26.6 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home शैक्षणिक २० ऑगस्टला भंडारा येथे संच मान्यता सभा

२० ऑगस्टला भंडारा येथे संच मान्यता सभा

0
26

गोंदिया,दि.१७ : गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाची सन २०१४-१५ ची ऑनलाईन संच मान्यता पूर्ण करण्यासाठी २० ऑगस्ट २०१५ रोजी सकाळी १०.३० वाजता जे.एम.पटेल महाविद्यालय भंडारा येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला प्राचार्य व मुख्याध्यापकांनी स्वत:च्या लॅपटॉप, डोंगल आणि संबंधित लिपीकासह उपस्थित राहावे. सभेला अनुपस्थित राहिल्यास त्या दिवसाची गैरहजर असल्याची नोंद घेऊन त्या दिवसाचे वेतन कपात करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) शरद खंडागळे यांनी कळविले आहे.