26.6 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ पालकमंत्री बडोले जिल्ह्यात

पालकमंत्री बडोले जिल्ह्यात

0
29

गोंदिया,दि.१७ : जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले हे आज १८ ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. सकाळी ७.३० वाजता रविभवन नागपूर येथून कोहमारा मार्गे गोंदियाकडे प्रयाण करतील. सकाळी १० वाजता गोंदिया विश्रामगृह येथे आगमन. जिल्हाधिकारी कार्यालयात ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत जिल्ह्यातील ऊर्जा विषयक सभेला उपस्थित राहतील. दुपारी १ ते २ या वेळेत शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी २ वाजता गोंदिया तालुक्यातील हिवरा येथील वीज वितरण कंपनीच्या ३३ के.व्ही.उपकेंद्रातील अतिरिक्त रोहित्राच्या उदघाटन समारंभाला उपस्थित राहतील. त्यानंतर नागपूरकडे प्रयाण करतील.