
गोंदिया,दि.8 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 6 ते 16 एप्रिल 2022 या कालावधीत सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 12 एप्रिल 2022 रोजी विविध क्षेत्रातील बिझनेस आयडीया अवगत असणाऱ्या उमेदवारांनी सकाळी 10 वाजता सामाजिक न्याय भवन, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालया मागे, गोंदिया येथे उपस्थित राहावे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा. असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ.मंगेश वानखडे यांनी केले आहे