32.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ दरेकसा घाटावर पिकअप गाडीला अपघात, दोघांचा मृत्यू

दरेकसा घाटावर पिकअप गाडीला अपघात, दोघांचा मृत्यू

0
24

सालेकसा,दि.२७ -सालेकसाकडून दरेकसासाकडे विद्युतखांब नेणारे पिकअप वाहन दरेकसाकडे जाणार्या वळणरस्त्यावरील घाटावर अचानक उलटल्याने दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (ता.२७) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. मृतकांची नावे मुन्ना वातूलाल शहारे (५०) रा. मुरुमटोला व योगेश सुभाष मेंढे (१९) रा. आमगाव खुर्द असे आहे.
वीज वितरण कंपनी तर्फे विद्युतखांब लावण्याचे काम सुरू आहे. या अनुषंगाने (दि.२७) सकाळी १० वाजताच्या सुमारास सिमेंटचे चार विद्युतखांब घेऊन मqहद्रा पिकअप वाहन क्रमांक एम.एस.४०/वाय ८४०१ सालेकसाकडून दरेकसाकडे ६ मजुरांना घेऊन निघाले. या गाडीत चालकासह नरेश पंधरे, अरqवद भोयर, महेश पंधरे, विजय बोरकर, मुन्ना शहारे व योगेश मेंढे हे बसलेले होते. दरेकसा घाट क्रमांक २ येताच सहाही मजूर गाडीवरून उतरले. दरम्यान मृतक मुन्ना वातूलाल शहारे व मृतक योगेश सुभाष मेंढे हे पुन्हा गाडीत बसले. घाटावर अचानक चालकाचे संतुलन बिघडल्याने गाडी रस्त्याच्या कडेला पलटली. यात मुन्ना व योगशेच्या अंगावर गाडीत असलेले विद्युतखांब पडल्याने त्यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. फिर्यादी विन्नु चैतराम मेंढे (३२) रा. आमगाव खुर्द यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.