35.5 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home Top News जेव्हा मंत्री यशोमती ठाकूर ट्रॅक्टर चालवितात…

जेव्हा मंत्री यशोमती ठाकूर ट्रॅक्टर चालवितात…

0
19

blank

अमरावती,दि.16ः राज्यात भोंग्यावर राजकारण सुरू असताना, अमरावतीत मात्र शेतकरी उत्थान तंत्रज्ञानाचे समाजकारण पाहायला मिळते आहे. आज अमरावतीत पालकमंत्री तथा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर चक्क स्वत: ट्रॅक्टरचे सारथ्य करताना पाहायला मिळाल्या. शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या ट्रॅक्टरची प्रथम चाचणी घेत त्यांनी ट्रॅक्टरचे सारथ्य केले. ब्राह्मणवाडा( भगत)येथील युवा शेतकरी सरकारी बचत गटाच्यामाध्यमातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना विविध शेती उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्रॅक्टर चालवून शेतकरी उत्थान तंत्रज्ञानाच्या आणि विकासाच्या मार्गावर आपण चालत असल्याचा संदेश दिला.