उड्डाण पुलावरील पाण्यामुळे होणारा त्रास दूर करा!

0
18

गोंदिया दि. 3१ : गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवक संघटनेद्वारा नवीन उड्डाण पुलावर (ओव्हरब्रिज) पावसामुळे साठत असलेल्या पाण्याची विल्हेवाट योग्य प्रकारे होत नसून पुलावरचे पाणी येणार्‍या-जाणार्‍या वाहनांच्या रहदारीमुळे बाजूच्या किनार्‍याला ओलांडून पुलाच्या खाली असलेल्या रस्त्यावरून वाहतूक करणार्‍या लोकांच्या अंगावर उडते. याचा बंदोबस्त करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण यांच्याकडे केली.
वाहनावर हा पाणी पडल्याने सामान्य नागरिकांना तसेच विशेषत: राठोड टालकडे (गड्डाटोली मार्ग) जाणार्‍या नागरिकांना त्रास होणार नाही अशी व्यवस्था करण्यासंबंधी जिल्हा अध्यक्ष विनोद हरिणखेडे यांच्या सूचनेप्रमाणे शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले. येत्या ८-१0 दिवसात ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न करू, असे आश्‍वासन देण्यात आले. याप्रसंगी संजीव राय, रौनक ठाकुर, सौरभ वर्मा, प्रशांत ठाकुर, आकाश नेवारे, तपन केशवानी, विकास खोटेले, अक्षय सिंगनधुपे, योगेश राजाभोज, शुभम जायस्वाल, निलेश बहेकार, विजय खोटेले, आशिष मस्करे, रोहित कोहरे, शंकी उमरकर, हर्षीत चंदेल, शिवम मिश्रा, करण श्रीवास, नुपेंद्र हिगे, भुपेंद्र बिसेन, सौरभ रघुवंशी, राहुल कोरोटे आदी कार्यकर्ते व नागरिक होते.