32.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ वीज पडून मृत पावलेल्या महिलेच्या कुटुंबाला ४ लाखांची मदत

वीज पडून मृत पावलेल्या महिलेच्या कुटुंबाला ४ लाखांची मदत

0
20

blank

तिरोडा,दि.५ -तालुक्यातील पालडोंगरी येथील कांतनबाई छगनलाल रहांगडाले या महिलेचा काही दिवसापुर्वी शेतशिवारात वीज पडून मृत्यू झाला होता. सदर महिलेला शासनाकडून आर्थिक़ मदत मिळावी यासाठी आमदार विजय रहांगडाले यांंनी पाठपुरावा केला. दरम्यान, तिच्या कुटुंबाला शासनाकडून ४ लाखांची मदत करण्यात आली आहे. आ.रहांगडाले यांच्या हस्ते मृतक कांतनबाई रहांगडालेच्या पती छगनलाल रहांगडाले याला ४ लाखांचे धनादेश देण्यात आले.
यावेळी त्यांच्यासोबत नायब तहसीलदार विलास कोकवार, पं.स.सदस्य पवन पटले, ललीत परिहार, राम ठाकुर, प्रशांत धोटे, सुनील ठाकरे, दर्याव रिनाईत उपस्थित होते.

blank