31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home यशोगाथा पालकमंत्र्यांच्या हस्ते मंगेश वावधने सन्मानीत

पालकमंत्र्यांच्या हस्ते मंगेश वावधने सन्मानीत

0
25

blank

गोंदिया, दि.२० : पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी गोरेगांवचे तालुका कृषि अधिकारी मंगेश वावधने यांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पालक सचिव डॉ. पी.एस.मीना, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे व पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना प्रामुख्याने उपस्थित होते.
शासनाची ध्येय-धोरणे, शासन निर्णय, मंत्रीमंडळाचे निर्णय, विविध विभागांच्या योजनांची माहिती तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हावी यासाठी श्री वावधने यांनी शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य मासिकाचे गोरेगांव तालुक्यातील ७०० शेतकऱ्यांना वर्गणीदार केले. शेतकऱ्यांना वर्गणीदार केल्यामुळे शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळण्यास मदत झाली आहे. गोरेगांव तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार करण्याचा त्यांनी संकल्प केला आहे.

blank