला गंभीर स्वरुपाचा जोराचा मार लागल्यावर किंवा मेंदुत रक्तस्त्राव झाल्यानंतर किंवा एखादया आजारामध्ये मेंदू निकामी झाल्यावर संबंधित व्यक्ती ब्रेनडेड झाल्याचे वैद्यकीय शास्त्रात म्हंटले जाते. आणि अशा व्यक्ती पुन्हा जीवंत होऊ शकत नाही. अशा ब्रेनडेड व्यक्तीचे शरीरातील मूत्रपिंड,हृदय,फुफ्फूस,आतडे आदि अवयव चांगल्या स्थितीत कार्यरत असतात आणि या अवयवांचे गरजू िजवंत रुग्णांवर योग्य वेळेत प्रत्यारोपण होऊ शकते .
ब्रेनडेड रुग्णांच्या शरीरातील अवयवदान हे त्या कुटुंबाला दु:खातून सावरण्यासाठी दुस-या व्यक्तीचे जगणे शक्य केल्यामुळे ङ्कङ्कपुनर्जन्मङ्कङ्क झाल्याची भावना दु:ख हलके करु शकते. त्याकरीता सामाजिक संवेदनशिलतेला साद घालून संतुलन बाळगून व समुपदेशनाची पराकाष्ठा करुन योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.एखादयाचा जीव वाचविण्यासाठी मृतदेहातून ( अंतविधी करण्याऐवजी) अवयव काढल्यास तो शरीरभंग झाला असे म्हणता येणार नाही. किंबहुना दुस-या व्यक्तीची विझणारी प्राणज्योत चेतविणे पुन्हा त्या संजीवनी प्राप्त करुन देणे हाच मानव धर्माचा परमोच्च बिंदू म्हणावा लागेल. देण्याचा आनंद अवर्णनीय असतो. म्हणून अवयवदान करुन जीवन वाचवायलाच हवा.
म्हणून चला तर आज आपण सर्वजण मिळून संकल्प करु या … अवयवदान करु या ..आटत नसतो रक्ताचा झरा दर तीन महिन्याला रक्तदान करा ेेंं मरावे परि नेत्ररुपी उरावे ेेंं
डॉ. सुवर्णा हुबेकर
वैद्यकीय अधिकारी
बाई गंगाबाई महिला रुग्णालय,गोंदिया
सालेकसाजवळ मालगाडीचा डबा घसरला
सालेकसा : हावडा-मुंबई मुख्य रेल्वे मार्गावर सालेकसानजिक मालगाडीचा डबा रूळावरुन उतरून फरफटत गेल्याने १0 तास रेल्वेसेवा ठप्प झाली होती. घसरलेल्या डब्यामुळे ३00 मीटरपर्यंतच्या रूळावरील सिमेंटचे स्लीपर तुटून निकामी झाले. त्यामुळे नागपूर, मुंबईच्या दिशेने जाणार्या अपलाईनवरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. दिवसभर रेल्वे लाईनच्या दुरूस्तीचे काम सुरू होते.
मध्यरात्रीनंतर साधारणत: १.३0 वाजताच्या सुमारास रायपूरवरुन नागपूरच्या दिशेने जात असलेली सदर मालगाडी सालेकसा स्टेशन येण्यापूर्वी दोन कि.मी. अंतरावर असताना मालगाडीच्या मधल्या डब्याच्या चाकांमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि तो डबा रूळावरुन खाली उतरला. त्यामुळे डब्याच्या उजव्या बाजूची सर्व चाके दोन रूळांच्या मध्ये असलेल्या सिमेंटच्या स्लिपरवरुन चालू लागली. यामुळे ते स्लिपर मधातून तुटू लागले. जवळपास ३00 मीटरपर्यंत डबा फरफटत गेल्याने त्यातून आगीच्या ढिणग्या निघू लागल्या. ही बाब हलबीटोला गेटवरील चौकीदाराच्या लक्षात आली. त्याने लगेच चालक आणि गार्ड यांना यासंदर्भात कळविले. त्यांनी लगेच गाडी थांबविली. वरिष्ठांना या घटनेची सूचना दिल्यानंतर रायपूरवरुन नागपूरकडे धावणार्या सर्व गाड्या मध्येच थांबविण्यात आल्या.
देशाभिमान जागृत होईल तेव्हा जगावर राज्य करू! -खा. पटोले
अर्जुनी-मोरगाव दि. 3१: : देशाला स्वातंत्र्य मिळाले मात्र देशाबद्दलचा स्वाभिमान कमी होत चालला आहे. काश्मिरमध्ये अर्धा काश्मिर भारताला भारत मानत नाही. तिरंगा आमच्या देशाची शान आहे. प्रत्येक नागरिकांमध्ये जेव्हा स्वाभिमान जागृत होईल त्या दिवशी आपण जगावर राज्य करू, असे प्रतिपादन खा. नाना पटोले यांनी केले.
ते वन, पोलीस विभाग व पत्रकार संघातर्फे प्रतापगड महादेव मंदीर मार्गावरील स्वच्छता कार्यक्रमात बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्रतापगडच्या सरपंच अहिल्या वालदे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून खा. नाना पटोले उपस्थित होते. यावेळी मंचावर परिविक्षाधिन वन अधिकारी राहुल पाटील, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, अर्जुनीचे ठाणेदार नामदेव बंडगर, केशोरीचे सहायकपोलीस निरीक्षक एस.एस. कुंभरे, उपसरपंच राऊत, मुकेश जायस्वाल, प्रमोद लांजेवार, डॉ.गजानन डोंगरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंकू मंडल, संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष छाया डोंगरवार उपस्थित होते.
खा.पटोले पुढे म्हणाले, केंद्र शासनाने भारत स्वच्छ अभियानाचा संकल्प केला. त्यानुसार स्वच्छता मोहीम राबविली जाते. वन अधिकारी राहुल पाटील यांची उपक्रमाबद्दल त्यांनी प्रशंसा केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीयांमध्ये देशाभिमान जागृत करण्यासाठी तिरंगा झेंडा घेऊन मिरवणूक काढण्याची जबाबदारी दिली. हल्ली देशाबद्दलची आपुलकी, स्वाभिमान कमी होत चालला आहे. ज्यावेळी इंग्रजांचे राज्य होते तेव्हा आमच्या जवानांनी छातीवर गोळ्या झेलल्या. बंदूक किंवा बॉम्बगोळ्याच्या आधारावर इंग्रजांना या देशातून परतवून लावता आले नसते. पण देशवासीयांनी जीव गेला तरी चालेल, रक्ताच्या नाल्या वाहल्या तरी चालतील पण स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय थांबणार नाही, अशी ताठर भूमिका घेतल्याने देशाला स्वातंत्र्य मिळाले. हल्ली देशात आतंकवाद, नक्षलवाद वाढला आहे. ती आपल्यातीलच लोक आहेत. परंतु दुर्दैवाने घर का भेदी लंका ढहाये, अशी अवस्था आहे.देशाच्या प्रगतीसाठी देशाभिमान जागृत करण्याची गरज आहे.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, विद्यार्थी आमचे केंद्रबिंदू आहेत. त्यांनी प्रत्येक बाबीची दिशा ठरवा. आत्मविश्वास व महत्वाकांक्षा बाळगा. कुठलीच गोष्ट अशक्य नाही. परिस्थितीला बदलविण्याच कामही युवापिढीच करू शकते.कचर्यासोबतच समाजातील घाण स्वच्छ करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक राहुल पाटील यांनी मांडले. संचालन प्रा.शरद मेश्राम केले. आभार डॉ. राजेश चांडक यांनी मानले.मोहिमेसाठी एस.एस.जे. महाविद्यालय, सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाचे रासेयो पथक, प्रा.जलील खॉ पठाण, प्रा. इंद्रनिल काशिवार, वन कर्मचारी ब्राम्हणकर, कापगते आदींनी सहकार्य केले.
संघी टॉपर्स अवार्डचे वितरण
आमगाव दि. 3१: क्रीडा भारती गोंदिया जिल्हा द्वारे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त स्थानिक लक्ष्मणराव मानकर अध्यापक विद्यालय येथे राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार आणि वर्ग दहावी व बारावीमध्ये जिल्ह्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा संघी टॉपर्स अवार्ड देऊन सत्कार करण्यात आला.
प्राचार्य डॉ. दिलीप संघी यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार साहेबराव राठोड, नायब तहसीलदार पवार, पोलीस निरीक्षक सचिन सांडमोर, क्रीडा अधिकारी अनिल निमगडे, डी.एस. भारसाकळे, प्रा. जयंत बन्सोड यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले.
सर्वप्रथम अतिथींनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. प्रांतमंत्री विनायक अंजनकर यांनी क्रीडा भारतीच्या कार्याचे विवेचन केले. अतिथींनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्यावर विचार व्यक्त केले. खेळाडूंनी अधिक यश प्राप्त करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी वर्ग १२मध्ये जिल्ह्यात प्रथम किशोर काळबांधे व वर्ग १0 वीमध्ये जिल्ह्यात प्रथम चंचल अग्रवाल, राष्ट्रीय स्पर्धेत गोंदियाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू काजल चंदनबटये, प्रियंका बैस, शीतल शक्तीकर, जान्हवी रंगनाथन, राशी शेंडे, तनुश्री गौतम, अंजली टहल्यानी, सुमीरन चहाण, अंजली उके, यश तिवारी, तोपेश सावरकर, कुणाल तांडेकर, अभिषेक झॉ, प्रणय नंदागवली, किशोर राऊत यांचा रोख पुरस्कार व सिल्व्हर मेडल देऊन सत्कार करण्यात आला.
खेळाडूंना स्व.डी. सत्यनारायण संघी यांच्या स्मृतीत डॉ. दिलीप संघी व परिवारतर्फे २0 हजार रुपयांचे पुरस्कार व सिल्व्हर मेडल देण्यात आले.
याप्रसंगी जिल्ह्यातील क्रीडा प्रशिक्षक, शिक्षक, खेळाडूंचे पालक व मोठय़ा संख्येत विद्यार्थी उपस्थित होते.
उड्डाण पुलावरील पाण्यामुळे होणारा त्रास दूर करा!
गोंदिया दि. 3१ : गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवक संघटनेद्वारा नवीन उड्डाण पुलावर (ओव्हरब्रिज) पावसामुळे साठत असलेल्या पाण्याची विल्हेवाट योग्य प्रकारे होत नसून पुलावरचे पाणी येणार्या-जाणार्या वाहनांच्या रहदारीमुळे बाजूच्या किनार्याला ओलांडून पुलाच्या खाली असलेल्या रस्त्यावरून वाहतूक करणार्या लोकांच्या अंगावर उडते. याचा बंदोबस्त करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण यांच्याकडे केली.
वाहनावर हा पाणी पडल्याने सामान्य नागरिकांना तसेच विशेषत: राठोड टालकडे (गड्डाटोली मार्ग) जाणार्या नागरिकांना त्रास होणार नाही अशी व्यवस्था करण्यासंबंधी जिल्हा अध्यक्ष विनोद हरिणखेडे यांच्या सूचनेप्रमाणे शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले. येत्या ८-१0 दिवसात ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन देण्यात आले. याप्रसंगी संजीव राय, रौनक ठाकुर, सौरभ वर्मा, प्रशांत ठाकुर, आकाश नेवारे, तपन केशवानी, विकास खोटेले, अक्षय सिंगनधुपे, योगेश राजाभोज, शुभम जायस्वाल, निलेश बहेकार, विजय खोटेले, आशिष मस्करे, रोहित कोहरे, शंकी उमरकर, हर्षीत चंदेल, शिवम मिश्रा, करण श्रीवास, नुपेंद्र हिगे, भुपेंद्र बिसेन, सौरभ रघुवंशी, राहुल कोरोटे आदी कार्यकर्ते व नागरिक होते.