डीपीडीसीबैठक होणार जि.प.सदस्यांविना

0
12

गोंदिया,दि.१३-जिल्ह्याचे नियोजन तयार करतांना जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्याही त्यात सहभाग असावा असा शासनाचा उद्देश आहे.त्यासाठी या डीपीडीसीमध्ये सदस्य निवडीसाठी निवडणुकप्रकिया पार पाडावी लागते.परंतु गेल्या काही दिवसापुर्वीच जिल्हा परिषदेची निवडणुक झाल्याने आणि जुन्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांना या सभेत सहभागी होता येणार नाही.तर नव्या सदस्यामधून सद्स्यांची निवड न झाल्याने त्यांनाही वंचित राहावे लागणार आहे,त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी या डीपीडीसी नंतर जिल्हा परिषद सदस्यांना पुढच्या डीपीडीसी बैठकित तरी सहभागी होता यावे यासाठी निवडणुक प्रकिया करुन सदस्य निवडीला प्राधान्य द्यायला हवे.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठक ही ग्रामीण भागाच्या विकासाशी निगडीत असल्याने यात जिल्हा परिषदेचे सदस्य या समितीत सदस्य असतात. एकून निवडून आलेल्या सदस्यांपैकी १८ सदस्यांची निवड या समितीवर होत असते. जुन्या सदस्यांचे सदस्यत्व संपुष्टात आल्याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळाले असल्याने ते देखील या बैठकीला उपस्थित राहू शकत नाही. त्यामुळे ही बैठक जिल्हा परिषद सदस्यांच्या अनुपस्थित पार पडणार आहे.डीपीडीसी सदस्य निवडीसाठी मात्र राजकारण होण्याची चिन्हे आहेत.संख्याबळावर यात सदस्य निवडले जात असल्याने राष्ट्रवादीची संख्या अधिक राहणार यात शंकाच नाही.