खासदार पटेल 30 ला गोंदिया-भंडारामध्ये

0
4

गोंदिया,दि.27-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते राज्यसभेचे सद्स्य खासदार प्रफुल पटेल येत्या 30 आॅगस्ट रोजी भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या भेटीवर येत आहेत.या दरम्यान दोन्ही जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य ,नगरसेवक,पंचायत समिती,कृषी उत्पन्न बाजार समिती,सहकारी संस्थासह इतर पदाधिकारी व पक्ष कार्यकारिणीच्या सदस्यासोबत चर्चा करणार आहेत.दुपारी 12 वाजता भंडारा येथे तर सायंकाळी 4 वाजता गोंदिया येथील न.मा.द.महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकित ते पक्ष पदाधिकारी व सदस्यांना मार्गदर्शन करणार आहेत.