39 C
Gondiā
Tuesday, May 20, 2025
Home Blog Page 5698

‘साईबाबा’ प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी

0

गडचिरोली,- नक्षल्यांना मदत करीत असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी अटक केलेले व सध्या जामीनावर असलेले दिल्ली विद्यापीठाचे प्रो.जी.एन.साईबाबा यांच्या प्रकरणाची सुनावणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु असून, सरकारी पक्षातर्फे सर्व साक्ष पुरावे तपासल्यानंतर आज पुरावे पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.
गडचिरोली पोलिसांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे प्रा.जी.एन.साईबाबा यांना ९ मे २०१४ अटक केली होती. ४ एप्रिल २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर प्रा.साईबाबा कारागृहाबाहेर आले. मात्र तत्पूर्वीच २७ ऑक्टोबर २०१५ पासून साईबाबा प्रकरणाची सुनावणी गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु करण्यात आली. ही सुनावणी आताही सुरु असून, आज सरकारी पक्षातर्फे सर्व साक्ष पुरावे तपासून पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी प्रा.साईबाबा यांच्या वकिलांनी साक्षदारांची उलटतपासणी घेतली. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ ऑगस्टला घेणार असल्याचे जाहीर केले. सरकारी पक्षातर्फे अॅड.सत्यनाथन व अॅड. सचिन कुंभारे यांनी काम पाहिले, तर प्रा.जी.एन.साईबाबा यांच्यातर्फे अॅड. सुरेंद्र गडलिंग व अॅड.जगदीश मेश्राम यांनी युक्तीवाद केला.

सोशल मीडियाचा वापर आक्रमकपणे करा- राठोड

0

वृत्तसंस्था
नवी दिल्ली- पोलादी पडद्याचे युग काळाआड गेले आहे. आता सरकारने जनतेला योग्य माहिती जलद गतीने उपलब्ध करून देण्याची गरज असल्याने सोशल मीडियाचा आक्रमकपणे वापर करा, असा सल्ला केंद्रातील माहिती व नभोवाणी खात्याचे राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी अधिकाऱ्यांना गुरुवारी दिला.

संवाद साधण्यासाठी फेसबुकचा प्रभावी वापर कसा करावा, यासंदर्भात पत्रसूचना कार्यालयातील (पीआयबी) अधिकाऱ्यासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेचे उद्‌घाटन राठोड यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, “”आपण खुले होण्याची गरज आहे. अजूनही सरकार पोलादी पडद्याच्या आधार घेत आहे. पण आता काळ बदलत असल्याने प्रथम आपल्या विचारसरणीत बदल करायला हवा. निर्णय घेणाऱ्यांपासून तिचा प्रसार करणाऱ्यांपर्यंत माहिती पोचविण्याची प्रक्रिया जलद गतीने होणे आवश्‍यक आहे. यात सोशल मीडिया महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. कारण दूरचित्रवाणीवरील चर्चा असे याचे स्वरूप नसून सार्वजनिक मतांचे प्रतिबिंब त्यात दिसत असते.

भाजपा नगरसेवक महेंद्र निंबार्तेचा काँग्रेस पक्षात प्रवेश

0

भंडारा,दि.१९-भंडारा जिल्ह्यातील सक्रिय युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे भाजपाचे नगरसेवक महेंद्र निंबार्ते यांनी मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोकराव चौहाण, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, प्रदेश महासचिव रामकिशन ओझा, ऍड गणेश पाटील, यांच्या प्रमुख उपस्थितीत तर प्रदेश महासचिव डॉ. बबनरावजी तायवाडे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर,  माजी आमदार सेवक वाघाये, प्रदेश सरचिटणीस जिया पटेल, माजी आमदार आनंदराव वंजारी, प्रफुल्ल गुढघे पाटील, मुजीब पठाण, आसवारीताई देवतळे, प्रमोद तितिरमारे, प्रमिला कुटे, मनोहर सिंगनजुडे, सीमाताई भुरे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
  १९९४ पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत प्रवेश घेऊन त्यांनी विदयार्थी चळवळीत सक्रिय भूमिका निभावली. १९९८ ते २००५ पर्यंत अभाविपचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून चंद्रपूर,गडचिरोली,नागपूर महानगर,नागपूर जिल्हा,यवतमाळ तसेच वाशीम या जिल्ह्यांमध्ये संघटनमंत्री म्हणून कार्य केले. त्यांनी विविध कार्यकारणी वर काम केले. विदर्भ प्रदेश शिक्षा प्रकोष्ठाचे पाच वर्ष भरीव कार्य केले. अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड तसेच प्रदेश सहमंत्री म्हणून निवडीमुळे त्यांनी यादरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक समस्या जाणून घेतल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व्दितीय वर्ष संघ शिक्षा वर्ग शिक्षित स्वयंसेवक सुद्धा आहेत. विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून लोकप्रिय झालेले महेंद्र निंबार्ते २००५ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठावर सिनेट सदस्य म्हणून प्रचंड बहुमताने निवडून आले. युवा सदस्य म्हणून त्यांनी विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नांवर विद्यापीठाला नेहमीच धारेवर धरले. याशिवाय विद्यार्थी कल्याण हे केंद्रबिंदू मांडून शिक्षणक्षेत्रात कार्य केले. २०११ मध्ये दुसऱ्यांदा सिनेट सदस्य म्हणून निवडून येण्याचा मान पटकाविला. यातूनच पुढे ते विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवडून आले. व्यवस्थापन परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी कल्याणाच्या दृष्टीने विविध योजना मंजूर करून घेतल्या तसेच विद्यापीठ प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या समस्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यास बाध्य केले. समाजातील प्रत्येक स्तरातील विद्यार्थ्यांना शासकीय, विद्यापीठाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी लढा दिला. विद्यार्थी सहाय्यता निधीच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदत मिळवून  दिली. २०११ मधेच भंडारा नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग पाच मधून नगरसेवक या पदावर निवडून आले. याशिवाय त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सचिव व भाजयुमोच्या जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले. आपल्या कार्याने युवकांच्या मनात अढळ स्थान मिळवून त्यांनी पदवीधरांची प्रतिनिधी म्हणून नाव लौकिक मिळविला आहे. सध्या ते वाईल्डलाईफ प्रोटेक्शन फोर्स ऑफ विदर्भ चे अध्यक्ष सुद्धा आहेत.
   

जलयुक्त शिवार अभियानाची कालबद्ध अंमलबजावणी करा -प्रा. राम शिंदे

0

*जलयुक्त शिवार कामांचा आढावा
*1 सप्टेंबर पासून जलयुक्त कामांचे ऑनलाईन छायाचित्र
*1077 गावांमध्ये 21 हजार 599 कामे पूर्ण
*विभागात 1 लक्ष 31 हजार 854 टीसीएम पाणीसाठा
*माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनाला प्राधान्य
*सिंचन क्षमता वाढेल अशीच कामे घ्या

गोंदिया/नागपूर दि. 19 : जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत कामांची निवड करतांना शेतीसाठी प्रत्यक्ष संरक्षित सिंचनाचा लाभ होईल अशाच कामांना प्राधान्य देवून कालबद्ध कार्यक्रमानुसार कामे पूर्ण करा, अशा सूचना राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी गुरुवारी नागपूर विभागातील जलयुक्त शिवार अभियान कामांचा आढावा घेतला त्यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना दिल्या. आबासाहेब खेडकर सभागृहात आयोजित बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित ते होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निशाताई सावरकर, आमदार सर्वश्री सुनील केदार, डॉ.आशिष देशमुख, समीर मेघे, प्रा. अनिल सोले, सुधाकर देशमुख, राजेश उर्फ बाळा काशीवार, समीर कुणावार, चरण वाघमारे, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जलसंधारण सचिव पुरुषोत्तम भापकर, कृषी आयुक्त विकास देशमुख, संचालक एस. एस. जाधव, मुख्य अभियंता शिवकुमार गिरी, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्त अभय महाजन, अपर आयुक्त हेमंत बसेकर, उपसचिव किशोर पठारे, नारायण सराफ आदी अधिकारी उपस्थित होते.
14067981_301535013571415_432490999186405188_oजलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमामुळे सातत्याने टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासोबत शेतीला संरक्षित सिंचनाचा लाभ मिळण्यासाठी तसेच कायम टंचाई दूर करण्यासाठी आवश्यक असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना करताना प्रा.राम शिंदे म्हणाले की, अभियानाअंतर्गत नागपूर विभागात मागील वर्षी 1077 गावांमध्ये 21 हजार 599 कामे पूर्ण झालेली आहेत. यावर्षासाठी 904 गावांमध्ये 2307 कामे पूर्ण झाली असून 914 कामे प्रगतीपथावर असून यासाठी 316 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध देण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
जलयुक्त शिवार अभियानामध्ये मागीलवर्षी अपूर्ण राहिलेली कामे डिसेंबर अखेर पर्यंत पूर्ण करावी तसेच यावर्षी प्रस्तावित केलेली संपूर्ण कामे याचवर्षी पूर्ण होतील. यादृष्टीने नियोजन करण्याचा सूचना करताना जलसंधारण मंत्री पुढे म्हणाले की, अपूर्ण कामांबद्दल विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी वेळेत काम पूर्ण होईल याची खबरदारी घ्यावी.
जिल्ह्यात जलयुक्त अभियानाअंतर्गत झालेल्या कामांसंदर्भातील संपूर्ण छायाचित्र एमआरसॅ या प्रणालीच्या माध्यमातून 1 सप्टेंबरपासून ऑनलाईन टाकणे बंधनकारक करण्यात आले असून जीओ टॅगींगच्या माध्यमातून झालेल्या कामांचा दर्जा व योग्य वेळेत झाले किंवा नाही याची माहितीही देण्यात येणार असल्याचे सांगतांना ते पुढे म्हणाले की, नागपूर विभागात मागील वर्षी 43 कोटी रुपयाचा निधी शिल्लक असून हा निधी खर्च करण्यासाठी कामाच्या वेळापत्रक तयार करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जलयुक्त शिवार कार्यक्रमामध्ये लोकसहभागातून वाढविण्यासोबतच विविध उद्योगाकडून मिळणाऱ्या सीएसआर निधीमधील कामे ही संबंधित प्रकल्पाच्या क्षेत्रांतर्गत वापरण्याची तरतूद केल्यास या अभियानाला चालना मिळणार असल्याचे सांगतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की विदर्भ सिंचन विकास कार्यक्रम अंतर्गत 3 हजार 250 कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी 3 वर्षांची मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे.जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी व कालबद्ध अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात असलेल्या सर्व यंत्रणाकडून कामे पूर्ण केल्यास कामे त्वरित पूर्ण होतील, असेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

नागपूर विभागातील माजी मालगुजारी तलावाच्या पुनरुज्जीवनाचा महत्त्वाकांक्षी कालबद्ध कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विभागात असलेल्या 6 हजार 489 मालगुजारी तलावापैकी 1 हजार 414 तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी 207 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून यासाठी शासनाने 150 कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करुन दिली आहे. या तलावाच्या पुनरुज्जीवनामुळे सरासरी 1 लक्ष हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होईल असेही यावेळी विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी सांगितले.

जलसंधारण विभागाचे सचिव पुरुषोत्तम भापकर यांनी नागपूर विभागात जलयुक्त शिवार अंतर्गत चांगले काम झाले असून मागील अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करुन यावर्षीची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करा. नदी पुर्नरजीवन कार्यक्रमाअंतर्गत विभागाला 22 कोटी रुपयाच्या निधीची आवश्यकता असून तातडीने 11 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. विभागात शेतकऱ्याच्या मागणीनुसार 11 हजार विहिरींचा कार्यक्रम प्रस्तावित असून नरेगा अंतर्गत 10 हजार कोटीचे कामे राज्यात घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात नागपूर विभागात मागील वर्षी व यावर्षी जलयुक्त शिवार अभियानात नागपूर विभागात 1 हजार 981 गावांची निवड करण्यात आली होती. मागील वर्षाचे अपूर्ण व यावर्षी सूचविण्यात आलेल्या एकूण 28 हजार 740 कामांसाठी 750 कोटी रुपयाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यावर्षी 3 हजार 216 कामे हाती घेण्यात आली होती. त्यापैकी 3 हजार 207 कामे पूर्ण झाली आहेत.
‘मागेल त्याला शेततळे’ या कार्यक्रम अंतर्गत 8 हजार 474 च्या उद्दिष्टापैकी 8 हजार 882 ऑन लाईन अर्ज केले. त्यापैकी 7 हजार 594 कामे सुरु झाली आहेत.
विदर्भातील माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन करण्याचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. त्यात नागपूर, चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये 6 हजार 489 मामा तलाव अस्तित्वात आहे. या तलावातील पूर्ण गाळ काढला तर 1 लक्ष सिंचन क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूर विभागाचे जिल्हानिहाय आढावा जिल्हाधिकारी यांनी सादर केला. यावेळी लोकप्रतिनिधींनी जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत लोकसहभाग वाढविण्यासाठी तसेच नियोजित वेळात कामे पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधींना गावनिहाय कामांची माहिती उपलब्ध करुन द्यावी, अशी सूचना केली. भंडारा जिल्ह्याची जलयुक्त शिवार या पुस्तिकेचे विमोचन जलसंधारण मंत्री यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन दिनेश मासुळकर, उपमुख्य कार्यपालन अधिकारी कमलकिशोर फुटाणे व विजयी बोंद्रे यांनी केले. आभार प्रदर्शन उपायुक्त पराग सोमण यांनी मानले. यावेळी नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी तसेच विभाग प्रमुख यांनी जलयुक्त शिवार विभागनिहाय सादरीकरण करुन विभाग व जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांची व प्रगतीची माहिती दिली.

कृषी विभागातील अप्पर मुख्य सचिव भगवान सहाय सक्तीच्या रजेवर

0

मुंबई दि.19– नैराश्यग्रस्त मुलाने तातडीने घरी यावे असा फोन केल्यानंतर अतिरिक्त मुख्य सचिव भगवान सहाय यांनी उपसचिव राजेंद्र घाडगे यांना घरी जाण्यास परवानगी न दिल्याने घाडगे यांच्या मुलाने आत्महत्या केली.याप्रकरणाला घेऊन मंत्रालयातील कर्मचारी अधिकारी यांनी गुरुवारी आंदोलन करीत मुख्य सचिवाना निवेदन सादर केले होते.त्या निवेदनाची दखल घेत आणि सपुर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी सहाय्य यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.सहाय्य यांना रजेवर पाठविण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

टेमघर प्रकरणी महाजनांकडून अविनाश भोसलेंची पाठराखण

0

वृत्तसंस्था
पुणे : आम आदमी पक्षाने टेमघर धरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे समोर आल्यानंतर, पुण्यातील इतर धरणांच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच जलसंपदा मंत्री गिरीष महाजन हे बिल्डर अविनाश भोसलेंना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आप नेत्या प्रीती मेनन यांनी केला.

‘आप’ने टेमघरसह वरसगाव आणि पवना धरणांमधून पाण्याची गळती होत असल्याचा दावा पुण्यात पत्रकार परिषद घेऊन केला आहे. श्रीनिवास एंटरप्रायजेस आणि प्रोग्रेसिव्ह एंटरप्रायजेस या कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिले. परंतु सोमा एंटरप्रायजेसला त्यांनी यातून वगळले. कारण त्यांना अविनाश भोसलेंना वाचवायचे होते. जेव्हा टेमघरचे काम ‘सोमा’कडून झाले, तेव्हा अविनाश भोसले संचालक होते. या धरणांच्या दुरुस्तीसाठी संबंधीत कंत्राटदारांकडून खर्च वसूल करायला हवा. लोकांचे पैसे पुन्हा वाया घालवायला नको, असे प्रीती मेनन म्हणाल्या.

मदरसा बोर्ड ने लिया फ़ैसला-मदरसों में संविधान पढ़ना होगा अनिवार्य

0

वृत्तसंस्था
लखनऊ। -यूपी मदरसा बोर्ड ने निर्णय लिया है कि अब मदरसों में संविधान पढ़ाना अनिवार्य होगा।अभी तक मदरसों में संविधान अनिवार्य विषय के रूप में नहीं पढ़ाया जाता था।बोर्ड इस फैसले को साल 2015-16 का सत्र शुरू होने से पहले ही लागू कर देना चाहता था लेकिन तमाम तैयारियों के बीच जश्न-ए-आजादी के मौके पर यह फैसला लिया गया।बताते चलें कि यूपी में 35 सौ मदरसों में साढ़े तीन लाख छात्र पढ़ते हैं।मदरसा बोर्ड के चेयरमैन जैनुस साजिद्दीन ने बताया कि पहली बार मदरसा बोर्ड ने संविधान को मदरसों में पढ़ाने के लिए अनिवार्य विषय किया है। इस विषय को स्नातक तक के छात्र पढ़ेंगे। उन्होंने बताया कि प्रदेश में साढ़े तीन लाख छात्र मदरसों में पढ़ते हैं जिसमे से बीस हजार स्नातक के छात्र हैं।उन्होंने बताया कि बच्चों को संविधान उर्दू भाषा में पढ़ाया जाएगा।उन्होंने बताया कि मदरसों में बच्चे ज्यादातर विषय उर्दू भाषा में पढ़ते हैं।ऐसे में संविधान को भी उर्दू भाषा में ही पढ़ाया जाएगा।मदरसों का सत्र जुलाई से शुरू हो चूका है और संविधान को अनिवार्य विषय के रूप में बीच सत्र में शामिल किया गया है।इस विषय को मदरसों के सिलेबस में शामिल कराने की योजना काफी पहले से बन रही है।ऐसे में जब पूरी योजना को रूप दे दिया गया तो इसे शामिल कर लिया गया

दहशतवादी हाफिज सईद मुस्लिम नसल्याचा फतवा

0

– वृत्तसंस्था
बरेली (उत्तर प्रदेश)- मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार व जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या हाफिज सईद हा मुस्लिम नसून दहशतवादाचा प्रसार करणारा आहे, असा फतवा येथील दरगाह अल्ला हजरत सेनिनरीने काढला आहे.

फतव्यामध्ये म्हटले आहे की, ‘भारतामध्ये विविध ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सईदचा हात आहे. ‘इस्लामिक दहशतवादी‘ हा मुस्लिम असू शकत नाही. इस्लाम व मुस्लिम नावाचा वापर करून तो जगभर दहशतवादी हल्ले घडवून आणत आहे.‘

‘सईद हा इस्लाम व मुस्लिम धर्माचा गैरवापर करत असून, त्याच्यामुळे जगभर नाव खराब होत आहे. दहशतवादाचा तो प्रसार करत आहे. सईदचे इस्लामशी कोणतेही नाते नाही. यामुळे त्याच्या बोलण्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करावे. मुस्लिम नागरिकांनी त्याच्या विचारापासून दरू रहावे,‘ असेही फतव्यामध्ये म्हटले आहे.

अतिरिक्त मुख्य सचिव सहाय विरोधात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

0

मुंबई – नैराश्यग्रस्त मुलाने तातडीने घरी यावे असा फोन केल्यानंतर अतिरिक्त मुख्य सचिव भगवान सहाय यांनी उपसचिव राजेंद्र घाडगे यांना घरी जाण्यास परवानगी न दिल्याने घाडगे यांच्या मुलाने आत्महत्या केली. गुरुवारी मंत्रालय कर्मचाऱ्यांनी मंत्रालयात सहाय यांच्याविरोधात आंदोलन केले. या प्रकरणाची मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय चौकशी करणार आहेत.

कृषी विभागात उपसचिव म्हणून घाडगे कार्यरत आहेत. सातवीत शिकत असलेला त्यांचा मुलगा अवधूत गेल्या काही महिन्यांपासून नैराश्यात होता. शुक्रवारी त्याच्यात व आईमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला. घाडगे यांच्या पत्नीने व मुलाने फोन करून घाडगेंना लवकर घरी येण्यास सांगितले. आज लवकर घरी आला नाहीत तर मी आत्महत्या करेन, असेही अवधूतने घाडगेंना फोनवरून बजावले होते. घाडगे यांनी सहाय यांच्याकडे घरी जाण्याची परवानगी मागितली. मात्र, त्यांनी घरी जाण्याची परवानगी दिली नाही. घाडगे घरी जाईपर्यंत त्यांच्या मुलाने आत्महत्या केली. सहाय यांच्या मनमानीपणामुळे एका अधिकाऱ्याला त्याचा मुलगा गमवावा लागल्याने मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना भेटून कर्मचाऱ्यांनी निवेदनही दिले. हा प्रकार दुर्दैवी आहे. कृषिमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दोन्ही बाजू समजून घेणार असल्याचे मुख्य सचिवांनी सांगितले. उपसचिव घाडगे हे सोलापूर येथील सांगोला या त्यांच्या गावी आहेत. दोघांचेही म्हणणे ऐकल्यानंतरच याबाबत मत व्यक्त करता येईल, असे स्वाधीन क्षत्रिय यांनी सांगितले.

पटोलेंच्या हस्ते आमीर सिद्दिकी यांचा सत्कार

0

गोंदिया : विदर्भ स्टडी सर्कल गोंदियाच्या वतीने भारतीय प्रशासकीय सेवा (यूपीएससी) उत्तीर्ण डॉ. आमीर सिद्दिकी तसेच विदर्भ स्टडी सर्कलमधून शासकीय सेवेत झेप घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.डॉ. आमिर सिद्दिकी यांचा खा. नाना पटोले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी खा. पटोले होते. अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ, सत्कारमूर्ती डॉ. आमिर सिद्दिकी, पोलीस उपनिरीक्षक पी.एस. देशमुख, अमर वर्‍हाडे, त्रिलोक शेंडे उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी, विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त परिश्रम घेवून अभ्यास करावा व आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी. पुढील यूपीएससी परीक्षेत किमान दहा विद्यार्थी उत्तीर्ण व्हावे व जिल्ह्याचे नाव वाढवावे, असे सांगितले. संचालन विनोद माने यांनी केले. आभार प्रविण माने यांनी मानले.
विदर्भ स्टडी सर्कलच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे निरीक्षक म्हणून विनोद माने, गोपाल कदम यांनी काम सांभाळले. कार्यक्रमासाठी सुमित कावळे, उषा कठाणे, वैभव खोब्रागडे, सचिन बिजेवार, आशिक बिसेन आदींनी सहकार्य केले