लायन्स क्लबचा शपथविधी

0
5

गोंदिया दि.3: स्थानिक लॉयन्स क्लब सिव्हिल लाईन गोंदियाचा शपथविधी समारंभ कटंगी येथे दिलीप चौरागडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी प्रांतपाल नवीन पटेल, राजेश परमार, विनोद जैन, कालुराम अग्रवाल, शरद क्षत्रिय, मुरलीधर माहुरे, दीपक कदम, अशोक इंगळे उपस्थित होते. यावेळी आनंद ठाकूर व संजय ओकटे यांनी सदस्यता धारण केली. अध्यक्ष प्रशांत बोरकुटे, सचिव अमित तुरकर, कोषाध्यक्ष शाम घाटे, क्लबच्या अध्यक्षा प्रज्ञा मेहता, सचिव नगरसेविका भावना कदम, कोषाध्यक्षा पूनम अरोरा व त्यांच्या चमूने शपथ घेतली. यावेळी गुणवंत विद्यार्थी याशिका गडपल्लीवार, विशाल तुरकर, मार्कंड रिनाईत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सुजाता बाहेकर, तर आभार नीता क्षत्रिय यांनी मानले. यावेळी भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यशस्वीतेसाठी सतीश चव्हाण, बबन येटरे, सुनिल गडपल्लीवार, टेकेश तुरकर, डी.यु. रहांगडाले, कैलाश तावाडे, सोमेश्‍वर ब्राम्हणकर यांनी सहकार्य केले.