अखेर कोट्यावधी खर्च झालेले डीपीडीसी सभागृहाचे झाले लोकार्पण

0
17

बेरार टाईम्सने प्रकाशित केले होते प्रतिक्षेचे वृत्त

गोंदिया,दि. १४: -गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीला तब्बल १५ वर्षाचा काळ लोटला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी कोट्यावधीचा निधी वापरून डीपीसी सभागृह बांधण्यात आला.या बांधकामाच्या एसी खरेदी असो की इतर साहित्याच्या नावावर अनेकांनी आपले हात ओले करुन घेतले होते.परंतु सभागृहाचे काम आघाडी सरकारच्या काळात पुर्ण केले नव्हते.तेव्हा आत्ता युतीच्या काळात तरी या सभागृहाचे बांधकाम होऊन १५ वर्षानंतर मिळालेल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची पहिली डीपीडीसी सभा या सभागृहात होईल काय या आशयाला घेऊन साप्ताहिक बेरार टाईम्सने सर्वात आधी फेबुवारी महिन्यात कोट्यावधीचे सभागृह डीपीडीसीच्या प्रतिक्षेत या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते.
त्या वृत्तानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी व तत्कालीन कार्यकारी अभियंता यांनी सदर सभागृहाच्या उर्वरित बांधकामाला प्राधान्य दिल्याने ते सभागृह सुसज्ज तयार झाले होते.त्या सभागृहाचे आज १४ ऑगस्टला जिल्हा नियोजन समिती सभेच्या निमित्ताने जिल्हाप्रशासनाने अखेर राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते लोकार्पण केले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे,आमदार गोपालदास अग्रवाल,आमदार विजय रहांगडाले,आमदार संजय पुराम,पालकसचिव पी.एस.मीणा,जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी,मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.