31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ बारसे हत्याप्रकरणात आंदोलनाचा इशारा

बारसे हत्याप्रकरणात आंदोलनाचा इशारा

0
17

blank

देवरी दि.3: तालुक्यातील सोनारटोला येथील एका १८ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिला जीवंत जाळून विहिरीत ढकलल्याच्या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीवर कठोर कारवाई होत नाही. त्यामुळे मृतकाच्या परिवाराला न्याय देण्याची मागणी करीत भाजपा महिला आघाडी व जिल्हा महिला आयोगाच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी व पोलीस अधीक्षकांना देण्यात आले. यावेळी जि.प.च्या माजी सभापती सविता पुराम, पं.स.सभापती देवरी मरई, प्रज्ञा संगीडवार, अँड.सरोज जैन, रचना उजवणे, गोमती तितराम,सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, नमीता नेताम,महिला बालकल्याण सभापती विमल नागपुरे, आदी उपस्थित होते.

blank