वर्षपूर्तीनिमित्त भाजयुमोची युवासंवाद यात्रा

0
10

गोंदिया ,दि.२ -मुख्यमंत्रीे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्यात भाजप सरकारने यशस्वी वर्षपूर्ती केल्यानिमित्त घेतलेले लोककल्याणकारी निर्णय व योजनांची माहिती जनतेपर्यत पोहचविण्याकरीता भारतीय जनता युवा मोर्चातर्फे ३१ आक्टोंबर रोजी भाजपा कार्यालयातून मोटारसायकल रॅली काढून लोकसंवाद यात्रेला सुरूवात करण्यात आली.
युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वात शहरात मोटरसायकल रॅली काढण्यात आली. भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी हिरवी झंडी दाखवून लोकसंवाद यात्रा व मोटरसायकल रॅलीला प्रारंभ केला. यावेळी प्रामुख्याने जिल्हा महामंत्री संतोष चव्हान, भाउराव उके, ग्रामीन मंडळ अध्यक्ष नंदकुमार बिसेन, शहर महामंत्री संजय मुरकुटे, अमित झा, बाबा बिसेन, भाजयुमो प्रदेश सदस्य ॠशीकांत शाहू, भाजयुमो जिल्हामहामंत्री पंकज सोनवाने, अहमद मनियार प्रामुख्याने उपस्थित होते. मोटर सायकल रॅली गांधी प्रतिमा, चांदणी चौक, दुर्गा चौक, रेल्वेस्टेशन, गोरेलाल चौक, नेहरू चौक, पाल चौक, कुडवा नाका, रिंगरोड , कन्हार टोली, मरार टोली, सिव्हील लाईन या मार्गाने घोंषणाबाजी करीत भाजपा जिल्हा कार्यालयात रॅलीचे समापन करण्यात आले. युवासंवाद यात्रेकरीता तयार वाहनाच्या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारी योजना व निर्णयांची माहिती जनतेला देण्यात आली. तसेच पत्रकाद्वारे व अन्य साहित्य कार्यकत्र्याद्वारे वितरीत केले गेले. मोटर सायकल रॅलीत छोटू रामटेककर, कमलेश सोनवाने, देवचंद नागपूरे, मोहन गोैतम, लखन हरीनखेडे, अशोक जयqसघानी, पन्नालाल मचाडे, मिताराम हरडे, राजेश नागरीकर, कुणाल बिसेन, निकूंज साहू, अजय लौंगानी, विवेक भुंबर, विनोद बन्सोडे, शैलेश ढाले, निरज ठाकूर, दद्दा बहेकार, कुशल अग्रवाल, सतीश मेश्राम, दिलीप पिल्ले, अनुराग शुक्ला, किशोर दुबे, अभिषेक श्रीवास्तव, अनिल रहांगडाले, डिगेश नागपुरे, रमेश नागफासे, सचिन शेंद्रे, रवि भालाधरे, चेतन भुंबर, विलास करेले, राकेश लांजेवार, अजमल तिगाला, अतुल पेंढारकर, मंगलेश गिरी, रामेश्वर लिल्हारे आदी सहभागी झाले होते.