वृक्षलागवडीसाठी जिल्हाधिका-यांना विद्यार्थ्यांचे निवेदन

0
12

गोंदिया, दि. ३१ :-गोंदिया शहरातील काही विद्यार्थ्यानी एकत्र येवून समाजासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढाकार घेवून ङ्कङ्कमाझी भेट निसर्गासाठीङ्कङ्क या गटाची स्थापना केली. या गटातील काही सदस्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची नुकतीच भेट घेवून गटामार्फत राबविण्यात येणा-या विविध उपक्रमाला पाठबळ देण्याची अपेक्षा जिल्हाधिका-यांकडे निवेदनातून व्यक्त केली. गोंदिया शहरात मोठया प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून त्याचा परिणाम शहरातील नागरिकांच्या आर्रोग्यावरही होत असल्याबाबत जिल्हाधिका-यांचे लक्ष वेधले.
विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या या गटाने त्यांच्या कार्याची सुरुवात पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्षलागवडीपासून करण्याचे निश्चित केले. भविष्यात नदीची स्वच्छता करणे, पेपर, प्लास्टिक, ग्लास, पॉलीथीनचा पुनर्वापर याबाबत जनजागृती करणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून बदल करण्यासाठी आमचा गट काम करणार असून सोबत लोककल्याणाचे विविध उपक्रम राबविणार असल्याचे गटातील विद्यार्थ्यानी जिल्हाधिका-यांना सांगितले.