30.7 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ आज पालकमंत्री जिल्ह्यात

आज पालकमंत्री जिल्ह्यात

0
24

गोंदिया,दि.१३ : पालकमंत्री राजकुमार बडोले हे १४ ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. सकाळी ७.२० वाजता मुंबई येथून विमानाने नागपूर विमानतळ येथे आगमन व सडक अर्जुनी, गोंदियाकडे प्रयाण. सकाळी ११ वाजता सडक अर्जुनी तालुक्यातील वडेगाव ग्रामपंचायत भवनाचे उदघाटन करतील. दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील टॅक्सी चालक मालक यांच्या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतील. दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीला उपस्थित राहतील. सायंकाळी ५ वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे पत्रकार परिषद. सायंकाळी ६ वाजता शासकीय विश्रामगृह येथून सडक अर्जुनीकडे प्रयाण. सायंकाळी ६.४५ वाजता सडक अर्जुनी येथे आगमन, राखीव व मुक्काम.