विशेष म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना आपल्या मतदारसंघातच नव्हे तर जिल्ह्यातील कुठल्याही नगरपंचायतीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळवून देता आले नाही,हे भाजपचे अपयशच म्हणावे लागेल.तर विधानसभा निवडणुकीनंतर हळूहळू सावरु लागलेल्या काँग्रेसला देवरी वगळता तीन ठिकाणी पक्षाला जिवंत ठेवण्यात यश मिळाले आहे.मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अधिक जागा पटकावणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देवरी वगळता तीन नगरपंचायतीमध्ये पहिल्या स्थानावर येऊ शकले नाही.
गोरेगाव नगरपंचायतमधील 17 जागेतील पक्षनिहाय स्थिती याप्रमाणे भारतीय जनता पक्ष ७,राष्ट्रीय काग्रेस ५,राष्ट्रवादी काग्रेस १,गोरेगाव विकास आघाडी(अपक्ष) ४ येथे मनसे ,सेना व बसपला खाते उघडता आले नाही.सडक अर्जुनी नगरपंचायतीच्या 17 जागापैकीभारतीय जनता पक्ष 4, राष्ट्रीय काग्रेस 3,राष्ट्रवादी काग्रेस 5, स्वतंत्र उमेदवार 1 व बाहुबली प्रगती पॅनलचे 4 उमेदवार विजयी झाले.अर्जुनी मोरगाव नगर पंचायतमध्ये भारतीय जनता पक्ष 6,राष्ट्रीय काग्रेस 6,राष्ट्रवादी काग्रेस २,स्वतंत्र उमेदवार २ व शिवसेनेचा 1 उमेदवार निवडून आला.तर देवरी नगरपंचायतीच्या 17 जागापैकी भारतीय जनता पक्ष ७,राष्ट्रीय काग्रेस १,राष्ट्रवादी काग्रेस ८ आणि स्वतंत्र उमेदवार १ विजयी झाला.या ठिकाणी सुध्दा मनसे व सेनेला खाता उघडता आले नाही.