38.6 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News हैदराबादमध्ये ४ संशयित दहशतवाद्यांना अटक

हैदराबादमध्ये ४ संशयित दहशतवाद्यांना अटक

0
24

blank

हैदराबाद, दि. १४ – स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आलेला असताना हैदराबादमध्ये चार संशयित हदशतवाद्यांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. हे चौघे ‘हुजी’ ( हरकत-उल-जिहाल- अल-इस्लामी ) या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी असल्याचा संशय व्यक्त होत असून या चौघांपैकी २ बांगलादेशचे, १ पाकिस्तानचा तर १ म्यानमारचा नागरिक असल्याची माहिती मिळत आहे. आज पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांची पुढील कारवाई काय आहे, ते कशासाठी आले होते या सर्व गोष्टींचा तपास सुरू आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई मानण्यात येत आहे.

blank